भारतात आयुष्मान ( ayushman card online apply ) भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागणार आहेत. हे आयुष्मान कार्ड बनवणं आता आणखी सोपं झालं आहे.
लाभार्थी UTIITSL केंद्रांवर PM-JAY अंतर्गत त्यांचे ‘आयुष्मान कार्ड’ बनवून घेऊ शकतात. त्यासाठी काही पात्रता ठरवली गेली आहे. यासाठी पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि या योजनेअंतर्गत येणाऱ्या यादीतील हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.
तुम्ही या योजनेसाठी आणि कार्डसाठी ( ayushman card online apply )पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी जवळच्या UTIITSL केंद्राला भेट द्या आणि जाणून घ्या. तुम्ही अधिक जाणून घेण्यासाठी 14555 वरही कॉल करू शकता. आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही विशेष नोंदणी प्रक्रिया नाही. RJBY योजनेअंतर्गत SECC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व लाभार्थ्यांना PMJAY लागू आहे, अशीही माहीती आहे.
आयुष्यमान भारत योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी..
▪️ सर्वप्रथम पीएम जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट mera.pmjay.gov.in ला भेट द्या.
▪️ येथे तुम्हाला डाव्या हाताला LOGIN लिहिलेले दिसेल, जिथे मोबाईल नंबरची माहिती विचारली जाईल.
▪️ एंटर मोबाईल नंबरसह कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरा, तोच टाका. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल.
▪️ आता आपले राज्य व जिल्ह्यावर क्लिक करावे लागेल. आपले पूर्ण नाव, रेशन कार्ड क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुमच्याबद्दलची माहिती शोधा.
▪️ हा शोध घेतल्यानंतर जी माहिती समोर येईल, त्या आधारावर तुम्ही आणि तुमचे कुटुंब या योजनेत समाविष्ट आहे की नाही, हे तुम्ही पाहू शकाल.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम आरोग्य योजना (PMAY) द्वारे आयुष्मान कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे तुमच्या कुटुंबाला एका वर्षात कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. पीएमएवाय अंतर्गत सरकारने देशभरातील निवडक रुग्णालये सूचीबद्ध केली आहेत, ज्याची माहिती पीएम जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत समावेश असेल, तर तुम्ही वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता.
Room. No. 1281 sai baba Nagar jr boricha marg neyar dhobighat satrasta Mumbai Maharashtra 400011
My ayushman Bharat Card
Good