How to Reduce Weight in Sleep वाढतं वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत असतं. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघ्यांमध्ये वेदना होणं आदी आजार होऊ शकतात. जगभरातील लोक आपलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तुम्हीही त्यासाठी मेहनत करत असाल. तरीही शरीरातून फॅट का जात नाही? त्यासाठी तुमची झोप जबाबदार असू शकते. चांगल्या आणि गाढ झोपेमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, असं अनेक संशोधनातून पुढे आलं आहे. ( how to reduce weight in sleep )
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा: High Blood Pressure Control Tips
गाढ झोपेने वजन कमी होतं – how to reduce weight in sleep
तुम्ही जर 7 ते 8 तासांची कोणत्याही व्यत्यया विना गाढ झोप घेतल्यास तुमचं वजन कमी होतं, हे आता सिद्ध झालं आहे. गाढ झोपेमुळे तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. त्यामुळे तुमच्या शरीरात अधिक फॅट राहत नाही.चांगल्या मेटाबॉलिज्ममुळे अधिक कॅलरीज जाळण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे भूक वाढते आणि झोपेच्या कमतरतेमुळे फूड क्रेविंगही होते. तुम्ही तुमच्या क्रेविंगवर कंट्रोल करत नाही. अधिक खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू लागतं.
Gharkul Scheme List In Maharashtra | महाराष्ट्रातील घरकुल योजना यादी |
झोपण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा – how to reduce weight in sleep
1. कॅमोमाईल टीचं सेवन करा:
झोपण्यापूर्वी एक कपभर गरम कॅमोमाईल टी प्या. त्यामुळे चांगली झोप लागते. कॅमोमाईल टीमुळे शरीरातील ग्लाइसिनचा स्तर वाढतो. त्यामुळे झोप येते. त्यामुळे ही टी प्याच. मग बघा झोपता झोपता तुमचं वजन कसं कमी होतं.
2. मोबाईल लांब ठेवा:
झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा अन्य गॅझेट्सचा वापर करणं हानिकारक असल्याचं अनेक शोधातून दिसून आलं आहे. त्यातून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिनचा स्तर कमी करतात. मेलाटोनिन कमी होताच तुमची भूक वाढते आणि एक्स्ट्रा कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करू नका.
3. अंधारात झोपा:
स्लीप हार्मोन मेलाटोनिन शरीरात ब्राऊन फॅट उत्पन्न करते. त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. जर तुम्ही अंधारात झोपाल तर शरीर अधिक मेलाटोनिनचा संचार करेल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदतच होईल. त्यामुळे नाईट बल्ब किंवा लॅम्प लावून झोपण्याऐवजी अंधार करून झोपा.
4. घरात मिन्टचा सुगंध दरवळू द्या:
झोपण्यापूर्वी रुममध्ये मिंटचा सुगंध असलेला स्प्रे करा. उशीला मिंट ऑईल लावून झोपा. जर्नल ऑफ न्यूरॉलॉजी अँड ऑर्थोपेडिक मेडिसीनच्या अभ्यासानुसार मिंटच्या सुगंधामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा त्याचा सुगंध घेतल्यास तुमचं वजन कमी होईल.