मानसिकता बदलण्याची कारणे व मानसिक स्वास्थ्य, Power of Thinking

आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला चेतना ह्या प्रथम गोष्टीतीचा अनुभव येतो,त्यानंतर भावना, नंतर प्रत्येकाला विचार, व्यवहार व भावनांवर प्रभाव पडण्याचे अनुभव होतातच हे कटुसत्य आहे .

आता अनुभव, एखादी घटना किंवा व्यक्तीला प्रतिसाद म्हणून किंवा आपल्या अपेक्षा किंवा पूर्वानुमान न केलेल्या घटनांचे परिणाम म्हणून समोर येतात. टोकाच्या व अत्याधिक प्रमाणामध्ये आढळल्यास, या अवस्था किंवा लक्षणे काही पूर्वीचे निकष लक्ष्यात घेऊन या निकषांच्या आधारे, मानसिक आजार मानले जातात.

मानसिक आजारांची कारणे विविध म्हणजेच बरीच वेगवेगळी असू शकतात उदा. आपल्या जीवनात एकदम धक्कादायक घटना घडणे, आपल्या जास्त प्रमाणात असलेल्या अपेक्षा, एखाद्या अपघातामुळे झालेले अपंगत्व, आपल्या प्रिय व्यक्तीचे निधन,आपल्याबद्दल जनुकीय घडण विस्कळीत पडणें, आपल्या मेंदूतील दोष किंवा त्याला इजा, विकासात्मक प्रभाव कमी असणे किंवा जास्त असणे, इ. मानसिक आजारावरील उपचार अंतर्निहित कारणावर अवलंबून असते आणि आता त्याच्यामध्ये उपचार म्हणून,
१)समुपदेशन,
२)मानसिक उपचार,
३) संमोहन उपचार,
४) योग्यऔषधोपचार,
५)इलेक्ट्रोकंवल्झिव्ह थेरपी आणि शस्त्रक्रिया

ह्या सामील असतात. प्राप्त मानसिक आजाराचे निवारण करण्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोण ठेवणें, ध्यानधारणा, जीवनातील विविध घटना व तणांवात हातळण्याचे शिक्षण मुलांना देणें, निरोगी आहार, शारीरिक गतिविधी आणि काम व जीवन संतुलित करणारे छंद जोपासणें यांद्वारे शक्य आहे.

आता आपण बसघनसर आहोत मानसिक आजाराची लक्षणे :

प्रत्येक मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात आणि तो त्याचप्रमाणे विचार करतो,त्यामुळे मानवाच्या जे विचार असतात त्या विचारानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजाराची लक्षणे वेगळी असतात.

१)मानवाची अस्वस्थता म्हणजे त्याची लक्षणे :

मानवाच्या अस्वस्थेच्या आजारांची अनेक रूपे असतात, आणि त्यापैकी प्रत्येक रूप आपल्या पद्धतीने वेगळे आहे. अस्वस्थतेत दिसणारी काही सामान्य लक्षणे आपण पुढीलप्रमाणें बघुयात :-

आपला व्यवसाय,पैसा आणि आरोग्य इ. यांसारख्या जीवनातील परिस्थिती आणि घटनांची सतत चिंता राहणें.मानवाच्या झोपेची व्यवस्था विस्कळीत होणें किंवा निद्रानाश होणे.

डोके, अंग किंवा स्नायूंमध्ये निष्कारण वेदना होणे.व्यक्ती अनुभव करू शकेल असे,हृदयाचे ठोके अनियमित, गोंगाटी आणि जलद पडणें मळमळ आणि चक्कर येणें.​​

अवसादाची लक्षणे :-

अवसादग्रस्त मनामध्ये  खूप काही चाललेले असते. त्यापैकी काही निव्वळ दाबलेले विचार असू शकतात, जे स्पष्ट ओळखू येत नाहीत. तथापी, काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये लगेच धोक्याचा गजर वाजू शकतो.दुःख किंवा रिकामेपणाची भावना. खूप खाणें किंवा उपाशी राहणें, ज्यामुळे अनुक्रमे वजनात वाढ किंवा घट होईल. झोप न लागणें किंवा अत्यधिक झोपणें.अशक्तपणाची सतत जाणीव.

शरिरात विविध प्रकारच्या वेदना होणे.तुम्हाला पचनात्मक समस्या निर्माण होणे.तुमच्यामधील आशावादाचे अभाव असणे. तुम्हाला स्वतःच्या अनुपयोगितेची भावना निर्माण होणे.अस्वस्थता आणि अपराधीपण याची भावनातुम्हाला आत्महत्येचे विचार मनात येणे व प्रवृत्ती बिघडणे.

स्किझोफ्रेनिआची लक्षणे

स्किझोफ्रेनिआची लक्षणे व्यक्तीपरत्त्वे वेगळी असतात, विशेषकरून किशोर आणि प्रौढांमध्ये.किशोर वयातील सृष्टीमध्येअस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणें. तुम्हाला झोप न लागणें.एकलकोंडेपणा म्हणजेच एकटेपणा जाणवणे.

तुमचा कामातील उत्साह कमी होणें.

तुमचे शैक्षणिक प्रदर्शन खाली येणें.

प्रौढ व्यक्तींमधील आजार :-

असत्य विश्वास असणे,ठेवणे.

अस्पष्ट, अप्रासंगिक व अपूर्ण संवाद साधणे.

माघारपूर्ण व्यवहार, राग किंवा आक्रमकतेचे झटके येणे, प्रतिक्रियात्मकता दाखवणे .

स्वतःची योग्य निगा व स्वच्छता न राखणें.

सामाजिक एकरूपतेपासून पळणें.

ऑटिझम:

ऑटिझमची विविध लक्षणे असू शकतात, पण दृश्य लक्षणांची संख्या या आजारात कमालीची आहे. यापैकी सर्वांत स्पष्ट दिसणारी आणि सामान्य लक्षणे पुढील पैलूंवर प्रभाव पाडतातः-

संवाद:

यामध्ये उशीर होऊ शकते आणि काही वेळा ते दोन वर्षाच्या वयातही होत नाही, आणि बाळ बोलण्यापासून बोबडेपण्याकडे माघार घेऊ शकते. त्याचबरोबर, मुले आपल्या संवादात भावना प्रकट करण्यास असमर्थ असतात, कटाक्ष समजत नाहीत, बोलवल्यावर प्रतिसाद देत नाहीत आणि संवाद करतांना संवेदना प्रकट करू शकत नाहीत.

व्यवहार: 

सर्वात लक्षणीय सवय म्हणजे पुनरावर्तनात्मक घडण, ज्यामध्ये फडफड किंवा डळमळ सामील असू शकते. मुलांमध्ये अजब वस्तूंशी नजीकपणा असतो. त्यांना अनेक सूचनांचे आकलन होत नाही आणि त्यांच्या एकाग्रतेचा काळावधीफ फार कमी असतो. त्यांच्यात हस्तकौशल्य नसते आणि ते पकड आणि हालचालीमध्ये अव्यवस्थित असतात. प्रकाश, ध्वनी आणि स्पर्शालाही ते खूप संवेदनशील असतात.

समाजात मिसळणें:

मुले साधारणपणें एकटे राहतात आणि मर्यादित किंवा न्यूनतम प्रमाणात समाजात मिसळतात. ते आपल्यातच खूष राहतात आणि दीर्घकाळ एकच कोणतेतरी काम करत राहतात. भावना प्रकट होतील, असे नेत्रसंपर्क ते बनवू शकत नाहीत आणि काही विचारल्यावर एक शब्द किंवा काही शब्दांतच उत्तर देतात.

माघार:

लक्षणांमध्ये सुधार दिसून येऊनही परत मुलाच्या अवस्थेकडे माघार घेणें अतिशय सामान्य आहे.

मानसिक प्रगतिरोधाची लक्षणे :-

याची लक्षणे सामान्यीकृत करण्यास अवघड असतात, कारण ती प्रकाराप्रमाणें वेगवेगळी असतील. काही लक्षणे प्रत्येक प्रकरणात दिसू शकतात, उदा.:बसणें, रेंगाळणें, उभा राहणें आणि चालणें यांसारख्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशीर होतो.उशिरा बोलायला सुरू करणें किंवा अस्पष्ट बोलणें.वयाला साजेसे नसलेले व्यवहार करणे .७०पेक्षा कमी बुद्ध्यांक असणे.दैंनदिन गतिविधी किंवा स्वतःचा सांभाळ करू न शकणें.

स्मरणशक्ती कमी असणें. तर्कशुद्ध विवेकाचे अभाव किंवा कृतींच्या परिणामांचा अंदाज न घेउ शकणें. प्रतिक्रियात्मकता असणें व जिज्ञासा नसणें.निर्भरता आणि कमी स्वाभिमान.एकाग्रतेची उणीव, हट्टीपणा आणि निराशा.सामाजिक गतिविधींत निष्क्रियता आणि माघार. एकाग्रताहीनता व अतीसक्रीयता.
रोगाची लक्षणे :–

एडीएचडीची काही सामान्य लक्षणें याप्रमाणें आहेतःकोणत्याही कामात तुमचे लक्ष न लागणें. तुमची एकाग्रता खूप कमी असणें. कोणत्याही कामातून पटकन लक्ष निघून जाणें. तुमचा विसराळूपणा जास्त प्रमाणात दिसून येणे. तुम्ही नेमलेले काम न करू शकणें. तुम्हाला दिलेल्या सूचना न पाळू शकणें. तुम्हाला थोडा वेळ ही शांत किंवा स्थिर बसणें अवघड होणे.अस्वस्थता आणि लहरी प्रवृत्ती तयार होणे. दुसरे बोलत असतांना व्यत्यय आणणें.

मानसिक आजारावर उपचार कसे करायचे :

अस्वस्थतेसाठी कोणतेही विशिष्ट प्रकारचे उपचार विहित केलेले नाही,म्हणजेच नेमून दिलेली नाहीत कारण वेगवेगळे लोक विभिन्न पद्धतींना अनुकूल प्रतिसाद देतात. तथापी, बहुतांश प्रकरणांमध्ये, उपचाराच्या विभिन्न प्रकारांचे समायोजन वापरले जाते.

सांगोपांग वैद्यकीय सल्ला हे निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे की, परिस्थिती निव्वळ शारीरिक नाही आणि एखाद्या शारीरिक अवस्थेमुळे झालेली नाही.

लक्षणे शमवण्यात मदत म्हणून औषधे विहित केले जात. टोकाच्या प्रकरणांमध्ये अवस्थताशामक औषधांची गरज पडू शकते.

प्रतिसादात्मक व्यवहार उपचारपद्धत व्यक्तीच्या भावना सखोलपणें समजून त्यांना सामोरे जाण्याच्या योग्य पद्धती शोधण्यासाठी वापरली जाते.

अवसादाचे उपचार :–

अवसादाचे उपचार त्रिआयामी असते. उपचाराच्या मुख्य क्रमामध्ये या गोष्टींचा समावेश असतो:

अवस्थेचे उपचार करण्यासाठी अवसादरोधी औषधांचा वापर होतो. त्यांना बहुतांशी तीव्रतेच्या प्रकरणांमध्ये विहित केले जाते आणि मुलांच्या बाबतीत कधीच नाही.

मानसिक उपचार वैय्यक्तिक स्वरूपाच्या समस्यांचे व्यवस्थापन व हाताळणी यावर केंद्रित असते. काही वेळा, सामूहिक पद्धतीचा सल्लाही दिला जाऊ शकतो.

अवसादाला सामोरे जाण्यासाठी  प्रायोगिक उपाय सुचवायला सहकारी,मित्र, शेजारी आणि कुटुंबीयांसारखे साहाय्यगटे महत्त्वाची असतात आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती व्यक्तीला मदत करतात.

टोकाच्या व विक्षिप्त अवसादाच्या प्रकरणांमध्ये, इलेक्ट्रोकंव्हल्झिव्ह थेरपी केली जाऊ शकते.

स्किझोफ्रेनिआ यावरील उपचार :-

स्किझोफ्रेनिआवरील उपचारामध्ये विविध उपाय, समस्येला सोडवण्यासाठी आणि निरंतर सुधाराची खात्री देण्यासाठी अवलंबले जातात. उपचारामध्ये खाली मुद्द्यांचा समावेश असतोः

औषधोपचार:-

एंटी-सायकोटिक औषधे म्हणजे सर्वांत सामान्यरीत्या विहित केली जाणारी औषधे. यामुळे वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना हाताळता येते. एंटीसायकोटिक्स वापरून केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये शक्यतो सर्वांत कमी मात्रेला प्राधान्य दिला जातो.

इलेक्ट्रोकन्वल्झिव्ह आणि चुंबकीय थेरपी :-

हॅल्युसिनेशन होणाऱ्या व्यक्तींना याचा सल्ला दिला जातो.

मानसिक-सामाजिक उपचार :-

ही क्लिष्ट उपचारपद्धत असून यामध्ये प्रतिक्रियात्मक व्यवहार पद्धत, सामूहिक पद्धत, पुनवर्सनसाठी कौशल्यआधारित प्रशिक्षण आणि मद्य व मादक पदार्थांच्या व्यसनाला लढा देण्यासाठी उपचार सामील असतात.

ऑटिझमवरील उपचार :-

ऑटिझमवरील उपचार वास्तविकरीत्या असंभव आहे आणि सर्व वैद्यकीय हस्तक्षेपांचा भर व्यक्ती व कुटुंबाला परिस्थितीला महत्तम तोंड देण्यास सज्ज करण्यावर असतो.

वांछित व्यवहाराला प्रोत्साहन व अवांछित गोष्टींना न्यूनतम करण्यासाठी व्यवहार व्यवस्थापन.

व्यक्तीचे विचार, भावना व अवस्था सामान्य करण्यावर केंद्रित असलेली प्रतिक्रियात्मक व्यवहार पद्धत.

काही प्रमाणात स्वावलंबिता विकसित करून इतरांवर विसंबून राहणें कमी करण्यासाठी कार्यात्मक पद्धत.

सामान्य शारीरिक हालचाली आणि बारीक परिचालनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी शारीरिक उपचार.

वाचेत स्पष्टता आणण्यासाठी व विचार आणि भावना प्रकट करणें शक्य होण्यासाठी वाचिक उपचार.

मुलांना वातावरणात मिसळणें आणि अर्थपूर्ण संबंध बनवणें शक्य होण्यासाठी सामाजिक कौशल्य उपचार.

आरोग्य सुधारून कमतरतेचे रोग टाळता यावेत, म्हणून पोषण उपचार.

आकड्या किंवा अवसाद येत असलेल्या प्रकरणांमध्ये औषधे विहित केली जाऊ शकतात.

मानसिक प्रगतिरोधावरील उपचार :-

यावरील उपचार एक खूप दीर्घ काळाची प्रक्रिया असून, त्यामध्ये नियमित समुपदेशानी गरज असते. विशिष्ट अनुरूपीकृत कार्यक्रम मुलांसाठी विहित केले जातात, जेणेकरून त्यांना शाळेत जाण्यास मदत मिळावी. तेव्हा एका विशेष शिक्षकाची गरज असते, जो न केवल मुलाच्या वैय्यक्तिक गरजांवर लक्ष ठेवणे, तर त्याला जीवनकौशल्य लवकर प्राप्त करण्यास साहाय्यही करेल.

अशा प्रकरणांमध्ये तडजोडीचे महत्त्वाचे निकष म्हणजे शिक्षणातील गोष्टी शक्य तेवढे अधिक अनुभव करायला मुलांना शिकवणें आणि सामाजिक व जीवन कौशल्य सुधारणें. हे उपलब्ध करता यावे म्हणून, खालीलपैकी काही उपचारांच्या समायोजनाचे वापर केले जाऊ शकते:

समुपदेशन :-

विचार बघून पद्धत वापरणे.कार्यात्मक पद्धत काही कृती महत्वाच्या करणे.व्यवहार पद्धत :- या पद्धतीत वैचारिकता दाखविणे.औषधोपचार (खूप कमी प्रकरणांमध्ये)

एडीएचडीवरील उपचार :-

उपचाराचे विभिन्न क्रम असतात, ज्यामध्ये पर्यायी व नैसर्गिक उपचारपद्धतींचा समावेश आहे
. संप्रेरक व बिगरसंप्रेरकांच्या रूपात मेंदूमधील डॉपमाइन किंवा नोरेपाइनफ्रीनचे स्तर वाढवण्यासाठी औषधे दिली जाऊ शकतात. फायदे स्पष्टपणें होत असले, तरी सहप्रभावही होऊ शकतात.

नैसर्गिक उपचारांमध्ये निरोगी आहार, शारीरिक गतिविधींमध्ये गुंतणें आणि झोपेच्या व्यवस्थेचे पालन करणें सामील आहे. योग आणि ध्यानधारणासारख्या कृतींचेही एकाग्रता वाढवण्या आणि तणाव कमी करण्यातील प्रभाव दिसून आले आहे.

आता आपण इतर मानसिक आजारसुद्धा पाहुयात :—
इतर मानसिक आजार

तणावग्रस्त मानसिकता :–

या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणाव, अधिरेपणा, कारण नसता कशाची तरी भीती वाटत राहणे ही याची प्रमुख वैशिष्टये आहेत.


या मानसिक स्थितीबरोबरच इतर शारीरिक लक्षणे (पोटात गोळा उठणे, छातीत धडधड, छाती भरून येणे, श्वास वेगाने चालणे) असतात. विसरभोळेपणा, निद्रानाश, द्विधा मन असणे, वाईट स्वप्ने, कमी भूक, दुबळेपणा, चक्कर येणे, घाम येत राहणे, इत्यादी लक्षणे आढळतात. याचाच आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या गोष्टींबद्दल अवास्तव नावड किंवा भीती (फोबिया) असणे.

ती गोष्ट पुढे आली, की त्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि अवास्तव मोठी प्रतिक्रिया उमटते. उदा. काही व्यक्तींना कीटकांबद्दल नावड असते. एखादा कीटक अंगावर पडल्याबरोबर अशी व्यक्ती ओरडत सुटते. गर्दी, एकटेपण, साप, रात्र,भाषणाचा प्रसंग अशा कशाबद्दलही भीती असू शकते.

नैराश्य:-

अतिनैराश्यापेक्षा हा प्रकार जरा सौम्य असतो. दुःखीपणा आणि काळजी ही याची प्रमुख लक्षणे असतात. थोडेसे निमित्त मिळाले तरी अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा ती उफाळून येतात. थकवा, अशक्तपणा, असहायता, कशातही रस नसणे, आत्मविश्वासाचा अभाव, भूक व झोप कमी, आत्महत्त्येकडे कल अशा लक्षणांपैकी काही लक्षणे असू शकतात. अशा मनोरुग्णांना मानसिक आधार, योगोपचार, औषधे, इत्यादी मार्गांनी चांगला गुण येतो.

रोगभ्रम:-

हा प्रकार जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये आढळतो. याचे वैशिष्टय म्हणजे मनोरुग्ण कोठल्या तरी शारीरिक आजारासारखी लक्षणे दाखवतो. पण असा आजार आहे ही त्याची पक्की खात्री असते. रोगभ्रम हे आजाराचे ‘ढोंग’ नाही, कारण मनोरुग्ण आपल्या विकारांना शारीरिक आजारांचे रूप अजाणता देत असतो, जाणूनबुजून नाही. याचे मूळ कारण म्हणजे काहीतरी वैफल्य, ताण, दुःख,काळजी, भीती आत पोखरत असणे.

शारीरिक लक्षणांवाटे या त्रासाला वाट मिळते.यांतली शारीरिक लक्षणे बहुधा ओळखीची असतात. उदा. वात (दातखीळ बसणे),हातपाय लुळे पडणे (वातविकार), पोटदुखी, छातीत दुखणे, मुंग्या येणे, बधिरता, झटके,अचानक दृष्टी जाणे, ऐकू न येणे, उलटी, ढेकरा, उचकी, खोकला, दम लागणे, इत्यादी लक्षणांपैकी एखादे लक्षण आढळते.

मात्र प्रत्यक्ष तपासणीत संबंधित आजारांच्या खुणा दिसत नाहीत. नातेवाईकांना यामुळे काळजी, भीती वाटते व मनोरुग्णाला अप्रत्यक्षपणे यामुळे दिलासा मिळतो. ही लक्षणे बहुधा आपोआप थांबतात. मात्र कधीकधी त्यांची तीव्रता इतकी असते, की ताबडतोब रुग्णालयात न्यावे लागते. या आजाराचे एक प्रमुख कारण कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा असह्य दबाव हे आहे.

निकृष्ट जीवन जगणा-या सामाजिक स्तरात, विशेषतः स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. असेतरी थोडेफार लक्ष आपल्याकडे दिले जाते, अशी अप्रत्यक्ष भावना यामागे असावी. यात शारीरिक आजार नाही असे एकदा निश्चित व्हायला पाहिजे. यानंतर घरातली किंवा शेजारची हितचिंतक मंडळीही यावर उपचार करू शकतात. यातल्या शारीरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देणे, सहानुभूतीने सुखदुःखाची उकल करणे, हे यातले प्रमुख तत्त्व आहे. यालाच समुपदेशन म्हणतात. मनोविकारतज्ज्ञाची मदत घेणे चांगलेच.

चिंतातुरता विकार :-

हे मानसिक विकाराच्या लक्षणीय भावनांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या चिंतेचा आणि भीतीचा  एक गट आहे.
चिंतातुरता ही एक भविष्यातील घटनांबद्दलची काळजी असते, आणि भीती ही सध्याच्या घटनांची प्रतिक्रिया असते. या भावनांमुळे जलद हृदय दर आणि अशक्तपणा यांसारखी शारीरिक लक्षणे होऊ शकतात.

सर्वसाधारण चिंतातुर विकार,विशिष्ट भीती,सामाजिक चिंतातुर विकार,विभक्त चिंतातुर विकार,
अकारण भीती, घाबरतीचा, आणि निवडक घुमेपणा  यांच्यासह अनेक प्रकारचे चिंतातुरता विकार आहेत. प्रत्येक विकार हा लक्षणांनुसार भिन्न असतो. लोकांना बरेचदा एकापेक्षा जास्त चिंतातुरता विकार असतात.

 

Leave a Comment