आता आपण कोरोना टेस्ट करु शकणार घरीच Corona Antigen Test – ICMR

कोरोनामुळे हाहाकार माजला असून अशा परिस्थितीमध्ये आपणास करुणा ची लक्षणे जर असतील तर आपण कोरुना टेस्ट करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. टेस्ट (Corona test) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test). आरटी-पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) ही विविध ठिकाणी जाऊन केली जाते. ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. पण आता तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोना टेस्ट करू शकता.

लोक घरीच अँटिजेन आता करु शकणार आहेत.

1)होम टेस्टिंग केवळ लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठीच आहे, तसेच जे लोक प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.

2)होम टेस्टिंग कंपनीने दिलेल्या मॅन्युअलनुसार होईल

3)होम टेस्टिंगसाठी मोबाईल अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल.

4)मोबाइल अॅपद्वारे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवाल प्राप्त होतील.

5)जे होम टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट स्ट्रिप पिक्चर घ्यावा लागेल आणि त्याच फोनवरून फोटो घ्यावा ज्यावर मोबाईल अॅप डाऊनलोड केलं आहे.

6)मोबाइल फोन डेटा आयसीएमआर टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल

7)रुग्णांची गोपनीयता राखली जाईल

8)या चाचणीच्या माध्यमातून कोणाचा पॉझिटिव्ह येईल, त्यांना पॉझिटिव्ह मानले जाईल आणि कोणत्याही टेस्टची आवश्यकता भासणार नाही.

9)जे पॉझिटिव्ह असतील त्यांना होम आयसोलेशन संदर्भात आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील.

10लक्षणे असणाऱ्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर करावी लागेल.

11)सर्व रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह लक्षणे असणाऱ्यांना संशयित केस समजले जाईल आणि जोपर्यंत आरटीपीसीआरचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.

12)होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी MY LAB DISCOVERY SOLUTION LTD ही पुण्यातील कंपनी अधिकृत करण्यात आली आहे.

13)या किटचे नाव COVISELF (पॅथोकॅच) आहे

14)या किटच्या माध्यमातून लोकांना नाकातून स्वॅब घ्यावा लागेल

घरीच चाचणी करणाऱ्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागणार आहे आणि ज्या फोनवर होम टेस्टिंग मोबाईल अॅप डाउनलोड केलेला आहे. त्याच फोनवर फोटो हा टाकवा लागणार आहे. तुम्ही टाकलेला डेटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाणार आहे. त्या डेटा बद्दल गोपनियता ठेवण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. यासंदर्भात आयसीएमआर आणखी विस्तृत माहिती देणार आहे. या संदर्भात आयसीएमआरने एक लिंक देखील शेअर केली आहे. www.icmr.gov.in/chromecare.html. अशी ही लिंक आहे.

या टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानलं जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही. असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानलं जाईल आणि आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.

Leave a Comment