Health Benefits of Turmeric Milk in Marathi हळदीचा उपयोग आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये करत असतो, असे कोणत्याही प्रकारची भाजी किंवा पदार्थ बनवले असतील तर बहुतेक जण त्या पदार्थांमध्ये हळदीचा उपयोग करतात. अगदी जुन्या काळापासून हळदीचा उपयोग हा औषधांमध्ये केला जातो. हळद शरीरासाठी उपयुक्त आहे
Table of Contents
हळदीचे आश्चर्यकारक फायदे पाहून व्हाल चकित Benefits of Turmeric in Marathi
भारतामध्ये हळदीची Health Benefits of Turmeric Milk in Marathi लागवड पूर्वीपासून केली जाते. हळदीचे रोप सुगंधी असते. हळदीच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या आणि चमकदार रंगाच्या असतात. या गाठी म्हणजे हळद. हळद ही भारतातील आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, जम्बुकाश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हळद उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हळदी इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिकविली जाते.
भारतातून हळद दहा ते पंधरा टक्के निर्यात केली जाते. सतत होणार्या हळदीच्या दरामधील चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
आंबेहळद हा प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.
आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी, थोडी उग्र असते. ती पोटात न देता, शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.
कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त गोठलेले असल्यास, आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात. अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.
हळदीचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. व याने सुंदरता देखील वाढते. चेहऱ्यावर काळे डाग आले असल्यास, त्यावर आंबे हळदीचा लेप लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात.हळदीत आढळणारे एंटीसेप्टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.
1 चमचा हळद पावडर 1 चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही मिश्रण चेहर्यावर लावा. 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे मिश्रण वापरा. डाग नक्की साफ होतील.
त्वचेकरिता फायदेशीर-
हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी 1 चमचा हळदीत 2 चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहर्यावरील डागांवर लावा. मिश्रण वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहर्यावर लावून 15 मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या. एक चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहर्यावर 20 मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका.
2 चमचे दूध आणि 1 चमचा मधासोबत 1 चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. असे आठ दिवस केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर निघून जातील व चेहरा गोरा होईल तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर तेलकट असेल तर एक चम्मच आंबेहळद, दोन चमचे बेसन आणि एक चमचा मध याचे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावरती लेप लावावा. 15 मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. यांनी चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जाईल व त्वचा चमकेली होईल.
हळदीचे (Turmeric)गुणधर्म-
सर्वांसाठीच हळद फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. दुधातून हळद घेण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित आहेत. पण हळद गरम पाण्यातून सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.हळदीत ‘करक्युमिन’ नावाचे रसायन असते.
शरीरातील सूज कमी करण्यासाठी ‘करक्युमिन’ हे रसायन फायदेशीर आहे.
हळदीत ‘करक्युमिन’ असल्याने गुडघेदुखी कमी होते.बुद्धी चंचल राहते.
गरम पाण्यातून हळद हळदीचे पाणी पिल्यास साखर नियंत्रणात राहते.
हळद हे औषधी तसेच घरातील मसाल्या -मध्ये वापरण्यात येते हळदीचे गाठे सुकवून त्यापासून हळदीची पावडर तयार केली जाते. हळद हि पिवळ्या रंगाची शक्तिवर्धक, सुवासिक, रक्तशुद्धी करते. ती जखमेवर व अवयव मुरगळल्यावर गरम तेलामध्ये एक चमचा हळद टाकून जिथं मुरघळलेला आहे तिथं लावतात.
असे केल्याने ती जखमेवरील किंवा मुरघडलेल्या अवयवांवरील सूज कमी होते. आधी हळदीचा उपयोग रंग काम करण्यासाठी केला जात होता. तसेच ओल्या हळदीच्या तुकड्यांचे लोणचे देखील घातले जाते. तसेच हळद ही मसाल्याचे पदार्थांमध्ये देखील वापरण्यात येते. तसेच हळद हे हिंदू धर्माच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील वापरण्यात येते.
आरोग्य मराठी ब्लॉगला पण भेट द्या
हळदीच्या जाती-
भारतामध्ये हळदीचे मुख्य दोन जातींची प्रकार आहेत. मुख्य ह्या दोन जातीचे पिकवल्या जातात. त्या म्हणजे हळकुंड कठीण आणि भडक पिवळ्या रंगाची हळद, तिचा वापर रंग कामासाठी देखील केला जातो. महाराष्ट्रात या हळदीला लोखंडी हळद म्हणून ओळखले जाते. यातील दुसऱ्या जातीचे हळद हे आकाराने मोठे, कमी कठीण, सौम्य व पिवळ्या रंगाचे असतात.
हळदीची तिसरी जात म्हणजे रान हळद, ती भारतातील जंगली प्रदेशांमध्ये वाढलेली दिसून येते तिचे हळकुंड फिकट पिवळी व गाभ्यात नारंगी रंगाचे असतात. रान हळदीच्या हळकुंडाचा वास हा कापरासारखा असून तीस देखील औषधी वनस्पती मध्ये समावेश होतो.
मार लागलेल्या अवयवांना सूज कमी करण्यासाठी हळदीचा लेप लावतात. चौथी जात म्हणजे आंबेहळद या हळदीच्या हळकुंडाचा वास आंब्याच्या कैरी सारखा येतो म्हणून तिला हळद आंबेहळद असे नाव पडले. हळदीच्या जाती पिकवण्यासाठी दमट व उष्ण हवामानाची गरज असते. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी व मध्यम काळी सेंद्रिय खत युक्त जमीन हळदी पिकासाठी पोषक आहे.
हळदीच्या पिकासोबत तुम्ही मिश्रपीक देखील घेऊ शकता. त्यामध्ये आलू, वांगी, सुरण, गाजर, मुळे ई. यासारख्या विविध पालेभाज्यांची लागवड देखील केली जाऊ शकते. हळदी बागायती पीक असल्यामुळे तिला पाण्याचा पुरवठ्यात तुटवडा पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
हळदीचे पीक-
हळदीचे पीक आठ ते नऊ महिन्याच्या असतात. हळद पिकली की त्याची पाने गळून पडतात किंवा पिवळी होतात. या हळदीच्या पिकाची काढणी केल्यानंतर काही हळद बियाणेसाठी ठेवून देतात, तर काही हळद ओली विक्रीसाठी काढतात. आणि शिजवून याची हळकुंड तयार केली जाते. नंतर वाढल्यानं वाढले की हळदी पावडर तयार केली जाते. हळद शिजवली यामुळे हळदीतील पिवळ्या रंगाचे कुरकुमीन हे सर्व हळकुंड यामध्ये एकसारखे पसरते.
हळदीच्या पावडरपासून विद्रावक निष्कर्षण पद्धतीने ओलिओरेझीन वेगळे काढतात. यात मुख्य रंगघटक कुर्कुमीन असतो.या घटकाच्या प्रमाणावर त्याची गुणवत्ता अवलंबून असते. विविध प्रकारची लोणची, विविध पेये व आइसक्रीम यांमध्ये ओलिओरेझीन वापरतात.
हळदीच्या पानापासून सुगंधी तेल मिळते. हळदीच्या पानापासून सुगंधी तेल काढण्यासाठी, पाने सहा ते सात महिन्यांची असताना कापून घेतली जातात. त्यावर प्रक्रिया करून सुगंधी तेल काढले जाते. व हे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. हळदीचे पाने कापले असता, त्याचा परिणाम हळदीच्या पिकावर होतो, उत्पादन घटते.
हळदीचे महत्व-
हळदी सुमारे तीन हजार वर्षांपासून लागवडीमध्ये आहे हळदीला भारताची सुवर्ण संपत्ती असे संबोधले जाते हळद ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक असून, ती धार्मिक विधी, कर्मकांड, आहारात तसेच औषधे व विविध रंग कामात उपयोगी आहे . हळदीचे महत्त्व आयुर्वेदातही सांगितलेले आहे. जगाला मध्ये युगापर्यंत हळदीची ओळख नव्हती. तेराव्या शतकात अरबी यांनी युरोपमध्ये हळदीची ओळख करून दिली.
तेव्हा हळद भारतीय केसर या नावाने प्रचलित होती. भारतीय हळद जगात सर्वोत्तम प्रकारची हळद म्हणून ओळखली जात होती.
हळद Health Benefits of Turmeric Milk in Marathi स्त्रियांच्या जनन तंत्राचे नियमन करण्यासाठीमदत करते तसेच स्तनातील दूध आणि मूत्रमार्ग शुद्ध ठेवते. पुरुषांमध्ये वीर्य शुद्धी आणि त्याच्या निर्मितीसाठी मदत करते. तसेच ती सामान्यपणे ताप, अतिसार, मूत्रमार्गातील विकार, विषबाधा, खोकला आणि दुग्ध- स्रावासंबंधी समस्या कमी करण्यास मदत करते. उपचारासाठी ती वापरतात. कफ कमी करण्यासाठी तिचा वापर होतो.
सूचना :
हळदTurmeric हि रोज रात्री दुधातून घेतली तरी चालेल शरीरासाठी अपायकारक नाही. म्हणून हळदीचे सेवन दररोज करणे आवश्यक आहेत.गरम पाण्यातून हळद हळदीचे पाणी पिल्यास साखर नियंत्रणात राहते. डॉक्टर सल्ला जरूर घ्यावा.