Diabetes Diet Chart in Marathi Language मधुमेह साखर रोग

मित्रांनो या लेखामध्ये मधुमेह म्हणजे साखर रोग, ज्याला इंग्रजी मध्ये Diebeties म्हणतो, त्याची कारणे, प्रकार उपाय व Diabetes Diet Chart in Marathi Language  पाहणार आहोत.  आपली शरीर प्रकृती टिकवणं खुप गरजेचे आणि ती टिकवून कशी ठेवायची, हे आपल्यावरच अवलंबून असतं.

Table of Contents

Diabetes Diet Chart in Marathi Language मधुमेह साखर रोग

यासाठी आपल्याला निसर्गाची मदत सुद्धा चांगल्या प्रकारे होते. निसर्गामधील वातावरण जगणं आपल्याला अवघड वाटतं. नैसर्गिक आणि भौतिक जगणं, यामधील फरक आपण सहजरित्या घेतो.  मात्र शरीर प्रकृती साठी आपण प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वकच घ्यायला हवी.

डायबेटीस कसा होतो? Diabetes Diet Chart in Marathi Language

आता मानवी शरीरामध्ये आजार कसा प्रवेश करतो. हवेच्या द्वारे आपल्याला ऍलर्जी होऊ शकते.  यानंतर आपण खाण्या- पिण्यात जर टाळाटाळ केली किंवा अति सेवन केले, यामुळे सुद्धा काही आजार होतात.  पोटामध्ये बिघाड होते.  शरीरामध्ये काही गोष्टींची कमतरता असल्यास, आपल्या रक्तामध्ये,  लिव्हर मध्ये  काही लक्षण आपल्याला दिसून येतात.  त्याला आपण शुगर या नावाने ओळखतो. आपण शुगरची अगोदर पार्श्वभूमी बघुयात पार्श्वभूमी म्हणजे त्याची सुरुवात नेमकी झाली कशी?.

मधुमेहाला आपण इंग्रजीमध्ये (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस) या नावाने ओळखतो.  याआजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद सुद्धा मिळत नाही. पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

डायबेटिसवर Diabetes Diet in Marathi उपचार

यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे

मधुमेहाची लक्षणे- Symtoms

मधुमेह दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे.
मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार,पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे.  त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये दिसून येणारा संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.

ग्लुकोजची कमतरता का निर्माण होते?

शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नमधील कर्बोदकांचे ( साखर आणि स्टार्च) अन्ननलिकेमध्ये पचनाअंती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते.

ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्शुलिन हे सम्प्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते.  स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते.  ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात.  ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात.

Yoga Marathi – 7 Best Yoga in Marathi – योगासने

इन्शुलिन

इन्शुलिनचा पेशी आवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते.  ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराचे अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते.

या आजारात रोग्याच्या रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपर ग्लायसेमिया (हायपर – अधिक , ग्लासेमिया – ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते.

थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी.
रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते.

शेतकरी मित्रांनो आपल्याकरिता माहिती आहे येथे click करा 

ग्लुकोजचे प्रमाण किती असावे?

ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात.

अशा स्थितीस कीटो ॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे.
वेळीच उपचार ना केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते.

मधुमेहाचे पहिला प्रकार

या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो म्हणजेच दिसून येतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही.

नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे.

या मधुमेहास ‘इन्शुलिन आवश्यक मधुमेह’ असेही म्हणतात, कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे.

या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते.
अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते.

मधुमेह दुसरा प्रकार

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले,जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर, आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात.

स्त्रियांची स्थिती

आणखी एक प्रकारचा मधुमेह ‘गरोदरपणातील मधुमेह’ या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो.

२००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते.

यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते.

स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत.

मधुमेह होण्याची नेमकी कारणे

मधुमेहाचे नेमके कारण किंवा कारणे अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा.

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही.

मधुमेहाची जाणीव-

मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत.

इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तींमध्ये असते

१) सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल) • जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे.
२) आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील.
३) भारतीय व्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २ चा मधुमेह वाढतो आहे.
४) गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया. ५) १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब
६) एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
७) जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे. अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे,

तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या,थायरॉइड हार्मोन,
प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात.

अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे.
मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.

हायपरग्लेसेमिया-

हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे . हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते.

मधुमेहाची लक्षणे कशी दिसून येतात

सध्याचा काळात सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात.

सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट.

या आजारावर निदान कसे लावावे-

मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, रोग्याची मूत्र परीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते.

रोग्याचा मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून वृक्के नीट कार्य करीत आहेत की नाही याचे निदान होते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावयाची औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात.

मधुमेहावर आपण उपचार कसा करू शकतो

सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.

मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे.

योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.

आहारात कोणता बदल करावा?

आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर.

प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही.

प्रत्येक अन्न घटकामध्ये असणाऱ्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्‍ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे.

काय खायचे-प्यायचे?

प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे.

दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.

फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.

आपण पर्यायाने यावर उपचार करू शकतो तो कसा ते बघूया

मधुमेहावर Diabetes Diet Chart in Marathi Language वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत.
प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पती पर्याय नाही.

काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते.

काही पर्याय खालील प्रमाणे

मेथी- मेथीच्या बिया आणि पूड – एका अभ्यासात रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.

बिलबेरी- नावाचे फळ ग्लूकोज नियंत्रणामध्ये ठेवते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार दूर करते.

लसूण – ग्लूकोज आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवते.

कांदा- ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्शुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.

आफ्रिकन मिरची – मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.

मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.

मधुमेह असणारे यांनी काय खावे ते आपण पाहू

१)गहू – मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात.

२)तांदूळ – तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते.

३)ज्वारी – कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरतात. जर बद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळतात.

४)डाळ – मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते. फळे

५)संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे.

आता आपण सरतेशेवटी बघुयात की मधुमेह असणाऱ्यांनी आहार कसा घ्यावा-

मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे.

मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही.

१)तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत.

२)मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याच सोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.

३)लवकर पचणारे फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात.

४)मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्याचे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नये.

५)मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल.

मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक ‘मधुमेह आहार तक्ता’ बनवून घेऊ शकतात. आमची ही माहिती आपल्याला आवडलीच असेल, अशीच माहिती आपण दररोज बघत राहू.

आपण हे वाचले का?

 

Leave a Comment