Harbhara Fayade हरभरे खा- हाडे मजबूत करा, हरभरे (चणे) खाण्याचे फायदे

असे म्हटल्या जाते, चणे खा आणि हाडे मजबूत ठेवा हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. Harbhara Fayade अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

हरभरे खा- हाडे मजबूत करा, हरभरे (चणे) खाण्याचे फायदे Harbhara Fayade

चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनीज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.

जेवणातील फायदे- Harbhara Fayade

या व्यतिरिक्त आपल्या नेहमीच्या जेवनात दररोज विविध कडधान्यांचा समावेश असतोच आणि या कडधान्यांचा आपल्या शरीराला अगदी चांगला उपयोग होत असतो. या कडधान्यांमध्ये हरभरे हे मोडले जाते.

सकाळी खाली पोट भिजवलेले हरभरे खाल्ले तर ते सर्वात उत्तम राहते. शरीराची पचनक्रिया तसेच शारीरिक थकान देखील दूर होते बदाम, काजू सारख्या महागड्या वस्तूंपेक्षा कोंब आलेले हरभरे हे अतिशय स्वस्त आणि उपयोगी कडधान्य आहे.

त्यामुळे बऱ्याच आजारापासून तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते. हरभरे सर्वांनीच खाणे उपयोगी आहे परंतु त्याचा जास्त वापर करू नये. मूडभर हरभरे स्वच्छ धुऊन रात्री भिजत घालून ते सकाळी खावे. त्याने आपल्या शरीराला चांगला उपयोग होईल.

नियमित हरभरे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर निघून जाईल. शक्ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले हरभरे यांचा उपयोग करतात, तर काही जण जेवण करून किंवा व्यायाम करून आल्यानंतर हरभरे खातात. त्यालाच हिंदीमध्ये चना सुद्धा म्हणतात.

हे भिजलेले चणे खाण्याचे शरीराला खूप फायदे असतात. त्यापासून अनेक रोगांना सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती शरीराला मिळते. अनेक पोषक घटक आणि विटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात भिजवलेल्या चण्यांमध्ये असतात. हे चणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.  चने खाल्ल्यामुळे कोणते फायदे होतात ते आपण पाहूया.

भिजवलेले चणे खाल्ल्यामुळे फायदे:

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रात राहण्यासाठी भिजवलेले चणे फायदेशीर ठरत असतात. प्रोटीन्स फायबरर्स यांसारखे पोषक तत्व भिजवलेल्या चण्यात असतात. त्यामुळे चण्यांचे सेवन केल्याने आजार होण्याचा धोका कमी असतो.

भिजवलेले चणे खाल्ल्यामुळे पोट साफ होते. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी फायबर मोठ्या प्रमाणात उपयोगी असते, त्यामुळे ज्या लोकांना पोटाची समस्या आहे. त्यांनी भिजवलेले चणे खायला पाहिजेत. भिजलेले चणे गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरीन जाण्याची समस्या दूर होते.

पाईल्सचा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असते, अशा लोकांनी भिजवलेले चणे खाणे उपयोगी ठरेल तसेच भिजवलेले हरभरे दाताच्या व त्वचेच्या समस्यांवर हे उपयोगी आहेभिजवलेल्या चण्यांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

चणांमध्ये ब्यूटिरेटचे फॅटी एसिड असते. जे प्रामुख्याने कॅन्सर वाढवत असलेल्या घटकांना संपवण्याचा प्रयत्न  करतात भिजलेल्या चणा मध्ये बी कॅरोटीन तत्त्व असते. त्यामुळे ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील, त्यांच्यासाठी तसेच गरोदर महिलांसाठी देखील फायदेशीर असते.

गुणधर्म : शीत, तुरट, मधुर, रुचिकर.

उपयोग

हरभरा Harbhara Fayade वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बियात प्रथिने व कार्बोहायड्रेटस् जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभ-याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभ-याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात.

फुले येण्याच्या सुमारास हरभ-याच्या पानावर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड ते दोन तास पसरून ठेवले की ते दवाने ओले होते व पानावरील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून आम्ल बाटलीत गोळा करतात त्यापासून उत्तम आम किंवा खारी तयार करता येते.

हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे. त्यास ‘घोडे च दान ’ असे म्हटले जाते. तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटिन अन्न आहे. हरभ-यातील प्रथिने मिळवायची असल्यास त्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे. तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला.

हरभरा डाळ पचण्यास जड, किंचित उष्ण असून तुरट-गोड चवीची आहे. वातदोष वाढवणारी आहे. त्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्तींनी, वात व्याधींनी पीडित रुग्णांनी याचे खाऊ करू नये. पचनशक्ती मंद असणा-यांनी, अपचनाचा त्रास होणा-या लोकांनी हरभरा डाळीचे, हरभरा पिठापासून बनवलेले पदार्थ खाणे करणे टाळावे.

औषधी गुणधर्म :

हरभ-यात Harbhara Fayade अनेक औषधी गुणधर्म आहेत. रात्रभर भिजत टाकून सकाळी मधाबरोबर खाल्ल्यास ते एक उत्तम औषधीआहे. भिजत घातलेल्या चण्याचे पाणीही अत्यंत पौष्टिक असते. मोड आलेल्या हरभ-यात बी कॉम्प्लेक्स व इतर जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
चण्याच्या पीठाने केस धुतल्यास केसांचे रोग नाहीसे होतात. तसेच चना पीठ त्वचा गोरी करण्यासाठी उपयुक्त आहे.

त्यासाठी चणा पीठ व दही यांचे मिश्रण करून त्याचा लेप अर्धा तास चेहऱ्यावरती लावा. कोमट पाण्याने धुऊन घेतल्यानंतर चेहरा मुलायम व गोरा दिसेल. अंगाला जास्त घाम येत असेल व घामाचा वास येत असेल तर अंघोळीच्या वेळी चना डाळीच्या पिठात थोडी हळद, पाणी घालून मिश्रण अंगाला लावावे त्याने शरीराची दुर्गंधी दूर होईल.

सुखी हरभरे गुळासोबत खाल्ल्यात अत्यंत पौष्टिक आहेत. हरभरा डाळी पासून विविध पदार्थ बनविले जातात. बेसनाचे लाडू, ढोकळा, भाजीत बेसन, बेसन चक्ती इत्यादी खाण्याचे चवदार पदार्थ बनविले जातात. शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात.

हरभरा तत्वे:

चणाडाळीतले कॅल्शियम हाडे, दात, नखे मजबूत करते. या डाळीत पोटॅशियम भरपूर आहे. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब योग्य असावा. यासाठी ही डाळ मदत करते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राहण्यासाठीही तिचा उपयोग होतो. तसे पाहिले तर आपल्याला हरभऱ्या पासून किंवा डाळीपासून खूप फायदा असतो परंतु हे प्रमाण जास्त झाले तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे याचा वापर योग्य प्रमाणात करावा.

हरभरा हे हिवाळ्यामध्ये येणारे पीक आहे. याचा समावेश कडधान्यांमध्ये केला जातो. शेतीबरोबरच हरभऱ्याचा उपयोग मानवी आहारात देखील केला जातो महाराष्ट्रात हरभरा या पिकाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे तसेच पारंपरिक पद्धतीमध्ये थोडा बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भामधील शेतकरी हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या ओळीचा फायदा घेऊन, हे पीक मोठ्या प्रमाणावर पिकवितो.

हरभऱ्याच्या पिकासाठी काळी व सुपीक जमीन पोषकहोऊ शकते. हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर, पीक चांगले येते हरभरा पिकासाठी खारीक तर जमीन वापरू नये

हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर अधिक उत्पादन देणारे आणि प्रयोग प्रतिकार औषधांचा चांगल्या बियाण्यांचा वापर करावा तसेच योग्य जमिनीची निवड व पूर्वमशागत करणे गरजेचे असते पाण्याचे योग्य नियोजन करून कीटकनाशकं पासून सुरक्षा करणे हे गरजेचे असते.

काळा हरभरा व त्याचे फायदे: Harbhara Fayade

हरभऱ्याच्या अनेक प्रजाती आहे. त्यातील एक प्रतजात म्हणजे काळा हरभरा. काळा हरभरा मानवी शरीरासाठी अत्यंत पोषक कडधान्य आहे. त्यामध्ये आयर्न सोडियम, सेलेनियम या घटकांचे प्रमाण सर्वाधिक असते.

काळा हरभरा शरीराला भरपूर ऊर्जा प्राप्त करून देते. हे हरभरे रात्रभर भिजवून ठेवून, त्याला मोड येऊन खाल्ल्यास शरीराला ऊर्जा प्राप्त होते. तसेच शरीरात बी कॉम्प्लेक्स ची देखील कमतरता भासत नाही. तसेच शरीरात विटामिन चे प्रमाण वाढते व अमायनो ऍसिड मुळे पेशी चे होणारे नुकसान टळते.

शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या वाढते. भिजवलेला काळा हरभरा हा मधात मिक्स करून खाल्ल्यास आयुष्याची समस्या कमी होते. चेहऱ्यावरील डाग काळपटपणा दूर होऊन चेहरा सुंदर दिसतो.

किशोरवयीन आणि तरुणांसाठी काळा हरभरा हा एक वरदानच ठरला आहे मुठभर गावरान काळे हरभरे एक पौष्टिक नाश्ता आहे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असेल तर गुळ आणि फुटाणे हे एकाच वेळेस खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढतील तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते.

सूचना : हरभरा Harbhara Fayade हा सर्व गुणांनी युक्त शरीरासाठी लाभदायक आहे. म्हणून त्याचा उपयोग आहारात योग्य प्रमाणात करावा.

आपण हे लेख वाचलेत का?

 

Leave a Comment