भारतीय सेनादलाच्या ( Indian Army Recruitment 2021 ) JAG Entry Scheme 28th Course मध्ये भारतीय अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवार भारतीय सेना दलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज 28 ऑक्टोबरपर्यंत सादर करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जज अॅडव्होकेट जनरल ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या 7 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 2 आणि पुरुष उमेदवारांसाठी 5 पदं राखीव आहेत. निवड झालेल्या उमदेवारांची निवड14 वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यात 10 वर्षांचा कालावधी असेल, दुसऱ्या टप्प्यात 4 वर्षांचा कालावधी वाढवून दिला जाईल.
पात्रता
भारतीय सेनादलात ( Indian Army Recruitment 2021 ) JAG 28th Entry Scheme 2021 अंतर्गत पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी किमान 55 टक्केंसह एलएलबी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय बार काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही एका राज्यात वकील म्हणून काम करण्यासाठी नोंदणीसाठी पात्र असला पाहिजे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 27 वर्षांदरम्यान असले पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.
उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि एसएसबी मुलाखत घेतली जाईल. पात्र आणि इच्छूक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.
याशिवाय 58 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल पुरुष आणि 29 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल महिला कोर्ससाठी देखील नोटिफिकेशना जीर करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार Indian SSC Technical Recruitment 2021 साठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.