पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करा घरबसल्या ……….

कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार असो तिथे पॅन कार्ड(PAN Card) आधारकार्ड (Aadhaar Card) लिंक ( aadhar card link to pan card online ) असणे आवश्यक असते. त्यामुळे ते आता सर्वांना करणे देखील बंधनकारक आहे. पॅन कार्ड आधारशी लिंकसाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता सरकारने ती वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत केली आहे.

मात्र आता 30 सप्टेंबरपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

घरबसल्या आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करा | aadhar card link to pan card online

आधी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा.
जेव्हा आपण या वेबसाइटवर क्लिक करता तेव्हा थेट होम पेजवर जाल.
येथे तुम्हाला डाव्या बाजूला लिंक आधार पर्याय दिसेल. आपल्याला हा पर्याय निवडावा लागेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर, आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
तिथे तुम्ही पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर माहिती भरा. यानंतर कॅप्चा कोड भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल. आपण क्लिक करताच आपलं पॅन आणि आधार लिंक झाला असल्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

SMS पाठवून पॅन-आधार लिंक करू शकता | aadhar card link to pan card online

आपल्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नसल्यास आपण एसएमएस पाठवून पॅन आणि आधार कार्डला लिंक देखील करू शकता. यासाठी आपल्याला नोंदणीकृत क्रमांकावरून UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर एसएमएस पाठवावा लागेल. हे केल्यावर, आपल्याला मेसेजद्वारे पॅन आधार लिंक झाल्याची माहिती मिळेल.

आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार?

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा.

1 thought on “पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करा घरबसल्या ……….”

Leave a Comment