खुशखबर! फेसबुक देतंय विनातारण 50 लाखांपर्यंत कर्ज ……….

फेसबुकने भारतातील 200 शहरांमध्ये लघु व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना कर्ज देण्याची घोषणा केली आहे. फेसबुकने ( facebook loan ) छोटे आणि मध्यम उद्योजकांना (MSME) कर्ज देण्यासाठी Small Business Loans initiative अशी योजना सुरु केली आहे.

फेसबुकने काय म्हटलं..? | facebook loan

फेसबुकने म्हटले आहे की, फेसबुककडून छोटे आणि मध्यम उद्योजकांना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.

फेसबुकने यासाठी इंडिफाय (Indifi) कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी MSME ला कर्जवाटप करते. यामध्ये, फेसबुकद्वारे पैसे दिले जातील, तर पैसे कोणाला द्यायचे आणि ते कसे वसूल करायचे, याचा अंतिम निर्णय ‘इंडिफाय’ कंपनी घेणार आहे.

फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (VP& MD of Facebook India) अजित मोहन यांनी सोशल मीडिया कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करताना सांगितले की, या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची मालमत्ता गहाण ठेवावी लागणार नाही.

विणातारण कर्ज फक्त 5 दिवसांत..!

अजित मोहन यांनी पुढे सांगितलं की, याअंतर्गत 17 ते 20% व्याज दराने कर्ज दिले जाईल आणि महत्वाचं म्हणजे फक्त 5 दिवसांत कर्जप्रक्रिया पूर्ण केली जाईल. या कर्जप्रक्रियेत कोणतीही वस्तू तारण किंवा काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

महिलांनी चालवलेल्या व्यवसायाला कर्ज हवे असल्यास त्यांना व्याजदरात 0.2 टक्के सूट दिली जाणार आहे. सध्या लघु आणि मध्यम उद्योग चालवण्यासाठी Small Business Loan ची गरज असते, जे उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी फेसबुकने हा पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त भांडवल बाजारात उपलब्ध होणार आहे.

इंडिफाय कंपनीच्या https://www.indifi.com/ या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

▪️ आधार कार्ड (Aadhaar Card)
▪️ पॅन कार्ड (Pan Card)
▪️ पत्त्याचा पुरावा (कंपनी व अर्जदाराचा)
▪️ बिझनेस रजिस्ट्रेशन प्रूफ
▪️ बँक स्टेटमेंट (अर्ज करण्यापूर्वीचे मागील 6 महिन्यांचे)
▪️ आयटीआर (15 लाखांपेक्षा जास्त कर्ज हवं असल्यास) – ही कागदपत्रे कर्ज मर्यादेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतात.

कोणत्या शहरांमध्ये कर्ज मिळू शकतं, ते पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून शहरांची यादी (pdf) डाऊनलोड करा 👉 https://www.facebook.com/business/f/2882841301952563/?file_name=EligibleCities_SmallBusinessLoansInitiative

कर्ज घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून अर्ज करा 👉 https://www.facebook.com/business/small-business-loans

फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले की..

फेसबुकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 100 दशलक्ष डॉलर इतका निधी या योजनेसाठी उभा केला होता, जो भारतासह दुसऱ्याही 30 देशांत वापरला जाणत आहे. कंपनीमार्फत दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद व बंगळुरू या पाच भारतीय शहरांमधील 3,000 उद्योजकांना 29 कोटी 76 लाख 42 हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. आता सध्या जगातील 20 कोटींपेक्षा जास्त व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करून डिजिटली पोहोचत असतात. तर यापैकी केवळ भारतातील 1.5 कोटींपेक्षा अधिक व्यावसायिक वापरकर्ते कंपनीच्या विविध उत्पादनांद्वारे त्यांच्या व्यवसायाचा प्रचार करत आहेत. या योजनेची सुरुवात करायची ठरली ते फक्त एका उद्दिष्टामुळे की, छोट्या-मोठया उद्योजकांना बिझनेस लोन सहजासहजी मिळावं. फेसबुकने सर्वात प्रथम भारतातच ही योजना लॉंच केली आहे.

(सदर लेख हा वाचकांना कर्ज घेणे फायदेशीर व्हावं, अधिकाधिक माहीती मिळावी, या हेतूने गुगलवर रिसर्च करून लिहिण्यात आला आहे.)

Leave a Comment