Daily Yaga Benefits in Marathi 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने

10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi आजची तरुणाई फिटनेस ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाय करत असतात. त्यामध्ये योगा, जिम किंवा डाईट अशा प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. मात्र शरीराच्या स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य देखील तेवढेच महत्वाचे आहे.

10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi

10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi

हे स्वास्त केवळ आपल्याला योगा मधूनच मिळू शकतो. हे संपूर्ण जगाने मान्य केलेल आहे. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगासन कसे करावे व योगा करण्याच्या काही पद्धती आहेत, ते आपण पाहू.

केवळ दहा ते पंधरा मिनिटात तुमच्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होईल असा हा योग आहे. जसे योगामध्ये मानेचा व्यायाम पाठीचा व्यायाम हाताचा व पायाचा किंवा कमरेचा व्यायाम आणि मानसिक शांतता हे केवळ योगा मधूनच आपल्याला मिळू शकतात.

तुम्ही स्वतःला दहा ते पंधरा मिनिट जरी दिले तरी खूप आहे. बऱ्याच जणांना व्यायाम करण्याकरिता वेळ मिळत नाही. अशा लोकांकरिता केवळ 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi सकाळी उठल्याबरोबर आंथरुणातच देखील हे व्यायाम करू शकतात. योगा करू शकतात. या योगाची सुरुवात मॉर्निंग एक्सरसाइजने करतात.

 मानेच्या व्यायामाचे प्रकार  Daily Yaga Benefits in Marathi

सुरुवातीला सरळ उभे राहून, मान हळूहळू वर न्यायची आहे तसेच हळूहळू मान खाली आणायचे आहे आणि आपल्या हृदयाला टेकून ठेवायची आहे. पुन्हा वर न्यायची आणि पुन्हा तसेच आधी सांगितल्याप्रमाणे असे चार-पाच वेळा करायचं. त्यानंतर मान उजव्या खांद्यावरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर डावीकडे असं एक-दोन वेळा हा व्यायाम करायचा. त्यानंतर मान ट्विस्ट करायचं योगा. पहिल्यांदा उजवीकडे मान न्यायची आणि थोड थांबायचे आहे.

नंतर हळूहळू डावीकडे मान वळवायची तिथे थोडा थांबायचं आणि पुन्हा उजवीकडे हळूहळू न्यायचे हे सुद्धा चार-पाच वेळा करायचं. त्यानंतर वर्तुळाकार मध्ये मानेचा व्यायाम करायचा आहे. म्हणजेच उजवीकडून पुन्हा उजवीकडे मान फिरवून बरोबर गोल आकारामध्ये आपल्याला मानेचा व्यायाम करायचा आहे.

हा व्यायाम करत असताना हळूहळू मान गोल आकारामध्ये फिरवायची किंवा वर्तुळाकार यामध्ये फिरवायचे हा झाला आपल्या मानेचा व्यायाम. आता आपण खांद्याचा व्यायाम कसा करायचा त्याची कृती पाहणार आहोत. सर्वात आधी हात आपल्याला सरळ समोरच्या दिशेने सरळ करून घ्यायचे आणि पाय जवळजवळ करून घ्यायचे.

समोरून मागून असे गोल आकारामध्ये आपल्याला हात फिरवल्यानंतर आता याची उलटी दिशा आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर आता पाठीचा व्यायाम कसा करायचा हे जाणून घेऊया. त्यासाठी आपल्या हात सरळ शरीराजवळ लॉक करून घ्यायचे आहेत.

पायामध्ये एका फुटाचे अंतर ठेवायचं. पाट सरळ ठेवायची. आधी डावीकडे वळायचं आहे आणि तिथे तीन सेकंद पर्यंत थांबायचा आहे. नंतर पुन्हा उजवीकडे असंच तीन मिनिट तीन सेकंद थांबायचं आहे. यामुळे तुमच्या पाठीला आराम मिळेल.

साइट्स चे एक्ससाइज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवायचं डावा हात कमरेवर ठेवायचा आहे आणि उजवा हात डावीकडे जेवढे झुकता येईल, तेवढे झुकायच आहे. त्यानंतर डावा हात वर करून उजवा हात कंबरवर ठेवायचं आणि उजवीकडे जेवढे झुंजता येईल तेवढे झुकायचं. झूकल्यानंतर तिथं पुन्हा 5 सेकंद थांबायचं आहे.

कमरेचा व्यायाम – 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi

कमरेचा व्यायाम करताना दोन्ही पाय जवळ असणे गरजेचे आहे. हळूहळू हाताने पायाचे अंगठे धरण्याकरिता झुकायचं आहे. या अवस्थेत तीन सेकंद थांबायचा आहे. नंतर पुन्हा हळूहळू मागच्या बाजूला झूकायचे आहे आणि तिथे सुद्धा तीन सेकंद थांबायचा आहे.

हळूहळू पुन्हा आपल्या मूळच्या स्थितीत यायचं आहे. यानंतर पायाचा व्यायाम आपण पाहणार आहोत. पायाचा व्यायाम करताना आपल्या पायामध्ये थोडे जास्त अंतर घ्यायचे आहे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. नंतर डाव्या पायात नव्वदच्या कोणात उजव्या पायावर खाली सरळ झुकायचा आहे.

तिथं पाच सेकंद थांबायचे आहे. हीच कृती पुन्हा दुसऱ्या बाजूने करायचे आहे. हा व्यायाम तुम्ही केवळ दहा ते पंधरा मिनिटात करू शकता आणि प्रत्येक एक्झरसाइजला कमीत कमी एक एक मिनिट जरी तुम्ही वेळ दिला, तरी तुमच्या शरीरासाठी तो संपूर्ण फायदेशीर ठरेल. तुम्ही सकाळी हा योगा केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही इतर व्यायामाची गरज पडणार नाही.

हा व्यायाम तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आनंद मिळेल आणि एकदा सवय झाली की, मग तुम्हाला याच्यामध्ये रुची सुद्धा वाटायला लागेल आणि उत्साहाने तुम्ही दररोज हा व्यायाम करण्यास तयार व्हाल. व्यायाम केल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये काही बदल घडून आल्याचे दिसेल.

यामध्ये आपण मानेचा व्यायाम दिलेला आहे. तर त्यांना थायराईट आहे किंवा ज्यांच्या मानी मध्ये काही लचकलेली असेल, त्यांनी केवळ डॉक्टरचा सल्ला घेऊनच मानेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करायचा.

पाठीचा व्यायाम  Benefits of Yoga

आपण पाहतो की, दैनंदिन जीवनामध्ये बसण्याचे काम ज्या व्यक्तींना जास्तीत जास्त करावे लागते, त्यांच्यासाठी पाठीचा व्यायाम हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. पाठीमध्ये चमक भरली असेल, तर तुम्हाला हा व्यायाम केल्यामुळे आराम मिळू शकतो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर केवळ तुम्हाला गोळी किंवा औषध हे चमक बसण्यासाठी घेतली तरी चालेल.

गोमुखासन करताना, समोर बसलेले दोन्ही पाया घेऊन बसा. डावा पाय दुमडणे आणि पायाची टाच उजव्या डोंगराजवळ नेऊन ठेवा. उजवा पाय डाव्या पायावर अशाप्रकारे ठेवा की दोन्ही गुडघे एकमेकांच्या वरती राहायला पाहिजे.

आपला उजवा हात वरच्या दिशेने करा आणि मागील दिशेने वळा डावा हात खाली घेऊन आपल्या मागच्या मागे उजवा हात धरा मान आणि कंबर सरळ राहील. एका बाजूने सुमारे एक मिनिट असे केल्यावर दुसऱ्या बाजूने त्याच मार्गाने करा.

कमरेचा व्यायाम

दैनंदिन जीवनात आपल्याला नेहमी कमरेचा व्यायाम व्यवस्थित होत नसतो आणि जर तुम्ही हे आसने नियमितपणे केले, तर तुमची कंबर देखील दुखणार नाही. तसे पाहिले तर, महिलांमध्ये कंबर दुखीचे त्रास हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात.

योगामुळे तुम्हाला खूप आराम देखील मिळेल ऑफिसमध्ये दिवसभर बसून बसून कंबर किंवा पाठदुखीचा त्रास खांदे दुखीचा त्रास हा आपल्याला जाणवत असतो त्यामुळे हे व्यायाम तुम्ही नियमितपणे करा. व्यायाम करत असताना हळूहळू किंवा सावकाशपणे हे व्यायाम करावे म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.

त्यानंतर आपण पायाची एक्झरसाइज केलेली आहे तर ती सांगितल्याप्रमाणे तुम्ही जवळजवळ तीन सेकंद किंवा एक मिनिट पर्यंत जरी केली तरी तुमच्या पायांना आराम मिळेल. शशांकासन हे आसन करतांना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकून आपलं डोकं समोरच्या बाजूने जमिनीवर ठेवा.

या स्थितीत काही सेकंद थांबून पुन्हा पूर्वस्थितीत या. व एक ते दोन मिनिटे हा योगा करा गुडघे, पोट व डोकं दुखत असल्यास हा व्यायाम करू नये. हा व्यायाम केल्यामुळे तुमच्या पोटाची व पाठीची अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते.

कपालभाती एक शुद्धिक्रिया आहे. कपाल म्हणजे मस्तक आणि भाती म्हणजे चमक कपालभाती मुळे चेहऱ्यावर चमक येते व शरीर निरोगी बनते. कपालभाती प्राणायाम सामान्य स्थितीत बसून सामान्य स्वरूपाचा श्वास घेतला जातो व श्‍वास सोडला जातो.

श्वास सोडताना आपल्या पोटाच्या आतड्यांना संकुचित करावे लागते. ही क्रि योगाअभ्यासातील मध्यम क्रिया मानली जाते. आज ही क्रिया विश्वभरात सर्वत्र केली जाते. कपालभाती ही एक श्वास घेण्याची संतुलित पद्धत आहे. याच्या सरावामुळे शरीरातील सर्व नकारात्मक तत्व निघून जातात.

शरीर आणि मन सकारात्मकतेने भरून जाते. याच्या सरावाने संपूर्ण दिवस चांगला जातो. यांच्यामुळे शरीर व मन शुद्ध होते. लोकांविरुद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते. जगभरात प्राणायामाचा सरावात याचा सर्वात जास्त सराव दिला जातो. हा व्यायाम केल्याने फुफ्फुसांचे संक्रमण कमी होते व एलर्जीतत्व बाहेर टाकले जातात.

शरीरातील खालच्या अंगांना रक्‍ताचा पुरवठा नियमित केला जातो. फुप्फुसाचे कार्य सुरळीत चालते तसेच त्यातील संक्रमण नाही दूर होते. शरीरात जास्त ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढवली जाते. कपालभाती शरीर आणि बुद्धीची मजबुती वाढवते.

तसेच सर्व प्रकारच्या आजारांनाही प्राणायाम करता येत नाही. हृदय रुग्णांनी याचा सराव करू नये. हर्निया, श्वसन प्रणाली आणि सर्दी च्या आजारात हा प्राणायाम करायचं नसतो. उच्च रक्तदाब व मधुमेह आहे, अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा.

आरोग्यासंबंधी माहिती करीता खालील ब्लॉगला भेट द्या 

आरोग्य मराठी 

Leave a Comment