वजन कमी ( healthy breakfast for weight loss )करणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वजन कमी करताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. अशातच खाण्यात काही बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. खाण्यात केलेल्या या बदलामुळे तुम्हाला भूकही कमी लागेल आणि तुमचे पोटही भरलेले राहील.
सकाळी नाश्ता ( healthy breakfast for weight loss ) न करताच आपली दैनंदिन कामे सुरू करणे तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते. पण तुम्ही सोप्या पद्धतीने नाश्ता बनवून तुम्ही वजन कमी करू शकता आणि खाण्यात केलेल्या या बदलामुळे तुम्हाला भूकही कमी लागेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या रेसिपी.
भाज्यांसोबत खा अंडी
अंड्यांमध्ये असलेल्या पांढऱ्या भागातमध्ये सर्वात जास्त पोषणतत्वे असतात. तुम्ही अंड्याच्या या सफेद भागात पनीर, टोमॉटो , किंवा मशरूम सारख्या भाज्या टाकून एक हाय प्रोटीन ऑमलेट बनवू शकता.
टोफू
टोफू बनवण्यासाठी कंडेस्ड सोया मिल्कचा वापर केला जातो. रात्री 4 ते 5 टोफूमधील पाणी पूर्णपणे काढून घ्या. एका छोट्या भाड्यांमध्ये थोडे बाल्सामिक व्हिनेगर घ्या त्यामध्ये ओवा आणि लसूण टाका. टोफूवर वरील सर्व मिश्रण टाका आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी बारीक कापलेल्या कांदा, शिमला मिरची तेलामध्ये खरपूस भाजून घ्या आणि त्यात टोफूचे मिश्रण टाका .
Driving Licence Parivahan Sewa How to apply for learner’s License? | ऑनलाइन ड्राइविंग लाइसेंस कसे काढावे?
दुधी भोपळा-सफरचंदची स्मूदी
दुधी भोपळा-सफरचंदची स्मूदी बननण्यासाठी बदामाच्या दुधामध्ये दुधी भोपळा, सफरचंद ,दही, बर्फ, मेपल सिरप,आणि मिठ टाकून ब्लेंडरमध्ये चांगले ब्लेंड करा.
पालक ऑमलेट
सर्वात आधी कांदा, टोमॉटो, मिर्ची आणि पालक बारीक कापून घ्या. आता एका भाड्यांमध्ये अंड फेटून त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ, कसूरी मेथी, कापलेल्या भाज्या मसाले टाकून चांगले मिक्स करा. या मिश्रणापासून ऑमलेट बनवा.
अॅवोकाडो टोस्ट
सर्वात आधी ब्रेडला टोस्ट करून घ्या त्यानंतर एका छोट्या कटोरामध्ये एक अॅवोकाडो कापून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. आता ब्रेडच्या टोस्टवर सीताफळाचा गर, मीठ, आणि काळी मिरी टाकून हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.