Immunity Power Booster 5 Tips रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय Immunity Power Booster 5 Tips सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या आरोग्या विषयी काळजी घ्यायला हवी. बरेच जण जिमला जात असतात. परंतु जीमला न जाता ही आपण आपली प्रतिकृती व रोगप्रतिकारक शक्ती चांगली व सुदृढ ठेवू शकतो. जिमला जाऊन खूप मेहनत केल्यापेक्षा आहार योग्य प्रमाणात घेतल्यास देखील आपण सदृढ व सशक्त राहू शकतो. दैनंदिन जीवनात काही महत्त्वाच्या गोष्टीचे पालन करून आपण आपले जीवन व शरीर निरोगी ठेवू शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय-Immunity Power Booster 5 Tips

सकाळच्या नाश्त्यात इडली आणि सांबार खाणे देखील फायदेशीर ठरते. इडलीमध्ये भरपूर प्रथिने असतात. रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन केळीचा समावेश करायला पाहिजे. केळी शरीरासाठी पौस्टीक फळ आहे. व ते आपल्याला फायदेशीर ठरू शकते. रोज पौष्टिक आहार घेणे आरोग्यासाठी हितकारक असते.

हिरवे फळ भाज्या चा समावेश जेवणात करायला हवा. व्हेजिटेबल सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत, ज्यामुळे आपल्याला पोषण मिळण्याबरोबर, वजन कमी करण्यास देखील मदत होते.

रोज सकाळी उठल्यावर किमान दहा मिनिटे तरी चालायला पाहिजे. रोज 10 मिनिटे चालल्याने आपल्या शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो व दिवस ताजीतवानी जातो. ऑफिसमध्ये किंवा बाहेर जाण्यासाठी पायरीवरून चढ-उतर करायला पाहिजे. लिफ्टचा वापर टाळायला पाहिजे. यामुळे शरीरातील मेध जळेल व तुम्हाला शरीर हलके वाटेल.

Gulvel गुळवेल फायदे

नाश्ता का करावा? (Immunity Power Booster)

सकाळच्या नाश्त्यात सफरचंद खाणे किंवा सफरचंदाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय बरेच प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहेत, जे आपल्याला वजन कमी करण्यास तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.रात्रीचे जेवण हे आठ वाजेच्या आत मध्ये करायला पाहिजे.

रात्री जेवण करत असतांना गोड पदार्थ खाने नेहमी टाळावे तसेच रात्रीच्या जेवणामध्ये हलक्या व कमी अन्नाचा वापर करावा. आठवड्यातून एकदा शरीराची खोबरेल तेलाने मालिश करायला पाहिजे. ही मालिश केल्यामुळे मांसपेशी मजबूत होतात व ती शरीरासाठी फायदेशीर ठरते.

आपल्याला नेहमी फास्टफूड खाण्याची तसेच तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. परंतु हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजेत. तसे पदार्थ आठवड्यातून एखाद्या वेळेस खाल्ले तरी चालेल.

कोरडा खोकला घरगुती उपाय

फास्टफूड खाण्याचे दुष्परिणाम

नियमित फास्टफूड खाल्ल्यामुळे आपण स्थूल बनू शकतो. दिवसभरात आपला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस कमीत कमी पाच मिनिटे तरी ध्यान करायला पाहिजे. ध्यान करत असतांना स्वषणावर लक्ष दिल्यामुळे आपले मन एकाग्र होते व मनाला शांती मिळते. म्हणून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय जाणून घेत आहोत.

डोक्यावरील ताण कमी होतो व निरोगी शरीरासाठी ते आवश्यक आहे. दररोजच्या जेवणामध्ये कच्च्या भाज्यांचा समावेश करायला पाहिजे. तसेच कच्ची फळे व भाज्या जेवणात असायला पाहिजेत. हिरव्या भाज्यांचे प्रमाण जास्तीत जास्त असायला पाहिजे व जेवणात उघडलेल्या डाळींचा समावेश देखील करायला पाहिजेत.

रोज सकाळी लवकर उठायला पाहिजे व रात्री लवकर झोपायला पाहिजे. दररोज रात्री लवकर झोपायची सवय लावून घेतल्यामुळे आयुष्य निरोगी व सुखमय होते.

अद्भुत रहस्याकारीता येथे click करा 

रोगप्रतिकारक शक्ती Immunity Power Booster वाढविण्यासाठी पाणी किती व कसे प्यावे?

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय पाहतांना पावसाळा असो किंवा हिवाळा असो दररोज सहा लिटर पाणी प्यायला पाहिजे. कारण कुठल्याही ऋतूमध्ये पाणी शरीराला आवश्यकच असते. पाणी पिल्याने खूप फायदे शरीराला होत असतात.

अधिक पाणी पिल्यामुळे शरीर निरोगी व आरोग्य चांगले राहते. पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. आहारामध्ये कढीपत्त्याचा उपयोग करायला पाहिजे. कारण कढीपत्त्याच्या सेवनाने वजन कमी होते. कढीपत्ता फोडणीमध्ये पदार्थांचा स्वाद वाढवण्याचे काम करतो. तसेच रक्ताची कमतरता देखील दूर करण्यास मदत करतो.

कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे बर्‍याच लोकांना माहीत नाही परंतु फोडणीमध्ये साधारणपणे प्रत्येक घरात वापरला जाणारा कडीपत्ता पदार्थाचा स्वाद तर वाढवतोच त्यासोबत औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीरासाठी खूपच पोषक आहे. म्हणून आहारात कढीपत्त्याचा उपयोग करणे नेहमीच फायदेशीर ठरेल.

डिजिटल माहिती करीता डिजिटल माहिती डॉट इन या ब्लॉगला जरूर भेट द्या

सर्दी आणि खोकला – उपाय Immunity Power booster food tips

जगभरातील लोकांसाठी खोकला सध्या खूप मोठी समस्या आहे. कारण कडाक्याच्या थंडीमध्ये उन्हाळ्यातही सर्दीचा त्रास होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय बदलते हवामान व वातावरणातील धूळ, प्रदूषण, माती, थंड पदार्थाचे सेवन इत्यादी कारणांमुळे सर्दी व खोकल्याची समस्या होऊ शकते. परंतु आपण यावर घरच्या घरी आयुर्वेदिक उपचार देखील करू शकतो.

याशिवाय सर्दी-खोकला होऊ नये यासाठी सुद्धा आपण स्वच्छता, नियोजन करू शकतो. आपले कपडे वस्तू आणि कपड्यांची योग्य ती स्वच्छता करावी. तसेच बाहेरून घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवावेत.

कधीकधी ही सामान्य समस्या आहे. आपल्याला भरपूर त्रास देतात. जर बाहेरील धूळ घरात आली तर त्यापासून आपल्याला डोकेदुखी, सर्दी होणे, शिंका येणे, डोकेदुखी, डोळे जळजळणे किंवा डोळ्यांना खाज येणे. शारीरिक वेदना होणे किंवा शरीर जड होणे कफाची समस्या ताप येणे इत्यादी आजार होऊ शकतात.

जर आपण वेळीच काळजी घेतली तर आपण या सर्व रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.सर्दीखोकला झाल्यास घरगुती उपाय. आले व मधाचा चहा करून पिल्याने सर्दी खोकला आराम मिळतो. आल्या मध्ये अँटीव्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत मधे एक नैसर्गिक औषध आहे.

त्यामुळे सर्दी खोकला झाल्यास आपण दिवसातून दोन-तीन वेळा मधाचे सेवन केले तरी चालेल. दिवसातून दोन-तीन वेळा आपण एक चमचा मध खाऊ शकता किंवा कोमट पाण्याबरोबर दुधामध्ये मिक्स करून पिऊ शकता. पण खोकल्यासोबत कफ बाहेर पडत असल्यास दूध पिऊ नये.

मधाचे सेवन करा तसेच तहान लागल्यास कोमट पाणी प्या. आणि घशामध्ये खवखव दुखत असेल तर तोंडामध्ये लवंग ठेवा. या साध्या सोप्या घरगुती उपयोगामुळे तुम्हाला खोकला व सर्दी यावर आराम मिळेल. तसेच मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी मधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अन्य उपाय-

जर तुम्हाला घशातील दुखणे छातीतील वेदना किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही आल्याचा चहा करून पिल्यास तुम्हाला आराम मिळेल. कारण आल्यामध्ये अँटिव्हायरल आणि अँटी इंफ्लामेट्री गुणधर्म असतात.

या घटकांमुळे घशाचे दुखणे, छातीतील वेदना आणि डोकदुखीपासून सुटका होण्यास मदत मिळते आणि सर्दी पसरणारे विषाणू देखील नष्ट होतात.आलं आणि मधाचा चहा कसा करायचा याची कृती आपण पाहूया. सर्वप्रथम गॅसवर पाणी गरम करत ठेवा आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले आले टाकून दोन मिनिटासाठी पाणी उघडू द्या.

त्यानंतर पाणी गाळून थंड होण्यास ठेवून चहा थंड झाल्यानंतर त्यात मध मिक्स करा तुमचा मध आणि आल्याचा चहा तयार आहे.  सर्दीची समस्या दूर करण्यासाठी या चहाचे आपण दिवसातून दोनदा तरी चहा घ्यायला हवा. तसेच खोकला झाल्यानंतर आपण गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास, गरम पाण्याची वाफ घेतल्यास आपल्याला आराम मिळू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवू शकतो.

घसा दुखत असेल किंवा खवळखत असेल तर पाण्यामध्ये मीठ टाकून गरम करून त्याच्या गुळण्या कराव्या. तुम्हाला नक्की आराम मिळेल. सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास गरम पाण्याची वाफ घ्या. हा उपाय केल्यास शरीरात जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होणार नाही.

हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कोणते फळ खायला पाहिजे जेणेकरून तुमचे शरीर सुदृढ व रोग प्रतिकार क्षमता वाढवू शकेल.

किवी या फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते जे हिवाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला चमकदार ठेवते. या फळाचे सेवन करणे योग्य राहील.डाळिंबामध्ये बरेच विटामिन असते.

डाळिंबाचे बरेच फायदे आपल्या शरीराला असतात. Immunity Power Booster food Tips हिवाळ्यात आपली त्वचा सैल होते. जर आपल्याला त्वचा घट्ट ठेवायची असेल तर डाळींबाचा रस घेणे हितकारक राहील. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि इतर अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्त्रोत आहे. तसेच गाजर सूर्याचे किरण पासून आपल्या शरीराचे त्वचेचे रक्षण करत असतो.

सकाळच्या नाश्त्यात सफरचंद खाणे किंवा सफरचंदाचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये बरेच प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहेत, जे आपल्याला वजन कमी करण्यास तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशाप्रकारे आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय करू शक्ती

आमच्या खालील post वाचल्यात का ?

Leave a Comment