TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची भरती …….

गतवर्षात कोरोनाने देशात शिरकाव केल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

असे असले तरी अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात अनेक क्षेत्रातील कंपन्यांना मोठा नफा झाला आहे.

job-vacancy-in-india

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रमुख आयटी कंपन्या नव्याने कर्मचारी भरती करण्याच्या विचारात आहेत. TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती ( job vacancy in india ) करणार आहेत.

या भरती ( job vacancy in india ) प्रक्रियेत नुकतेच पास झालेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या कंपन्यांकडून तिमाही आढावा घेण्यात आल्यानंतर हे दावे करण्यात येत आहेत.

आर्थिक वर्ष २०२१ च्या सुरुवातीला विप्रोने १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. इन्फोसिसने ८३०० कर्मचाऱ्यांची तर, टीसीएसने २० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली.

त्यामुळे टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांवर पोहचली आहे. २०२१- २२ या वर्षात टाटा कन्सल्टेन्सीकडून देशात ४० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती अपेक्षित आहे.

टीसीएसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही गतवर्षी भारतात ४० हजार नव्या उमेदवारांची भरती केली. यावर्षीही आम्ही ४० हजार नवी भरती करणार आहोत.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की, कंपनी जागतिक स्तरावर यंदा ३५ हजार पास आउट उमेदवार घेणार आहे. मार्चच्या तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या २.५९ लाख होती.

जूनच्या तिमाहीपर्यंत ही संख्या २.६७ लाख झाली. विप्रोने एप्रिल- जूनच्या तिमाहीत १२ हजार नवे कर्मचारी घेतले आहेत. चालू आर्थिक वर्षात आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा विचार आहे.

दरम्यान, TCS ने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत भरघोस नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा २८.५ टक्क्यांनी वाढून तब्बल ९ हजार ००८ कोटी रुपये झाला आहे.

गतवर्षी याच कालावधीत कंपनीला ७ हजार ००८ कोटींचा नफा झाला होता. तर, चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकत्रित उत्पन्नही १८.५ टक्क्यांनी वाढून ४५,४११ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

उत्तर अमेरिकेतील आमचा व्यवसाय, बीएफएसआय आणि किरकोळ व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले.

Leave a Comment