कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांकडे कसे लक्ष द्यावे? Corona Virus

Corona Virus – दुसरी लाट चालू आहे, तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही?  म्हणून लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपण कसे वाचू शकतो? तेच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांकडे कसे लक्ष द्यावे?

तिसऱ्या लाटेचा धोका समजून घेता लहान मुलांना यापासून आपण त्यांना नक्कीच वाचवू शकतो. लहान मुलांचे लसीकरण होणे सध्या शक्य नाही म्हणून आपण आपल्या मुलांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे म्हणतात की, पालकांनी कोरोना च्या तिसऱ्या लाटेकडे लक्ष दिल्यापेक्षा आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, तरच आपण आपल्या मुलांना कोरोना पासून दूर ठेवू शकू.

पित्तावर घरगुती उपाय

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची फिकीर असते. म्हणूनच प्रत्येक आई वडील बाहेर गेल्यानंतर स्वतःला खूप जपत आहेत. कारण त्यांना परत घरी यायचं असतं आणि घरामध्ये आल्यानंतर लहान मुलं असतात म्हणून आपल्यापासून आपल्या मुलांना संसर्ग होऊ नये, याकरता आई-वडील खूप काळजी घेतात.

लहान मुलांना खूप वेळा थंडी, ताप, खोकला, सर्दी, उलटी, पोट दुखी अशा प्रकारची लक्षणे नेहमीच आढळून येत असतात म्हणूनच आपल्या मुलाला कोरोना झाला काय असा आपल्याला भ्रम सुद्धा होऊ शकतो. अशी लक्षणे आपल्याला आढळल्यास ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क करावा.

डॉक्टर बोलावतील त्यावेळेस त्यांच्याकडे जावे. शक्यतोवर डॉक्टरांशी व्हिडिओकॉल द्वारे संपर्क करावा. डॉक्टर आणि करोनाची लक्षणे सांगितली तरच करून अशी चाचणी करून घ्यावी. कितीही महत्त्वाचे काम असले तरी घर सोडून मुलांना बाहेर जाऊ देऊ नाही. स्वतः सुद्धा खूप अर्जंट असल्याशिवाय लहान मुलांना बाहेर घेऊन जाऊ नये.

पहिल्या लाटेमध्ये बघता कोरोना लहान मुलांना धोकादायक नव्हता. कारण मुलं खूप कमी संपर्कात आल्यामुळं संसर्गात नव्हती. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना 1% संसर्गाची असू शकते. मात्र आता तिसऱ्या लाटेचा धोका पाहता लहान मुलांच्या आहारावर किंवा त्यांच्या इम्युनिटी शक्तीवर भर देणे खूप जरुरी झाले आहे. लहान मुलांना चांगले झोपू द्यावे म्हणजेच दहा तास तरी झोपू द्यावे.

सकाळी उठल्याबरोबर त्यांना व्यायामाची सवय लावा आणि सकस आणि भरपूर आहार द्या. त्यामुळे लहान मुलांची इम्युनिटी पावर immunity power वाढेल.

कोरोना काळात आपण कोण-कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ते खालील प्रमाणे आहेत.

लहान मुलांकरता काय करावे?

1)मुलांना बाहेर जाऊ देऊ नये.

2)मोबाईल पासून त्यांना दूर ठेवा हात स्वच्छ.

3)ठेवायला सांगा जास्त वेळ झोप घेऊ द्या.

4)कोणाच्या संपर्कात येऊ देऊ नका.

5)सकस आहार द्या.

6)स्वतः व्यायाम करून घ्या.

7)आपल्या मुलांसोबत वेळ घालवा.

8)सॅनिटाईजरपेक्षा साबणाने हात धुवायला सांगा.

9)अंतर ठेवायची सवय लावा

Leave a Comment