IBPS PO च्या 4135 पदांसाठी भरती ……. पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने ( IBPS PO Recruitment 2021 ) 4135 पीओ (PO) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन 10 नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Bank Job IBPS Clerk XI Recruitment 2021 Online Application From Today Last date 10 novermber IBPS)

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. विहित पात्रतेची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

नोटिफिकेशननुसार, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात.

रिक्त पदांची माहिती
कॅटेगरी जागा
सामान्य/यूआर 1600
ईडबल्यूएस 404
ओबीसी 1102
एसटी 350
एससी 679

बँक UR EWS OBC SC ST एकूण
बँक ऑफ इंडिया 240 58 158 88 44 588
बँक ऑफ महाराष्ट्र 60 30 108 60 30 400
कॅनरा बँक 265 65 175 97 48 650
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 53 13 257 193 104 620
इंडियन ओवरसीज बँक 41 10 26 14 07 98
पंजाब अँड सिंध बँक 169 42 112 67 37 427
यूको बँक 179 44 118 66 33 440
यूनियन बँक ऑफ इंडिया 491 132 148 94 47 912

भरतीचा पहिला टप्पा म्हणून पूर्व ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. उत्तीर्ण झालेले उमेदवार जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षेला बसतील. निवड झालेल्या उमेदवाराला 14500-25700/-वेतनश्रेणी मिळेल.

Leave a Comment