कारले Karale Benefits in Marathi

चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती नसतील.

कारले भारतात सर्वत्र पिकेते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग भाजीसोबत औषधातही केला जातो. संस्कृत मध्ये कंदुरा, हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये बिटर गार्ड हि वनस्पती कुकर बीटेसी या कुळातील आहे.

कारले हिरवट काळसर हिरवट रंगाची, पांढरट रंगाची, असतात. कारले पिकल्यानंतर आतून लाल व केशरी रंगाची होतात. कारली लहान व मोठी अशी दोन प्रकारची असतात तर रंग भेदामुळे कारलेचे पांढरि व हिरवा असे दोन प्रकार पडतात.

आयुर्वेदात पण कारल्याचे महत्व

आयुर्वेदानुसार कारलं हे पित्तनाशक आहे. कारल्याची पाने ही ज्वरनाशक, कृमिनाशक व मूलत्र आहेत . कारल्या मध्ये लोह ,कॅल्शियम,फॉस्फरस ‘अ’व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. या सर्व गुणांमुळे कारली हे शक्तिवर्धक पुष्टी कारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi in 2021

कारल्याचे उपयोग

कारल्याच्या पानांचा तीन चमचे रस ग्लासभर ताकातून महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी. होतो. यासोबतच कारल्याच्या मुळ स्वच्छ धुऊन वाटून कोंबावर लेप लावल्यास मुळव्याधीचे कोंब नाहीशी होतात . खरूज, खाज, चट्टे ,नायटे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात एक चमचा लिंबू घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा.

नियमितपणे असा रस घेतल्याने रक्त शुद्ध होते त्वचा विकार कमी होतात. मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्याचे बारीक काप करून ती उन्हात सुकून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ संध्याकाळ 5-5 ग्रॅम किंवा अर्धा चमचा नियमितपणे प्यावे यामुळे साखर नियंत्रणात राहते. जंत कृमी झाले असतील तर कारल्याच्या पानांचा रस कपभर नियमीतपणे घ्यावा यामुळे कृमी शौचाच्या वाटे बाहेर पडून जातील.

फेशियल कसे करावे, घरगुती उपाय Facial Tips Step By Step in Marathi in 2021

दारू व्यसन सोडवणारे कारले

दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते, ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याच्या पानांचा रस रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा. दमा, सर्दी ,खोकला अशा श्वसनाच्या तक्रारी असतील तरकारल्याच्या पानांचा व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यामध्ये मध घालावे. हे मिश्रण महिनाभर घेतल्यास विकार कमी होतील . व रोगप्रतिकार शक्ती वाढेल.

कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्याचा रोज सकाळ संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होतो. लघवीचा त्रास होत असल्यास कारल्याच्या कपभर रसात चिमुटभर हिंग टाकून प्यावे . रातांधळेपणा चा त्रास होत असेल तसेच डोळ्यांना क्षीणता आली असेल तर रोज कोवड्या कारल्याचा रस किंवा चूर्ण सकाळी 1-1 चमच घ्यावे.

कारल्याचे दुष्परिणाम

आपल्याला वाटत असेल ती कारले खाणे शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत .कारले खाल्ल्यानंतर मुळा खाणे किंवा मुळ्या सोबत कारल्याची भाजी खाणे ,हे अत्यंत घातक. कारले सोबत मुळा खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कार्ल अतिप्रमाणात खाल्ले तर त्याचे देखील शरीराला विपरीत परिणाम होऊ शकतात ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी कारखाना टाळावे तसेच ज्यांना यकृताचा आजार आहे त्या लोकांनी सुद्धा कारले खाणे टाळावे याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो मधुमेही रुग्णांसाठी देखील कारखाने उपयोगी आहे परंतु हे अति प्रमाणात खाल्ले तर ते त्यांना देखील धोकादायक ठरू शकते.

कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी फळभाजी दुसरी कोणती नसेल.

रोगांवर अचूक उपाय

उन्हाळ्यात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो .

कारल्याचे उपयोग किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात. ह्याचा रस पिल्याने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते . हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे. हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा हवु देत नाही. यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते.

कारला रस (ज्यूस) किती उपयोगी?

लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात. कारल्याचा ज्युस कसा बनवायचा आहे, आपण आता पाहू या प्रथम तीन ते चार मध्यम आकाराचे कारले घेऊन ते स्वच्छ धुऊन त्यातील बिया बाहेर काढून घ्याव्यात. नंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. व नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. त्यामध्ये थोडे मीठ घालून कारले ज्युस तयार. हे ज्यूस पिणे आरोग्यासाठी अनेक गुणांनी उपयुक्त आहे.

कारल्याचा ज्युस हा जेवढा चांगल्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तितकाच उपयुक्त तो शरीराच्या त्वचेसाठी देखील आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल परंतु हे तेवढेच खरे आहे. खाज, जळजळ, सूज येणे तसेच शरीरावर फोड उठणे इत्यादी आजार होऊ न देण्याचे काम कारल्याचा ज्युस करत असतो.

ज्यांना घामोळ्या किंवा पित्ताचा त्रास असेल तर त्यांनी नक्कीच कारल्याचा ज्युस घ्यावा परंतु बऱ्याच लोकांना कारल्याचा ज्युस किंवा कारल्याची भाजी देखील आवडत नाही, म्हणतात ना एखाद्या गोष्टीत जरी शंभर गुण चांगले असले, तरी एक गुण वाईट असला म्हणजे ती पूर्णपणे वाईटच मानली जाते. असे कार्ल्याच्या बाबतीत घडत आहे.

कारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत परंतु ते चवीने कडू असल्यामुळे अनेक लोक कारल्याचं नाव काढले असता वाकडे तोंड करतात. परंतु कारले हे पोटाच्या आजारासाठी गुणकारी औषध आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारल्याचा ज्युस सर्वच बाबतीत गुणकारी आहे.

कारले लागवड

कारल्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पोषक आहे. तसेच वातावरण देखील अनुकूल पाहिजे. शहरी भागात फळभाज्यांना वर्षभर मागणी असते. व्यापाऱ्यांना फळ भाज्यांच्या किमतीत सतत चढ-उतार पहावयास मिळतो. म्हणून शेतकऱ्यांनी मिश्र पीक घेऊन हा तोटा भरून काढण्यास हरकत नाही.

कारल्याची लागवड केली असता त्यासोबतच दोडक्याची किंवा काकडीची देखील लागवड करावी. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून कमी वेळात, कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. व भाजी मार्केटमध्ये फळ भाज्यांचा तुटवडा पडत नाही.

ह्या फळ भाज्या शरीरासाठी पोषक, आवश्यक असणाऱ्या आहेत. मिश्र पिकाची लागवड ही पावसाळ्यात केली जाते. या पिकांना उष्ण व दमट वातावरण मानवत असल्याने त्यांचे उत्पादन वाढते. कारल्याला जास्त थंडीचे वातावरण मानवत नाही. याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर होतो.

कारल्या पासून विविध पदार्थ

कारल्या पासून विविध पदार्थ बनवले जातात. जसे कारले चिप्स, कारले भाजी, कारले पराठा, फ्राय कारले, ग्रेव्ही वाली कारल्याची भाजी, भरले कारले इत्यादी प्रकारात आपण कारल्याची भाजी करून खाऊ शकतो. कारले चिप्स बनवण्याची विधी आपण पाहूया.

मोठ्या आकाराची सहा ते सात कारले घ्यावे. ते स्वच्छ धुऊन घ्यावे. एका कढईत तेल तापायला ठेवावे. तेल मंद आचेवर ठेवावे. व त्या तेलामध्ये कारल्याचे गोल प्रकारात पातळ चकत्या कापून टाकाव्यात पूर्णपणे कडक होईपर्यंत होऊ द्यावेत नंतर काढून त्यामध्ये मीठ, मिरची पावडर, काला नमक टाकून टेस्ट करावेत. हे आरोग्यासाठी व चवीला छान व कुरकुरीत लागतात. अशाप्रकारे विविध पदार्थ बनवून खाणे फायदेशीर ठरेल.

कारला पराठा: पराठा बनवण्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ, एक कप बेसन, साधारण दोन कारले ची पेस्ट करून घ्यावी. त्या मिश्रणामध्ये जीरा पावडर, मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट टाकून गोळा तयार करून घ्यावा. नंतर लाटून तव्यावर परतून घ्यावा. थोडा परतून झाल्यानंतर त्यावर तेल घालावे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतून घ्यावा जर अर्धवट कच्चा राहिला असल्यास पोट दुखी होऊ शकते.यावर तूप घालू नये. खायला खूप चवदार लागतो.

सावधानता : कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात घेणे शक्य होत नाही. अशावेळी खडीसाखर किंवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.

डॉक्टर सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment