सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय Sardi Khokala Gharguti Upay

Sardi Khokala Gharguti Upay सध्या कोरोणामुळे लोकांमध्ये खूप धास्ती आहे. तसेच कोरोणाला वातावरण सुद्धा सुट होत आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. वातावरणातील या बदलामुळे लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत आहे. अशावेळी लोकांमध्ये गैरसमज होत आहे.  डॉक्टरांची सल्ला घ्यावा की घरगुती उपाय करावे. म्हणून आपण सर्दी -खोकल्यावर घरगुती उपाय पाहणार आहोत.

सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय Sardi Khokala Gharguti Upay

सर्दी खोकल्यामुळे जर अंगदुखी आणि ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि जर आधी सर्दी खोकला असेल तर घरगुती उपाय करावे. वातावरणामध्ये बदल घडून आला की सर्वांना त्रास होतो. हिवाळा आणि पावसाळा मध्ये बहुतांश लोकांना सर्दी-खोकला होतो. तर काही लोकांना पाणी बदलामुळे सुद्धा बारामास सर्दी खोकला येतो. अशा वेळेस घरगुती उपाय करावे.

कांद्याचे पाणी-

हा जुन्या काळातील उपाय आहे. त्यावेळेस लहान बाळांना जर सर्दी खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा बारीक चिरून त्याचं पाणी द्यायचे. त्याआधी तो कांदा तीन कप पाण्यामध्ये उकळत ठेवायचा. क्या कांद्याचा काढा करून त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. आणि तो काढा कोमट झाल्यावर बाळाला पाजायला द्यायचा. त्यामुळे काय होते की काड्या मुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबा द्वारे बाहेर पडतो. छाती मधून खरकर येणारा आवाज बंद होतो.

फुटाणे-

जुन्या काळात काय करायचे? जर कोणाला खोकला येत असेल आणि छाती मध्ये जर कफ वाढला असेल तर त्याला मूठभर फुटाने खायला द्यायचे. आणि ते खाल्ल्यानंतर त्याला तासभर पाणी पिऊ द्यायचे नाही. त्यामुळे काय व्हायचे किया फुटल्यामुळे सगळ्यात कफ शोषून घेतला जायचा.

हळदीचे दूध-

हळदीचे दूध हे सर्दी आणि खोकल्यावर खूप गुणकारी आहे. ते प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. हळद हि अँटिव्हायरस आणि अंतीबॅक्टरियल असते. जी सर्दी आणि खोकल्यावर विषाणूची लढते. हळदीचे दूध प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

आल्याचा चहा-

सर्दी खोकला असेल तर एक आले घ्यावे. ते बारीक करून त्यात एक कप गरम पाणी आणि दूध मिसळावे. त्याचा काढा तयार करावा. आणि नंतर ते द्यावे. आल्याच्या चहाने सुद्धा सर्दी खोकला कमी होतो.

तुळशीच्या पाल्याचा रस-

चार-पाच तुळशीची पाने घ्यावी, दोन ते तीन लवंगा घ्याव्या, दोन वेलदोडे, दालचिनी चे छोटे तुकडे, गवती चहा असेल तर तो घ्यावा, चार कप पाणी. हे सर्व मिसळून त्याचा एक काढा तयार करावा. आणि तो रुग्णास प्यायला द्यावा. हे घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

लिंबू आणि मध

सर्वात आधी पाणी उकडून ते कोमट होऊ द्यावे. त्यातील एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये दोन चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस टाकावा. ते योग्य मिसळे पर्यंत मिसळत राहावे. आणि नंतर हे पेय प्यावे. याने सुद्धा आराम मिळतो.

आपणास आणखी आरोग्य विषयक टिप्स पाहिजे असतील तर मराठी आरोग्य डॉट कॉम ब्लॉग ला भेट द्या

किरकोळ औषधे घेतल्या पेक्षा हे उपाय कधीही चांगले. हल्ली बाजारामध्ये सर्दी खोकल्यासाठी विविध औषधे उपलब्ध आहेत. काहींचा फायदा लवकर होतो तर काहींचा असर दाखवायला उशीर लागतो. लोक डॉक्टरांकडे न जाता मेडिकल वर जातात आणि सर्दी खोकल्याची औषधी मागतात. अशावेळी या प्रकारच्या औषधी घेऊन दुखणे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या औषधी गोळ्या कधीही शरीराला चांगल्या. त्यामुळे शरीराला साईड इफेक्ट होत नाही.

सर्दी खोकला म्हणजे हे शाळा बुडवायचे एक नेहमी कारण आहे. सर्दी खोकला चा संसर्ग वर्षभर कधीही होतो. सतत होणाऱ्या सर्दी वर तसा काही उपाय नाही पण त्यावर प्रतिजैविके, गोळ्या आणि विविध प्रकारचे सिरप निघालेले आहेत. या प्रकारच्या औषधांपेक्षा घरगुती उपाय केलेले कधीही चांगले. असे बरेच काही उपाय आहेत की जे आपण घरी करून पाहू शकतो.

लहान बाळांमध्ये सर्दी खोकल्याचा संसर्ग खूप लवकर होतो. त्यामुळे ते खूप चिडचिड करतात. मुख्यतः सर्दी खोकल्याचे दोन प्रकार पडतात. 1ओला खोकला आणि 2कोरडा खोकला. ओल्या प्रकारच्या खोकल्या मध्ये कफ आढळतो तसेच कोरड्या प्रकारच्या खोकल्या मध्ये कफ आढळत नाही. दोन्ही साठी काही वेळा वेगवेगळे उपाय असू शकतात. हे उपाय करण्याआधी सर्दी-पडशाचा चे नीट निदान होणे आवश्यक आहे.

नेमके आपल्याला कोणत्या प्रकारचा खोकला आहे त्यानुसार उपाय करावे. खोकला हा संसर्गामुळे पसरू शकतो. लहान बाळांमध्ये संसर्गामुळे खोकला होत नाही पण थंड हवामानामध्ये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कि स्वच्छता राखा आणि वेळोवेळी आपले हात धूत राहा. लहान बाळाला सर्दी खोकला झाला असेल तर या बाळांसाठी नैसर्गिक उपचार पद्धती जरूर वापरून पहा.

जसजशी बाळाची वाढ होत राहते तसतशी त्याची प्रतिकारशक्ती, पचन संस्था आणि श्वसन प्रक्रिया हीसुद्धा विकसित होत राहते. बाळाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे उपाय कार्य करतात. जसे की अर्भका साठीचे उपाय एका वर्षाच्या वयाच्या बाळाला लागू होणार नाहीत. तर काही उपाय नवजात शिशू पासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना लागू होतात.

नवजात शिशु साठी उपाय Sardi Khokala Gharguti Upay

स्तनपान, हा नैसर्गिक अण्णा व्यतिरिक्त कुठलाही उपाय किंवा उपचार पद्धती मोठी नाही. सहा महिन्यातील बाळासाठी हा संसर्गापासून वाचवण्याचा एक कारगर उपाय आहे बाळाला वारंवार तनपान केल्याने त्याचा संसर्गापासून बचाव होतो. आईचे दूध हे बाळाला संसर्गापासून बचाव करते.

नाकातील ड्रॉप, ज्या बाळांना सर्दी मुळे नाकपुड्या बंद होण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी डॉक्टर नाकातील ड्रॉप हा उपाय सांगतात. तुमचे बाल रोग तज्ञ तुम्हाला जवळच्या औषधांच्या दुकानात उपलब्ध असलेले नाकातील ड्रॉप लिहून देतील. परंतु आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही घरी देखील तयार करू शकता ते कसे? एका बॉटल मध्ये गरम केलेले पाणी काढून घ्या त्यामध्ये दीड चमचा मीठ घाला. निर्धारित केलेले थेंब नाकात घालताना बाळाचे डोके तिरपे ठेवा. नाकात घातलेले थेंब बाहेर उघडू नये म्हणून असे केले जाते.

नेझल एसपीरेटर, जर तुमच्या बाळाचे नाव वारंवार बंद होत असेल तर तुमच्या बाळाला सर्दी ची लागण झाली आहे. अशावेळी नेझल ऍस्पिरेटर घेऊन ठेवलेले चांगले. बाळ खूपच लहान असल्यामुळे त्यास सावधान पणे शिकता येत नाही अशा वेळी, नेझल ऍस्पिरेटर नाकातील चिकट पदार्थ शोशून काढतो.

हळद-

आदिमानवापासून हळदीचा उपयोग होत आला आहे. आजही भारतीय पदार्थांमधील हा महत्त्वाचा घटक आहे. थोडीशी हळद गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि बाळा च्या छाती, पोट आणि तळपायावर लावावी. काही वेळानंतर ती धून टाकावी. हळदीची उष्ण असल्याने हळदीची उष्णता नाकातील चिकट पदार्थ पातळ करुन तो नाकातून बाहेर पडण्यास मदत करते.

मोहरीच्या कोमट तेलाचा मसाज, एक कप कोमट मोहरीच्या तेलात, काळातील आणि दोन लसूण पाकळ्या टाका. आणि त्याने बाळाचे हाता पायाचे तळवे, छाती आणि पाठीला मसाज करा. केल्याने बाळाला आराम मिळेल.

9 महिन्याच्या बाळासाठी उपाय-

गुळ जिरे आणि काळे मिरे, याचा काढा केल्यामुळे सर्दी पडसे आणि घसादुखी ला आराम मिळतो. एक किंवा दोन वाटी गोड घ्या. काळे मिरे एक ते दोन. एक चिमूट भर जिरे. आणि थोडंसं पाणी. हे सगळं एकत्र करून पाण्यामध्ये उघडा. नंतर हे मिश्रण बाळाला देण्यासाठी थंड होऊ द्या. नंतर ते एका कपामध्ये काढून घ्या. बाळाला चमच्याने थोडा थोडा काढा देत राहा. काढा थोड्या प्रमाणात दिल्यास तो बाळासाठी परिणाम कारक असतो. बाळाला जास्त काढा पाजू नये.

नारळाच्या तेलाची मालिश, अर्धी वाटी नारळाचे तेल, एक छोटासा पांढरा कांदा, तुळशीची दोन-तीन पाने आणि विड्याची काडी. वरील सर्व घटक नारळाच्या तेलामध्ये टाका आणि ते गरम करा. हे मिश्रण गरम झाल्यानंतर ते कोमट होऊ द्या. नंतर कोमट तेलाने बाळाच्या छाती, पाठ आणि हाता पायाच्या तळव्याला मालिश करा.

एका वर्षावरील बाळांसाठी उपाय-

मध, एका वर्षाखालील बाळांना मध देऊ नका. कारण ते त्यांच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे. कच्च्या मला चिकन पचविण्यासाठी त्यांची पचनसंस्था ही तेवढी सक्षम नसते. त्यामुळे एका वया पेक्षा जास्त बाळा नाच मध पाजावे. सर्दी-पडशाचा सामना करण्यासाठी मध हा एक उत्तम उपाय आहे. मद, मिरपूड, सुखी अद्रक आणि लिंबाचा रस यांसोबत सुद्धा दिले जाते.

मिरपूड चिमूटभर घ्यावे एक चम्मच मध घ्यावे. आणि थोड्या थोड्या वेळाने बाळाला देत राहावे. सर्दी-पडसे यासाठी हे गुणकारी आहे. मध आणि अद्रक. चिमुटभर अद्रकाचे पावडर मधात घालून बाळा द्यावी. मध आणि लिंबाचा रस. ग्लासभर कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यामध्ये एक चम्मच मध घाला. हे खोकला आणि सर्दी दोन्हींना देखील आरामदायक आहे. सकाळ संध्याकाळ हे बाळाला 11 चमक देत रहावे. आपल्याला लवकरच मोकळा झालेलं नाका बघावयास मिळेल.

खिचडी किंवा सूप-

बाळांना सुप खूप आवडतो. पण गरम सूप बाळांना देणे कठीण असते. त्यामुळे खिचडी ह्या मुलांना एक पोषण आहार आहे. हे सर्व प्रकारच्या सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी आरामदायी आहे. त्यामुळे लहान बाळांना दिवसातून एकदा तरी खिचडी खायला द्यावी. खिचडी मध्ये सर्व प्रकारचे पोस्टीक तत्व असतात. खिचडी मुलांना खूप आवडते. आणि ती पचनास सरळ आहे.

विटामिन सी-

मोसंबी, आवळा, लिंबू यांमध्ये विटामिन सी युक्त असतो. लहान बाळांना मोसंबी, आवळा आणि लिंबू यांचा विटामिन सी रस द्यावा. मोसंबीचा ज्युस, आवळ्याचा रस आणि लिंबाचे सरबत थोडं थोडं एक चम्मच मुलांना प्यायला द्यावे. विटामिन डी हे सर्दीच्या जंतूंना मारक आहे. जर मुलांचा घसा खरखर करत असेल तर विटामिन सी युक्त रस बाळांना देऊ नये.

अद्रकाचे पेय-

अद्रकाचा एक तुकडा आणि मिरपूड एकत्र बारीक करा. उकडलेल्या पाण्यामध्ये गूळ घाला. त्यात बारीक केलेले अद्रक आणि मिरपूड घाला व तुळशीची पाने घाला. थोडावेळ उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाळाला कोमट झाल्यानंतर चमच्याने पाजा.

गुळण्या करणे-

सकाळी सकाळी गरम पाणी करा. त्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा दुखी ला आराम मिळतो. असे नियमित केल्याने त्वरित परिणाम होतात. व घसा दुखणे बंद होते.

सर्व वयातील बाळांसाठी उपचार

वाफारा-

कधीकधी बाळांना खूप सर्दी होते त्यामुळे त्यांचे नाक बंद होते. त्यामुळे बाळांना खूप त्रास होतो. बंद नाक उघडण्यासाठी बाळांना शांत करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. तो म्हणजे की त्यांना वाफारा देणे.

गॅसवर थोडे पाणी गरम करण्यास ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये विक्स किंवा कोणत्याही बांबीची डब्बी टाका. एक कपडा घ्या किंवा रुमाल त्याने आपले डोके झाका आणि त्या पाण्यातील वाफेचा वाफारा घ्या. असे पाच मिनिटे केल्याने आराम मिळेल.

बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवणे-

बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवल्याने किंवा बाळाच्या डोक्याखाली छोटीशी उशी ठेवल्याने, बाळाचे नाक मोकळे होण्यास मदत होते. बाळाचा श्वासोच्छवास सुरळीत चालतो.

विक्स वेपोरब-

दोन वर्षाखालील बाळांना वीक्स वापरू नये. त्यामुळे बाळाच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. सामान्य 20 मधील घटक खूप तीव्र असतात. त्यामुळे बाळाच्या शरीराला सेल्समा तयार करण्यात उत्तेजन होते. तथापि दोन वर्षावरील मुलांसाठी विक्स वापरू शकता. सर्दी खोकला झालेल्या बाळासाठी विक्स बाळाच्या पाठीवर, छातीवर आणि पायाच्या तळव्याला लावावे. एक लावल्याने बाळाला शांत झोप येते.

पाणी-

जर तुमचे बाळ पाणी पीत असेल तर तुमच्या बाळाला ओवा, जिरे आणि तुळशीचे पाने घालून उकळून गार केलेले पाणी थोड्या थोड्या अंतराने द्यावे. असे नियमित करावे. त्यामुळे काय होईल की बाळाची पचनशक्ती मजबूत होईल. तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल.

कपडे-

वातावरणामुळे सर्दी पडसा येतो. आज-काल वातावरणात बदल हे साहजिक गोष्ट आहे. त्यामुळे बाळाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला जर सर्दी-पडसे असेल तर त्याला उबदार कपडे घालावे. जर बाळाला सर्दी मुळे ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व या वस्तीत बाळाला पातळ कपडे घालावे.

सजली करण म्हणजे काय?

 

खूप सारं कोमट पाणी, द्रव्य आणि तनपान बाळाला द्यावे सजलन करावे. कारण संसर्ग झालेल्या बाळाला हे पदार्थ स्वीकारण्यात कठीण जात. त्यामुळे पोषण घटकांचाही असलेली द्रव्ये रोग प्रतिकारक यंत्रणा वाढविण्यास मदत करतात.

बाळाला तणावापासून दूर ठेवा-

बाळाला ताण देऊ नका. पण कधीकधी आई-वडिलांच्या भांडणामुळे बाळाला ताण येतो. ते रडायला सुरवात करते. बाळाला आवडेल अशा गोष्टी वारंवार करत राहा. त्यांना खायची जबरदस्ती करू नका. त्यांना जे आवडेल जेवढं आवडेल तेवढं खाऊ द्या. कारण बाळ तणावाखाली राहिलो तर बाळाला बरे होण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यामुळे ही काळजी पालकांनी घ्यावी.

खालील गोष्टींकडे लक्ष द्या !

1.   बाळाचे वय पाहून त्यावर उपचार करा.

2.   बाळाला जर सर्दी पडता झाला असेल तर त्याकडे            दुर्लक्ष करू नका.

3.   औषधे बाळाच्या दूर ठेवावी.

4.   खूप ताप असेल तर वैद्यांचा सल्ला घ्या.

5.   बाळाला ज्या घटकांचे ऍलर्जी असेल ते घटक वापरू        नका.

6.  थंड पदार्थ बाळाला खायला देऊ नये.

आपण वापरत असलेली पद्धतीही परिणाम कारक आहे की नाही याकडे लक्ष द्या. जर ते योग्य कार्य करत असेल तर तिला अंमलबजावणी करा. सत्य ही कोणत्याही गोष्टीची यशाची चावी आहे. हे लक्षात असू द्या. बाळाला भरपूर आराम द्या.

जर सर्दी आणि खोकला एक आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर बालरोग तज्ञांकडे जा आणि त्यांची सल्ला घ्या. योग्य तो औषधोपचार करा. जोपर्यंत मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि शोषण यंत्रणेचा पूर्ण विकास झालेला नसतो तोपर्यंत त्यांची बिमार पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्दी खोकला हे होणे सामान्य बाब आहे. त्यास घाबरू नका पण दक्ष रहा. बाळाची योग्य ती काळजी घेत राहा. धन्यवाद……

Leave a Comment