१० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी ……. असा करा अर्ज

अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. त्यात कमी शिक्षण असेल तर आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल असा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता १० वी ( government job vacancy for 10th qualification ) आणि पदवीधरांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाकरिता एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२१ आहे.

सीआरपीएफमध्ये नोकरीसाठी तयारी करत असलेल्या तरुण-तरूणींना मोठी संधी निर्माण झालीय. मान्यताप्राप्त बोर्डमधून १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्जासाठी पात्र असेल. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही परिक्षा एकूण २२५ गुणांची असणार आहे. एकूण दोन सेक्शनमध्ये ही परिक्षा घेण्यात येणार आहे. पहिली परिक्षा २०० गुणांची आणि दुसरी परिक्षा २५ गुणांची असणार आहे. या परिक्षांमध्ये ८वी ते १० वीच्या ( government job vacancy for 10th qualification )अभ्यासक्रमावर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. यात मुख्यतः सामान्य जागरूकता, सामान्य गणित, अंकगणित, हिंदी/इंग्रजीची माहिती असते. ही परिक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून देता येते.

त्यासोबतच उमेदवाराचं टाइप फोन आणि फिजिकल स्टँडर्ड रिपोर्ट (PST) सुद्धा आवश्यक असणार आहे. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती मिळण्यासाठी अधिकृत वेबसाईट crpf.gov.in जाहीर केलेली नोटिफिकेशन वाचून घ्या.

अर्ज कसा कराल
इच्छूक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही दहावी पास असाल तर लवकर या पदासाठी अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!