या लेखात आपण मेथी खाण्याचे फायदे मेथीचे महत्व पाहू. मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्थांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
Table of Contents
मेथी Benefits of Methi in Marathi
मेथीची भाजी पचायल हलकी असून मेथीच्य भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते.
रिठा चे फायदे मराठी – Top 3 Reetha Fayade in Marathi Aritha Powder Ritha
मेथी पीक
मेथी हे थंड हवामान वाढणारे पीक आहे. विशेषता कस्तुरी मेथीस थंड हवामान मानवते म्हणून हिवाळ्यात ह्या मेथीची लागवड करतात. मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असते तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही.
Swine flu in Maharashtra स्वाईन फ्ल्यू लक्षणे माहिती मराठी
मेथीच्या लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.आपल्याला माहित आहे दैनंदिन जीवनामध्ये विविध पदार्थांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये मेथीचा उपयोग आपल्या आजी-आजोबांना माहिती आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथीचे लाडू बनवून ते खात असत. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहत असे.
आहारात मेथीचे महत्व
ज्यांच्या आहारात मेथी समावेश असतो त्यांना मधुमेह किंवा हार्ड चे प्रॉब्लेम होत नाही. त्यांचे वय देखील 100 पर्यंत असायचे आणि त्या वयातही त्यांचे शरीर मजबूत असायचे राेगप्रतिकार शक्ती आणि डोळ्यांची तेजी कायम असायची.
मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतात. मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी आहे. याचा इतका फायदा आहे की, अगदी पुर्वीच्याकाळापासून आयुर्वेदामध्येही मेथीच्या दाण्यांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जात होता.
शेतकरी मित्रांकारीता एक चांगला ब्लॉग शेतकरी डॉट कॉम नक्की भेट द्या
अजूनही याचा वापर औषधांसाठी करण्यात येतो. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्था लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत.
मधुमेहीग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. तसंच ज्या महिला स्तनपान सध्या करत आहेत त्यांच्या शरीरातील दूधाचं प्रमाण वाढवण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो.
कडू मेथीत आहे बरेच औषधी गुणधर्म
मेथी दाण्यांची चव ही बऱ्यापैकी कडू असते मग याचा सुवास खूपच छान असतो. याशिवाय बऱ्याच आजारांवर मेथीचं पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो.मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात.
तुम्हाला आयुष्यात सतत लहान सहान सर्दी, खोकला, पोटदुखी, सांधेदुखी असे आजार असतील तर मेथीचे दाणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. विशेषतः तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास, मेथी दाण्याने नक्कीच तुम्हाला आरामदायी वाटेल.
यामधील असलेल्या लोह आणि कॅल्शियमच्या पोषकतत्वामुळे हाडांना मजबूती आणि निरोगीपणा मिळतो. तसंच मेथीच्या दाण्यांमुळे येणारी सूज कमी करण्यासाठी जास्त फायदा होतो. तसंच पोटदुखीसाठी एक चमचा मेथी दाणे तव्यावर भाजून गरम पाण्याबरोबर घ्या. तुमची पोटदुखी बंद होईल.
घरगुती उपायांमध्ये करा मेथीचा समावेश
सर्दी आणि खोकला असल्यास, मेथीची भाजी तुम्ही खा, त्याने लवकर हे आजार बरे होतील.मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्यासाठी तुम्हाला एक चमचा मेथी दाणे एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजत घालून झाकून ठेवायचं आहे.
सकाळी हे पाणी तुम्ही रिकाम्या पोटी प्या. रोज हे प्यायल्याने तुमचा मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. तुम्ही नव्यानेच आता आई झालेल्या असाल आणि आपल्या बाळाला स्तनपान करत असाल तर शरीरामध्ये दूध कमी येण्याची समस्या बऱ्याच महिलांना येते. अशावेळी तुम्हाला मेथीचे दाणे आणि मेथीच्या पानांचं सेवन नक्कीच करायला पाहीजे.
हे तुमच्या शरीरामध्ये दूध तयार करण्यासाठी मदत करते. यामधील असणारे विटामिन्स आणि मॅग्नेशियमचे गुण शरीरात दूध अधिक निर्माण करण्यास मदत करतात.मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.
मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
मासिक पाळीच्या वेळेला तुम्ही नेहमी तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांकडून मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला ऐकला असेल पण तो सल्ला उडवूनही लावला असेल. कारण हे पाणी थोडं कडू असतं. पण हा सल्ला न ऐकणं हे तुमच्यासाठी नुकदानदायक ठरू शकते.
मेथीमध्ये असलेले लोह आणि अन्य पोषक तत्व हे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवते. तसंच मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी, त्रास ,मूड नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं.मेथीच्या दाण्यामध्ये असलेली पोषक तत्व तुमच्या हृद्याच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. हे हृदयातील रक्तप्रवाह नियमित करून हृदय निरोगी बनवते आणि ब्लड क्लॉट होण्यापासूनही वाचवते.
तसंच हृदय रोग कमी होण्यासाठीदेखील याची मदत होते. याचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे घ्या. ते उकळून पाणी गाळून घ्या आणि मग त्यामध्ये आपल्या स्वादानुसार मध घाला. मध घातल्यामुळे मेथीचा कडूपणा थोडा कमी होईल तसंच हे पिण्यासाठी सोपे जाईल.
स्त्रियांकरिता फार उपयोगी
शरीराची त्वचा मुलायम बनवण्यासाठी मेथीच्या पानांचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक तर येतेच शिवाय चेहरा मऊ आणि मुलायम होतो. पिंपल्सपासून सुटका मिळवायची असल्यास, आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास मेथीची पानं मिक्सरमधून वाटून लेप करा आणि तो चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातात आणि लवकर परत येत नाहीत.
स्त्रियांचे सौंदर्य म्हटलं की सर्वजण मुलींच्या केसांकडे बघतात. मिती ही जेवढी शरीरासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे ती केसांसाठी सुद्धा तेवढेच पोष्टिक आहे मेथी मध्ये प्रोटिन्स असतात त्यामुळे केसांची वाढ चांगली होते. मेथीमुळे केस गळती कमी होते . डोक्यात कोंडा होत नाही केसांना घनदाट ,मजबूत आणि निरोगी बनवते.
तुमची किस गळती होत असेल तर मेथीची भाजी खावी किंवा मेथीचे दाणे व मेथीची भाजीचे पाना यांची पेस्ट करून केसांना लावा त्याने केस गळती कमी होईल दोन चम्मच मेथीच्या दाण्याची पूड ही नारळाचे दुधात टाका व ते आपल्या केसांना लावा नंतर शाम्पूने डोके धुऊन काढावे. केस काळे व गळनार नाहीत.
मेथी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये खाऊ शकता. मेथी दाणे तुम्ही मसालाच्या स्वरूपात पदार्थांमध्ये वापरू शकता. तसंच मेथीची भाजी बनवून खाऊ शकता. तसंच तुम्ही मेथी वापरून चविष्ट पराठेही बनवू शकता.मेथीचे दाणे शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास, पोटात जंत होण्याची शक्यता असते.
विशेषतः स्तनपान चालू असलेल्या महिलांना याचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. असं होत असल्यास, लगेच तुम्ही मेथी खाणं बंद करायला हवं अन्यथा त्याचा त्रास तुमच्या बाळाला होण्याची शक्यता असते.
मेथीचा जास्त वापर खाण्यात केल्यास, कडू ढेकर, पोटात सूज असे प्रकार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच मेथी खायला हवी. मेथीत भरपूर मात्रेत फायबर आढळतं जे शरीरातून विषारी तत्त्व बाहेर काढण्यात मदत करतं आणि पोटातील कर्करोगापासून बचाव करतं.
मोठ्या आजारांवर करू शकाल मात
एक महिन्यापर्यंत दररोज रात्रभर मेथीदाणा भिजवून सकाळी ते पाणी पिण्याने किडनी स्टोनचा त्रास दूर होईल.आपल्याला केवळ पाण्याने भरलेल्या एका ग्लासात दोन चमचे मेथी दाणा टाकून रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी पिऊन घ्यावे.मेथी ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते.
मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.आपल्या रोजच्या आहारात मेथीचा वापर करायला हवा. मग ती मेथीची भाजी असो वा मेथीचा लाडू किंवा मेथीचा पराठा अशा पदार्थाचा समावेश करावा.
मेथीचा लाडू दिवसातून किमान एक तरी खावा. अंगदुखीवर तो अत्यंत गुणकारी आहे. याशिवाय मेथीचा लाडू बाळंतिणीला अवश्य द्यावा. त्यामुळे वातविकाराच्या त्रासापासूनही मुक्तता मिळते. मेथीच्या पानाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात, आम्लपित्त, बाळंतरोग आणि नेत्ररोग यावरही नियंत्रण राखलं जाते.
मेथीची भाजी अशी करा
मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यात कांदा, दही, साखर घालून एकत्र करावं. चवीसाठी तेलाची फोडणी द्यावी. तिखट आवडत असल्यास त्यात तिखट घालावं. दही न घालता देखील ही पचडी छान लागते. त्यात कांदा, मीठ, तिखट आणि कच्च तेल वरून घालून ती एकत्रित करावी.
या व्यतिरिक्त तुम्ही मेथीचे पराठे किंवा मेथीच्या भाजी पासून सुप देखील बनवू शकता मेथीची भाजी ही विविध भाषांमध्ये देखील केली तरी चालते बेसन भाजी ,मुंग डाळ भाजी ईत्यादी.
सुचना
गरोदर असताना मेथी अजिबात खाऊ नका. मेथी किंवा मेथीच्या भाजीचा समावेश आहारात केल्यामुळे गॅस किंवा पोटाचे आजार दूर होऊन रक्त शुद्ध होते. डॉक्टर सल्ला अवश्य घ्या.