तुळशीचे पान चावून का खाऊ नये?

तुळशीचं रोप (Basil Benefits) 24 तास ऑक्सिजन देतं हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तसेच भारतीय संस्कृती, हिंदूधर्म आणि आयुर्वेदात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. तुळशीत खूप सारेऔषधी गुण असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, पोटदुखी, मलेरिया, अनियमित पाळीचा त्रास आणि इतर लैंगिक आजार दूर होण्यास मदत होते. पण तुळस कशी खावी देसुद्धा आयुर्वेद सांगतो. थेट चावून तुळशीची पानं खावू नका.

तुळशीचे पान चावून का खाऊ नये?

तसेच तुळशी रक्त शुद्ध करते, पचनशक्ती सुधारते आणि इम्युनिटी वाढवण्यातही मदत करते.

बरेच जण तुळशीची पानं चावून खातात. मात्र, तुळशीची पानं चावून खाणाऱ्यांना बहुतेक वेळा हे माहीत नसतं की ती चावून खाल्ल्यामुळे त्यांच्या दातांना हानी पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊ या तुळशीची पानं चावून खाल्ल्यास काय नुकसान होतं. तसंच तुळशीचं सेवन कसं करायचं याबद्दल.

तुळशीची पानं चावून खाल्ल्यास काय होतं?

तुळशीच्या पानांचं सेवन अनेक आजार दूर करण्यासाठी केलं जातं. तसेच काही जण इम्युनिटी वाढवण्यासाठी पानं रोज सकाळी चावून खातात. मात्र, ही पानं दातांनी चावून खाऊ नये. तुळशीच्या पानात मोठ्या प्रमाणात मर्क्युरी म्हणजेच पारा आणि लोह असतं तसेच काही प्रमाणात अर्सेनिक असतं.

जेव्हा आपण तुळशीची पानं चावून खातो, तेव्हा हे पदार्थ दातांच्या थेट संपर्कात येतात आणि त्या दातांना हानी पोहचवू शकतात. यामुळे दात खराब होऊ शकतात किंवा दातांसंबंधी इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे तुळशीची पानं कधीच चावून खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही तुळशीची पानं पाण्याच्या मदतीनं गिळू शकता. तसेच खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करून तुळशीचे सेवन करू शकता.

चावून खाण्याऐवजी अशी खा तुळशीची पानं

1)तुम्ही तुळशीची पानं बारीक करून चहात टाकू शकता.

2)तुळशीची पानं पाण्यात उकळून घ्या आणि त्याचं सेवन करा.

3)तुळशीची पानं बारीक करून पाण्यात टाकून ते पाणी प्या.

4)तुळशीचे सेवन करण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या तुळशी टॅबलेट घेऊ शकता.

5)तुम्ही बाजारात मिळणाऱ्या तुळशी पंचांग ज्यूसचे सेवन करू शकता.

6)तुळशीची पानं सावलीत वाळवून त्याची पावडर करून त्याचं सेवन करू शकता.

तुळस घरात असल्यास ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. तसंच हवादेखील शुद्ध राहते. त्यामुळे या गुणकारी तुळशीचं सेवन करताना वरील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

हे पण वाचा : प्यारी खबर 

Leave a Comment