Gulvel Giloy in Marathi गुळवेल फायदे

Gulvel गुळवेल (Giloy in Marathi) फायदे सर्वांना जाणून घ्यायचे आहेत. प्रत्येक जण आपले स्वास्थ्य, जीवन चांगले राहावे याकरता प्रयत्न करत असतात. बरेचजण व्यायाम, योगा करतो तसेच कोणी वेगवेगळ्या प्रकारचा काढा करून पीत असतो. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. तर अशाच एका औषधी वनस्पती बद्दल आपण बोलूया ती म्हणजे गुळवेल.

Gulvel (Giloy in Marathi) गुळवेल फायदे

प्रत्येक जण चांगले जीवन जगण्यासाठी धडपड करतो. चांगले जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य ही तेवढेच आवश्यक आहे आणि आपले आरोग्य चांगले ठेवणं हे आपल्याच हाती आहे. हे वेगळं सांगायची गरज नाहीच. मग ते वेळेवर जेवणं असो भरपूर पाणी पिणं असो वा वेळेवर झोपणं असो.

Immunity Power Booster 5 Tips रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय

अनेकदा आरोग्याशी निगडीत अनेक साध्या सोप्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. जसं घरातल्या घरात उपलब्ध असलेली एखादी आरोग्यदायी उपयोगी वनस्पती किंवा पदार्थ म्हणा. आपणं अगदी आटापिटा करत सूर्यफूलाच्या बिया सुपरमार्केटमधून आणा किंवा ब्रोकोलीचं खा. अशी अनेक बाहेरच्या देशातून आलेली फॅडस् फॉलो करत असतो.

मात्र दुसरीकडे आपल्याच परसबागेत अगदी सहज लागवड करता येतील किंवा बाजारात सहज उपलब्ध होतील अशा भाज्यांकडे किंवा वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो. कारण या बहुउपयोगी आणि बहुगुणी गुळवेल औषध अनेक रोगांवर उपयुक्त आहे.

Gulvel आयुर्वेदाची महती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षापूर्वीपासून म्हणजे पार वेदीक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरं तर ही केवळ उपचार पध्दती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन साधून उपचार केला जातो.

कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi

ज्याचा दीर्घकाळासाठी आपले आरोग्य चांगलं राहण्यास फायदा होतो. आयुर्वेदाची पाळंमुळं जरी भारतातील असली तरी जगभरात ह्या उपचार पध्दतीचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन साधल्यास तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला एखादा आजार होतो.

म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखले जाते. त्याबरोबरच आयुर्वेदात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यावर आणि रोगाचे मूळ शोधून त्यावरील उपचारावर भर दिला जातो. ज्यामुळे तुम्हाला आजार पुन्हा होत नाही. आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचारासाठी विविध पध्दतींचा वापर केला जातो. जसं वनौषधींचा वापर, घरगुती उपचार, आयुर्वेदीक औषधं, आहार, मालीश आणि ध्यानसाधना अशा विविध पध्दतींचा उपयोग केला जातो.

केस गळतीवर उपाय

आयुर्वेद हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनला आहे. आयुर्वेदाचा अर्थ दीर्घायुषी आरोग्य आणि वेद म्हणजे ज्ञान असा आहे. दिर्घकाळ आयुष्यासाठी आयुर्वेद खूपच प्रभावी आहे. 5000 वर्षांनंतरही आजही आयुर्वेदातील सर्व उपाय सहज लागू होतात आणि अॅलोपथीप्रमाणे ह्याचे साइडइफ्केटस नाहीत. आयुर्वेदातील सर्वात जुने ग्रंथ म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग ह्रदय हे आहेत. हे सर्व ग्रंथ पंचत्तत्वावर आधारित आहेत.

ज्यामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांचा समावेश होतो. या पंचत्तत्वांचा आपल्यावर मुख्यतः परिणाम होत असतो. हे ग्रंथ आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवनासाठी ही पाच तत्व कशी संतुलित ठेवावी ह्याचे महत्त्व सांगतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तत्वाने प्रभावित होत असतो. याचे कारण असते त्याच्या प्रकृतीची संरचना. प्रत्येकाच्या शारीरिक संरचनेप्रमाणे तीन वेगळे दोष आढळून येतात.

गुळवेल Gulvel म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ही वनस्पती भारत, श्रीलंका  आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.

या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. विविध भाषांमधील या गुळवेलीची नावं पुढीलप्रमाणे लॅटीन नाव- टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया, संस्कृत नाव- गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल, गुजराती नाव-गुलो, हिंदी नाव- गिलोय,गुडीच, इंग्रजी नाव- टिनोस्पोरा आहे.

महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल Gulvel ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेलाची वेल आकाराने मोठी आणि मांसल असते मोठ्या झाडांवर किंवा कुंपणांवर पसरलेली दिसून येते. ह्या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात.

या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. ह्या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात.

फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. ह्या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात.

आयुर्वेदातील गुळवेलाचं महत्व Gulvel,Giloy in Marathi

“गुळवेल Gulvel एक नैसर्गिक अमृतकुंभ .. असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. एक संदर्भ असा ही आहे की, राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले.

पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली.  गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे.

अगदी  नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे. जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. हा वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठी ही ह्याचा वापर केला जातो.

गुळवेलाची Gulvel Leave पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते.

गुळवेल Gulvel बाबत डॉक्टरांचं म्हणणं (Giloy in Marathi)

गुळवेलाचा Gulvel उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायन कल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. गुळवेलीचे खोड फारच औषधी असते. हे खोड आडवे चिरून पाहिल्यास चक्रीसारखा आकार दिसतो. खासकरून तापाच्या उपचारासाठी गुळवेलाचा वापर केला जातो.

कावीळसारखा मोठ्या आजारातून शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी गुळवेलाचा खूपच उपयोग होतो. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते.

गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणाम कारक आहे.
गुळवेलाची घनवटी म्हणजे काय?
घनवटी सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. खासकरून ह्याचा उपयोग रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. चरक संहितेमध्ये गुळवेलीला रसायनकल्प असे म्हंटले आहे.

रसायनकल्प असल्याने हे बुध्दीवर्धक आणि आयुवर्धक आहे. नावावरूनच सिध्द होतं की, घनवटीमधील प्रमुख घटक द्रव्य गुळवेल आहे. गुळवेल ही आयुर्वेदीक चिकित्सेतील एक लोकप्रिय वनस्पती मूळ मानले जाते. ज्याचा वापर विभिन्न प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो.

गुळवेल Gulvel ही सदैव अमर राहणारी वेल आहे आणि ह्याचे अगणित फायदे आहेत. या वेलीचे रस काढून त्याच्या गोळ्या किंवा कॅप्सूल बनवल्या जातात. ज्यालाच गुळवेल घनवटी असे म्हंटले जाते. गुळवेलाच्या अर्कापासून घनवटी बनवली जाते. अर्काला आयुर्वेदामध्ये घन असे नाव दिल आहे. गुळवेल घनवटीच्या निर्मितीमध्ये गुळवेलाच्या फांद्यापासून घन बनवले जाते.

घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या कुटून त्या थोड्यावेळासाठी पाण्यात ठेवण्यात येतात. मग त्याचा काढा बनवला जातो. काढा नंतर गाळून पुन्हा मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळला जातो. त्यांनतर हे घट्ट मिश्रण उन्हात ठेवलं जाते. गोळ्या बनवण्याच्या स्थितीत येईपर्यंत सुकवलं जाते.

त्यानंतर ह्याच्या गोळ्या बनवल्या जातात. ज्यालाच गुळवेल घनवटी किंवा गुडूची घनवटी असं म्हटलं जाते. ताप आणि सर्व प्रकारच्या तापांमध्ये, तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान लागणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे किंवा मंदावणे, यकृत विकार, कावीळ, खोकला होणे, मधुमेह, त्वचेचे रोग होणे, यासारख्या रोगांमध्ये गुळवेलाची घनवटी उपयोगी ठरते.

गुळवेलचा काढा Gulvel Kadha तयार करण्याची कृती:

गुळवेलाची भरड किंवा कांड आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट पाणी घालावे. हे मिश्रण 1/4 होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.

तापावर रामबाण उपाय

कोणत्याही प्रकारच्या तापावर गुळवेल Gulvel हा रामबाण उपाय आहे. म्हणूनच सर्व तापावरील औषधांमध्ये ह्याचा वापर केला जातो.

रोग प्रतिकारशक्तीत वाढ Immunity Power

गुळवेल Gulvel तुमच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.

अन्न पचनास मदत करते

मानसिक तणाव, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टी तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम करत असतात. गुळवेलांमध्ये पचन आणि ताण दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. ह्याच्या सेवनाने भूक ही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.

मधुमेहासाठी वरदान गुळवेल (Gulvel)

जर तुम्हाला मधुमेह Diebeties आहे, तर गुळवेल हे तुमच्यासाठी वरदान आहे. कारण गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक अर्थात साखर कमी करणारे घटक आढळतात. ज्यामुळे रक्तदाब आणि लिपीडचा स्तर कमी होतो. गुळवेलच्या नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होतो. रोज गुळवेल रस प्यायलाने साखर कमी होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर Eyes Benefits

गुळवेल Gulvel ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येला ही वनस्पती दूर करते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करते. गुळवेल वनस्पती पाण्यात उकळून ते पाणी डोळ्याला लावल्यास डोळ्याचे सगळे आजार दूर होतात. गुळवेलाच्या वापराने चष्म्याचा नंबरसुध्दा कमी होतो.

गुळवेलाच्या पानांचा रस मधात घालून डोळ्यांना लावल्यास डोळ्याचे सगळे छोटे मोठे आजार बरे होतात. आवळा आणि गुळवेलाचा रस एकत्र करून प्यायलास नजर तीक्ष्ण होते.

खोकला Cough

खूप दिवस खोकला जात नसल्यास गुळवेलाच्या रसाचे सेवन करावे. हा रस रोज सकाळी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.  खोकला थांबवण्यासाठी उपाय करून पहा.

सर्दी-पडसं, ताप Fever

यासारख्या आजारांमध्ये गुळवेलीच्या खोडाचा तुकडा पाण्यात उकळावा आणि ते पाणी प्यावे. ह्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे अशक्त रूग्णांना वारंवार होणारी सर्दी-पडसं, ताप इ. आजार बरे होतात. आजकाल चिकन गुनियासारख्या व्हायरल तापातून बरे झाल्यावर बऱ्याच रूग्णांना महिनोमहिने गुडघेदुखीचा त्रास जाणवतो.

अशा वेळी गुळवेलाच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो. लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि तापात गुळवेलाच्या पानांचा रस काढून तो दोन तीन वेळा मधाबरोबर चाटण करून द्यावा. लगेच फरक पडतो. तापामुळे अशक्तपणा आल्यास तो दूर करण्यात ही गुळवेल हे गुणकारी औषध आहे.

गुळवेल चे फायदे Gulvel Benefits

1) गुळवेलाचा रस घेतल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अॅनीमिया असलेल्या रूग्णांनी गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्यास फरक पडतो.

2) मधुमेह रोगात ही गुळवेलाचा रस गुणकारी आहे. कावीळ झाल्यास गुळवेलाच्या पानांची पावडर मधाबरोबर घेतल्यास फायदा होतो.

3) कावीळीमुळे रूग्णाला येणारा अशक्तपणा गुळवेल घेतल्यास दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम पडतो.

4) स्त्रियांच्या पाळीदरम्यान गुळवेलाचा रस सेवन केल्यास खूपच लाभदायी ठरतो.

5) गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारूण्यपिटीका, फोड आणि पुळ्या बऱ्या होतात.

6) अंगाला खाज येत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस आणि हळदीचा लेप करून शरीरावर लावावा खाज थांबेल आणि त्वचासुध्दा चमकदार होते.

गुळवेल वनस्पती फायदेशीर असली तरी काही तिचे तोटे आपल्याला जाणवतात.

1) शस्त्रक्रिया झाल्यावर हे गुळवेल याचा वापर टाळावा.

2) जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका.

3) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.

” तुम्हाला आमची माहिती गुळवेल Gulvel,Giloy in Marath विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment