Virus विषाणू

विषाणू हे अनेक प्रकारचे असतात त्यालाच व्हायरस या नावाने देखील ओळखले जाते. विषाणूपासून अनेक प्रकारचे आजार होतात. कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव देखील विषाणूमुळे होतो. तर विषाणू बद्दल काही मनोरंजक तथ्य आपण पाहणार आहोत.

Virus विषाणू

1) विषाणूच्या पाच हजार किंवा त्याहून अधिक जाती अस्तित्वात आहेत. विषाणूच्या प्रसारामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. जसे एड्स, कांजिण्या,  चिकुनगुनिया, डेंग्यू, देवी, पोलिओ, फ्लू, सर्दी, यांसारखे आजार व्हायरस मुळे होतात.

2) प्रत्येक व्हायरसमुळे माणूस मरत नाही. उदाहरणार्थ सर्दीचा व्हायरस Virus शरीरात असेपर्यंत माणसाला बेजार करतो पण सर्दीने माणूस मरत नाही.

3) एकदा व्हायरस त्याचे कार्य उरकून शरीरातून निघून गेला की, माणूस पुन्हा ठणठणीत बरा होतो. इतकी शतके उलटून गेली तरी सर्दी बरी करणारी अजूनही कुठलेही अँटिव्हायरस औषध उपलब्ध नाही.

4) अनेक व्हायरस असे आहेत की, त्यांना नष्ट कसे करायचे हे जोपर्यंत माणसाला माहित पडत नाही तोपर्यंत त्याच्या संसर्गाने माणसे मरतात.

5) व्हायरसमुळे होणाऱ्या ‘एन्फ्लुएन्झा’ सारख्या आजाराने लाखो माणसे मेली. त्यानंतर मात्र ‘फ्लू’ आणि ‘पोलिओ’ यांसारख्या काही आजारांच्या विरोधात लस निर्माण झाली. या रोगाचे सूक्ष्म जंतू मानवी शरीरात शिरण्यापूर्वी लस टोचून घेतली किंवा पोलिओचे ड्रॉप्स घेतले तर हे आजार होत नाहीत.

Interesting Fact About Water पाण्याविषयी माहिती

6) लसीमुळे माणसामध्ये विशिष्ट सूक्ष्म जंतूंबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती निर्माण होते.

7) काही व्हायरस Virus मारण्यासाठी ‘अँटिव्हायरल’ औषधे उपलब्ध असली तरी ती संख्येने कमी आहेत. हेपेटायटिस-सी या आजारासाठी अँटिव्हायरल औषध उपलब्ध आहे, पण ते दुर्मीळ आहे.

8) विषाणूला मारण्यासाठी अँटिबायोटिक्सचा उपयोग होत नाही.

9) मानवाला विषाणूचा Virus संसर्ग होऊ नये, म्हणून इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर माणसाने काही व्हायरससाठी लस निर्माण केल्या आहेत. जसे कांजिण्या, खरूज, गालगुंड, देवी, पोलिओ, फ्लू, रोटाव्हायरस, सर्व्हायकल कॅन्सर हेपेटायटिस-ए आणि बी अशा व्हायरस मुळे होणाऱ्या काही आजारांसाठी माणसाने लस शोधली आहे.

10) विषाणू Virus हा सजीव नसल्यामुळे त्याच्यात स्वतः प्रजनन क्षमता नसते.

11) विषाणू शरीरात शिरला की रिसेप्टरला चिकटतो आणि त्यातून पेशींमध्ये प्रवेश मिळवून पेशींचा ताबा घेतो. व नंतर पेशीची स्वतःचे विभाजन करण्याची यंत्रणा वापरुन विषाणू त्याच्या आवृत्त्या काढतो. या आवृत्त्या कशा काढायच्या याबद्दलच्या सूचना व्हायरसमधील जीन्समध्ये असतात.

12) मानवी शरीरात विषाणू त्याच्या आवृत्त्या काढत असतांना पेशींमधील द्रवपदार्थ वापरून टाकतो. त्यामुळे माणसाच्या शरीरात असंख्य सजीव पेशी मरतात.

13) विषाणूने Virus स्वतःची केलेली नवी प्रत म्हणजे त्याच्यात जातीतला जन्माला आलेला आणखीन एक नवीन विषाणू होय. या पद्धतीने व्हायरसची एक फौज तयार होते. एखाद्या शत्रूने दुसऱ्या राष्ट्राचं सरकार ताब्यात घेऊन आपल्या सूचनेनुसार ते चालवावे आणि त्या देशाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करावा, तशाच प्रकारचे काम या विषाणूंची फौज करते.

14) माणसाच्या शरीरात निर्माण झालेले लाखो विषाणू शरीरातील अवयव खिळखिळे करून माणसाला आजारी पडतात. काही वेळा मृत्यूसुद्धा येऊ शकतो.

15) विशिष्ट प्रकारचा विषाणू माणसाच्या शरीरातील विशिष्ट अवयवावरच हल्ला करतो. उदा. व्हायरस  फुफ्फुसावर  हल्ला करण्यासाठी निर्माण झाला आहे. तो फक्त फुफ्फुसावरच हल्ला करतो. शरीरातील आतडी, जठर, पोट, मूत्रमार्ग, मेंदू, हृदय अशा इतर अवयवांना त्याच्यापासून धोका नाही.

16) विषाणू Virus मारण्यासाठी प्रथम त्याच्या शरीरावर असलेले प्रोटीनचे आवरण नष्ट करावे लागते. असे औषध सापडले तर त्याचा उपयोग अँटिव्हायरल ड्रग मध्ये केला जातो. प्रोटीनचे आवरण नष्ट झाले, की तो विषाणू मानवी शरीरातील कुठल्याही पेशीला चिकटू शकत नाही. म्हणूनच तो माणसाला अपाय करू शकत नाही.

17) एखाद्या विषाणूला होस्ट मिळालाच नाही तर तो काही काळाने स्वतः नष्ट होतो.

18) कुठलीही बाहेरची वस्तू किंवा सूक्ष्म जंतू शरीरात शिरली की, तो शरीराचा भाग नाहीत, हे ओळखून माणसाच्या शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच माणसाची प्रतिकारशक्ती, त्या सूक्ष्म जंतूंबरोबर लढून त्याला संपविण्याचा प्रयत्न करते.

19) या काळात सूक्ष्म जंतूंबरोबर लढा देण्यासाठी शरीरातील श्वेतपेशींची संख्या खूप वाढते. एखाद्या सैन्याच्या फौजेने शत्रूवर हल्ला करावा, तशी या श्वेतपेशींची फौज सूक्ष्म जंतूंवर हल्ला करते.

20) पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात मोठ्या संख्येने अँटिबॉडीज तयार करून शरीरात शिरलेल्या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी त्यांचा हत्यार म्हणून उपयोग करतात.

21) वेगवेगळ्या व्हायरससाठी पांढऱ्या पेशी वेगवेगळ्या अँटिबॉडीज तयार करतात. या लढाईमध्ये माणसाची प्रतिकारशक्ती उत्तम ठरली, तर सूक्ष्म जंतू नष्ट होतो. पण सूक्ष्म जंतू बलाढ्य ठरला तर तो माणसाला आजारी पाडतो.

22) व्हायरसमध्ये असलेल्या जीन्समध्ये कालांतराने बदल होऊन नवीन प्रकारचा व्हायरस जन्माला येतो, ही व्हायरसच्या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आहे.

23) कोरोना व्हायरस हा विषाणूंचा Virus एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे.

24) विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात.

25) कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी उपलब्ध नाहीत.

26) चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा विषाणू सर्वप्रथम आढळला.

27) चीनबाहेरील ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले, ते वुहान शहरातून प्रवास करुन आल्याचं दिसून आल होत.

28) जर्मनी, जपान, व्हिएतनाम आणि अमेरिकेत सुद्धा त्याच वेळी असे काही रुग्ण आढळले. ज्यांना इतर रुग्णापासून झालेल्या संसर्गापासून लागण झाली. असे जवळजवळ आठ रुग्ण सापडले होते.

29) कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकार -च्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. नव्या विषाणूचा शोध लागल्या नंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.

30) अत्यंत गंभीर स्थिती असेल, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर करते. गेल्या काही वर्षात तीन ते चारवेळा अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

31) नव्या कोरोना विषाणूच्या Virus जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. तेव्हा कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळला आहे.

32) सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.

33) स्वाईन फ्ल्यू (2009) : H1N1 व्हायरसने 2009 साली धुमाकूळ घातला होता. जगभरात हा व्हायरस पसरत होता. जवळपास दोन लाख लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

34) पोलिओ (2014) :  पोलिओचे 2012 साली पूर्णपणे निर्मूलन झाल्याचं बोललं जात असतानाच 2013 साली पुन्हा या रोगांना डोकं वर काढलं होतं.
त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी जारी करत वेगानं पावलं उचलली होती.

35) झिका (2016) : अमेरिकेमध्ये झिका व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरला होता की, 2016 साली जागतिक आरोग्य संघटनेनं तात्काळ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जारी केली. व झिकाविरोधात लढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं. झिकाची लक्षणं सौम्य होती, मात्र याचा सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलांना होत होता.

36) इबोला (2014-2019) : पश्चिम आफ्रिकेतील इबोला हा व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यावेळी 11,000 हून अधिक जणांचा जीव इबोला या रोगाने घेतला होता. याची दखल घेता, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2014 ते मार्च 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती.

37) इबोलानं गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो या देशात डोकं वर काढलं होतं. त्यावेळीही सार्वजनिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली होती.

“तुम्हाला आमचा लेख विषाणू Virus विषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

Leave a Comment