कोरोना लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करा व्हाट्स अपवर ………

कोरोना संकटातून देश हळुहळू सावरत आहे. कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. देशातील अर्ध्या अधिक जनतेला कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे सगळे व्यवहार रुळावर यायला लागले आहेत.. लोक पुन्हा एकदा सगळे काही विसरुन कामावर हजर होत आहेत.

अशा वेळी तुम्हीही घराबाहेर पडण्याचा विचार करीत असाल, परदेशात वा देशांतर्गत कुठे फिरण्याची तयारी चालली असेल, तर तुमच्याकडे कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट सोबत असणे गरजेचे आहे.

आतापर्यंत कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरण सर्टिफिकेट( corona vaccine certificate download ) काढता येत होते. मात्र, आता भारत सरकारने व्हॉट्स अॅपशी भागीदारी केली असून, त्यामुळे कोरोना लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी केलीय.

म्हणजे आता तुम्हाला व्हॉट्स अॅपच्या माध्यमातूनही कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे. ते कसे डाऊनलोड करायचे, याबाबतची माहिती सोप्या पद्धतीने समजून घेऊ या..

व्हॉट्स अॅपद्वारे असे मिळवा सर्टिफिकेट | corona vaccine certificate download on whatsapp

– सर्वप्रथम MyGov Corona Helpdesk WhatsApp क्रमांक +91 9013151515 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.
– फोन क्रमांक सेव्ह झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्स अॅप सुरु करा.– चॅट लिस्टमध्ये MyGov Corona Helpdesk WhatsApp क्रमांक सर्च करा.
– आता तुम्ही चॅट सुरु करा.
– चॅट लिस्टवर Download Certificate टाइप करा.– WhatsApp चॅटबॉट पुन्हा तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवेल.
– OTP वेरिफाय करा आणि तो दाखल करा.– आता चॅटबॉट तुमचे कोरोना लसीकरण सर्टिफिकेट तुम्हाला व्हॉट्स अॅपवर पाठवेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे.– जर चॅटबॉट सर्व्हर Error दाखवित असेल, तर तुम्हाला अधिकृत कोविन पोर्टलवर किंवा आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावरुनही ते डाऊनलोड करता येणार आहे.

Leave a Comment