10 Adulasa Health Benefits in Marathi अडुळसा औषधी वनस्पती

अडुळसा औषधी वनस्पती-

अडुळसा 10 Adulasa Health Benefits in Marathi हे औषधी वनस्पती खूपच गुणकारी आहे. या औषधी मध्ये असे काही गुण आहेत ते मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत लहान मुलांना कफ झाला असल्यास त्यांचा कप लवकर बाहेर पडत नाही किंवा सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांवर अडुळसा ही रामबाण इलाज आहे.

लहान मुलांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना कप होण्याची दाट शक्यता असते. त्यांना देण्यात येणाऱ्या सिरप असो किंवा इतर औषधी त्यामध्ये अडुळसा या वनस्पतीचा समावेश असतोच.  फार दिवसापासून येणाऱ्या खोकल्यावर व ज्यात बारीक तापही येतो, अशा खोकल्यावर अडुळशाइतके रामबाण औषध नाही.

Virus विषाणू

अडुळसा हे उत्तम सर्वमान्य औषध आहे. 10 ग्रॅम अडुळशाच्या पानांचा रस, 10 ग्रॅम मध व 1/2 ग्रॅम पिंपळीचे चूर्ण एकत्र करून त्याचे चाटण करावे. हे चाटण वरचेवर घेतले असता कफा सारखे विकार तसेच खोकला बरा होतो. कफ पडतो, घसा साफ होतो व बरे वाटते.

श्‍वासावरील विकारात अडुळशाचा रस मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्‍त ठरते. त्यामुळे श्‍वास विकार बरा होण्यास मदत होते. श्‍वास कमी होतो.गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांस देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत, त्यास अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ दिला असता, देवी येण्याची भीती कमी होते. तो घेतल्याने देवीपासून भीती कमी रहाते.

 अडुळसा चे उपयोग-Adulasa Health Benefits in Marathi

ज्या व्यक्तींना दमा या रोगाची शिकायत असते त्या व्यक्तीने अडुळशाच्या पानांचा बिडी करून ओडल्या तर छातीतील कप कमी होऊन किंवा पातळ होऊन त्याला सुखवाह वाटते. तसेच एखाद्या व्यक्तीला जखम झाली असेल तर त्या जखमेवरती अडुळशाच्या पानांचा चोळुन लेप लावल्यास ती जखम भरून निघते.

रक्तपिती झाल्यास नाकातोंडातून रक्त वाहत असल्यास, अडुळशाच्या पानांचा लेप करून डोक्यावरती ठेवावा रक्त वाहने बंद होईल. तसेच डोकेदुखीचा त्रास असल्यास अनुषा च्या पानांचा रस डोक्याला लावावा त्यांनी डोकेदुखी बसेल पानांचा रोज शिकून काढावा उलटीचा त्रास होत असल्यास अडुळशाच्या रसामध्ये खडीसाखर मिक्स करून त्याला प्यायला द्यावा. याने उलट्या करणे बंद होईल.

ज्या प्रमाणात मानव आपली प्रगती घडवून आणत आहे. त्याच प्रमाणात त्यांना विविध रोगांना देखील सामोरे जावे लागत आहे. सर्वच रोगांवर उपयोगी वनस्पती अडुळसा. अडुळसा या वनस्पतींचा आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोग केला जातो. अडुळसा हे सदाहरित झुडप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. अडुळसा सुमारे 4 ते 7 फुट उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात.

कधी बहरतो-Adulasa Health Benefits in Marathi

ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात.उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे .

मुळे, पाने, फुले व फळे यांचा औषधात वापर होतो. मुळ्या व पानांत वासिसीन नावाचे गुणद्रव्ये असून ते जंतुनाशक, कीटकनाशक आहे. अडुळसा, उत्तेजक, कफहारक, कफ पातळ करणारा, खोकला कमी करणारा, दमा, श्वास इत्यादींवर उपयुक्त आहे. क्षयरोग्यास फुलांचा कडेला लागवड करायला हवी. अनेक औषधी कंपन्या ओली किंवा सुकी पाने, साल घेऊ शकतात.

पोटात जंत किंवाआव पडत असल्यास अडुळशाचा रस घेणे उपयुक्त ठरतो.मुळे पाने, फुले, खोडांची साले, हे सर्वच पोटातील जंत बाहेर पाडण्यासाठी उपयुक्त आहेत. साली चा काढा प्रत्येक 30ग्रॅम आवश्यक दिवसातून दोन-तीन वेळेस घ्या किंवा ताज्या पाण्याचा रस दिवसातून एक चमचा तीन ते चार दिवस घ्यावा. अडुळसा या औषधी वनस्पतीचे उपयोग त्वचा रोगावर देखील तेवढाच उपयुक्त आहे.

अडुळशाचा रस वापरण्याची पद्धत:

अडुळशाच्या Adulasa Health Benefits in Marathi पानांचा रस आल्याचा रस तू अहमद यासोबत दरवेळी 15 ते 30ग्रॅम घ्यावा. वाढलेल्या पानांचे चूर्ण दोन ग्रॅम घेतले तरी चालेल किंवा ताज्या पानांचा काढा करून घेतला तरी चालतो खोकल्या मध्ये अडुळसा हे औषध महत्त्वपूर्ण गुणकारी ठरते किंवा सालीचा काढा करून पंधरा ते तीस ग्राम असे दोन-तीन ढोस घेतला तरी चालतो.

काळा अडुळसा-

मुख्यता अडुळशाच्या Adulasa Health Benefits in Marathi दोन प्रजाती आहेत. एक पांढरा अडुळसा व दुसरीजात म्हणजे काळा अडुळसा. तर आता काढून त्याचे फायदे व उपयोग आपण जाणून घेऊया. काळा अडुळसा हा मुख्यतः चिन मध्ये आढळून येतो, परंतु आता भारतात बागेतून शोभेकरिता वाफ्याभोवती लावतात.

काळा अडुळसा सावलीत चांगले वाढतो . याचा वास उग्र व पाने साधी, लांबट खोड, फांद्या व देठ ही गर्द पिंगट असतात. फुले आकाराने छोटी, फिकट व शोभेच्या दृष्टीने फार सुंदर असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे नवीन लागवड कलमांनी लवकरात होते. पाने कडू व उष्ण असून कावीळ व हगवण यां रोगांवर देतात.

जुनाट संधिवातावर पाने व कोवळ्या पाल्याचा काढा गुणकारी आहे. तसेच डोकेदुखी या रोगावर देखील काळा अडुळसा उत्तम प्रकारचा औषध आहे. डोकेदुखीचे अनेक कारणे आहेत. ताप आल्यामुळे किंवा शरीरातल्या पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होण्याची संभावना असते.

काळा अडुळसा उपयोग- 10 Adulasa Health Benefits in Marathi

या आजारावर काळा अडुळशाचे पाच-सहा पाने वाळवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. त्यामध्ये गुळ टाकावा. त्याची छोटी -छोटी गोळी बनवून सकाळ-संध्याकाळ घ्यावे. असे केल्याने डोकेदुखी निघून जाईल.

दात दुखत असेल तर अनुसया च्या ताज्या पानांचा रस जिथं तूप कीड लागलेली आहे त्या दातावर टाकावा त्याने दातातील जंतू मरून जातील त्रासांपासून मुक्ती मिळेल तसेच या पानांचा काढा करून त्या पाण्याच्या काढ्याने गुळण्या टाकायच्या. यांनीदेखील दातांना आराम मिळतो.

शरीरावर फोड येत असेल, तर त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये अडुळशाच्या पानांचा कोवळ्या पानांना वाटून त्याचा लेप लावा. तसेच खाज येत असल्यास, अडुळशाची काही कोवळी पाने घेऊन, त्यामध्ये हळद व गोमित्र टाकून त्याची पेस्ट बनवून किंवा बारीक लेप करून जिथं खाजआहे तिथं लावा. तसेच अडुळशाचा रोल कावीळ सारख्या रोगांवर देखील उपायकारक आहे तू कसा घ्यायचा ते आपण पाहूया.

अडुळशाचा पंचम म्हणजेच पाने , फुले खोड मूळ व त्यामध्ये खडीसाखर किंवा मध घालून त्याचा बारीक वाटून रस काढावा. व रस सकाळी उपाशी पोटी 15 ग्रॅम द्यावा. असे चार ते पाच दिवस दिल्याने कावीळ हा रोग बरा होतो. खोकल्या ने घसा बसला असेल, तर अडुळशाच्या पाण्यामध्ये मध घालून तो रस पोटात घ्यावा. त्याने आवाज देखील स्वच्छ व साफ होईल.

अडुळशाचा पाला हा ताप नाशक व उलटी नाशक आहे. अडुळसा या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खोकल्याला खूप महत्त्वपूर्ण औषध आहे तसेच या औषधी चा उपयोग आहारामध्ये त्यांच्या फुलांची भाजी करून देखील केला जातो.

झाड असते छोटे पण काम करते मोठे-

अडुळसा Adulasa Health Benefits in Marathi हे दोन-तीन फूट उंचीचे छोटीसी झुडूप असते ही वनस्पती सदैव व हिरवीगार असते तिला फुले व टोकाला फळे असतात.या वनस्पतीची लागवड पावसाळ्यामध्ये केलेली उत्तम राहील तसेच दोन ते तीन महिन्यात पाने काढण्यास सुरुवात केली तरी चालेल.

या वनस्पतीवर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. पानांची किंवा फुलांची कापणी ही पानांच्या गरजेनुसार करावी दर 12 महिन्यानंतर फुले, पाने, खोडे यांची छाटणी करून, ही सावलीमध्ये वाळवून त्याची पावडर तयार करावी.

हे पावडर कडू असल्याने त्यामध्ये बुरशी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. अशाप्रकारे अडुळसा या औषधी वनस्पती पासून शेतकरी बांधवांना नफा मिळू शकतो. म्हणून अडुळसा या वनस्पतीची लागवड केली तरी फायद्याचीच आहे.

सूचना :

अडुळसा ही वनस्पती अनेक रोगांवर गुणकारी असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यांनी शरीर प्रकृती चांगली राहील. इतर औषधांचा विपरीत परिणाम होणार नाही. डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या जर आपल्याला अडुळसा ऍलर्जी असेेेल तर.

हे आपल्याला माहिती आहे का?

Leave a Comment