कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi in 2021

खोकल्यावर घरगुती उपाय Khokla Aushadh in Marathi

कोरडा खोकला घरगुती उपाय, औषध सर्दी-खोकला हा नेहमीच होणारा आजार आहे. सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. कोरडा खोकला घरगुती उपाय – (khokla Gharguti upchar in Marathi in 2021) खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते.

या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही.

कोरडा खोकला घरगुती उपाय औषध khokla ayurved Gharguti upchar in Marathi in 2021

जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021 सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते. अद्रकमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टिऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही अद्रकचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही अद्रकचा रस घेतल्याने कमी होता. marathi ayurvdec home remedies

अनंतमूळ एक औषधी वनस्पती आहे. जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीची चार-पाच पानं चांगली उकळून घ्यावी आणि ते पाणी गाळून प्यावं. ते प्यायल्यानंतर 15 ते 20 मिनिटानं उलटी होते. याने गळा आणि पोटात असलेले विषारी द्रव्ये, पित्त, कफ बाहेर पडतो. असं लागोपाठ दोन दिवस केल्यानं खोकला बरा होतो. याचे सेवन करताना एक काळजी घ्या की याचे सेवन दिवसातून एकदाच करायचे आहे, दोन-तीन वेळा केलं तर वारंवार उलट्या केल्याने शरीर कमजोर होईल.

हळदीचे दूधदेखील खोकल्यात लाभदायक असतं कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटि व्हायरल गुण असतात, ते संसर्गापासून वाचवण्यात मदत करतात. रोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्यायल्यानं संसर्गापासून वाचण्यास मदत होते आणि त्याने कोरडा खोकलाही दूर होतो. या हळदीच्या दुधात चार- पाच खारका घातल्या तर लवकर फायदा होतो.

लसूण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात अँटिबॅक्टीरियल गुण असतात. लसणाच्या काही पाकळ्या तुपात तळून घ्याव्या आणि त्या गरम-गरम खाव्या त्याने गळ्याला शेक मिळतो आणि बरं वाटतं. कोरड्या खोकल्यासाठी लसूण रामबाण औषध मानलं जातं. काळी मिरी, जायफळाची पूड आणि आणि मध एकत्र घेतलं तर लवकर फायदा होतो.

हे दिवसातून तीन-चार वेळा घ्यायला हवं. हे घेतल्यानंतर गरम पाणी प्यावं. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. त्याने गळ्यातील दुखणं बरे होतं. दिवसातून दोनचार वेळा अश्या गुळण्या केल्याने लवकरच आराम मिळतो.

लहान बाळांच्या कफ करीता उपाय Cough in Marathi

कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021 लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर १ छोटा कांदा (मिळाल्यास पांढरा) बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुले छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.

4 तुळशीची पाने, ३ लवंगा, २ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,  थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा.  पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या. ( हा काढा २ वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून २ वेळा प्यायला द्या.)

डोक्यात सर्दी भरलेली असेल आणि डोके दुखत असेल तर वेखंड पूड थोडयाशा पाण्यात कालवून कपाळावर लावावी. सर्दी उतरण्यास मदत होते.लहान बाळांच्या छातीत कफ साठून त्रास होत असेल तर २ कप पाण्यात १ चमचा जवस कुटून घालावा. या काढ्यात खडीसाखर घालून उकळून हा काढा कोमट करून ३/४ वेळा बाळांना द्यावा. याने कफ बाहेर पडतो.

आल्यचा रस दोन चमचे त्यात दीड चमचा गुळ किसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला द्यावा. (हे चाटण सुद्धा २ वर्षावरील मुलांना द्यावे ) कोरडा खोकला झाला असेल तर या चाटणाचा उपयोग होतो.

कोरडा खोकला उपाय Korda Khokla Gharguti Upay Marathi

कोरडया खोकल्यासाठी जेष्ठ-मधाची बारीक पूड आणि साजूक तूप हे एकत्र करून त्याच्या छोटया गोळ्या करून उबळ आल्यानंतर चघळण्यासाठी देऊ शकतो. (४ वर्षाखालील मुलांना द्यावा) कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाल्याच्या वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यात १ चमचा मध मिसळून ४ ते ५ वेळा चाटल्यास उपयोग होतो. पण हे चाटल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये.

खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो. (३ वर्षावरील मुलांपासून सगळ्यांना उपयोगी आहे.)

स्त्रियांच्या खोकल्यावर उपाय (बाळंतीन महिला)

बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते.

गायीच्या दुधाचं तूप तुम्ही साधारण 15-20 ग्रॅम घ्या आणि त्यामध्ये 10-12 काळी मिरी घेऊ एका वाटीत गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा यातील काळी मिरी फुटायला लागेल तेव्हा तुम्ही हे गॅसवरून खाली उतरवा. त्यानंतर जास्त वेळ ठेऊ नका. हे मिश्रण जरा थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली खडीसाखर मिक्स करा आणि काळ्या मिरीचं हे मिश्रण कोरडा खोकला असणाऱ्यांना खायला द्यावं.

एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे खाल्ल्यानंतर साधारण एक तास तुम्ही काहीही खाऊ अथवा पिऊ शकत नाही. हा उपाय तुम्ही कोरडा खोकला जाईपर्यंत एक ते दोन दिवस आड करावा. याचा चांगला परिणाम होऊन खोकला ठीक होण्यास मदत होते.

घरगुती उपाय, खोकला औषध khoklyavar gharguti upay

खडीसाखर चघळत राहिल्यानेदेखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. इतकंच नाही तुम्ही खडीसाखरेची पावडर करून ती थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यासदेखील तुमच्या घशाला त्रास होत नाही. तसंच तुम्हाला वरचेवर जर खोकल्याचा त्रास होत असेल तर नेहमी खडीसाखर तुम्ही जवळ ठेवावी. यामुळे तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होणार नाही. नियमित खडीसाखर खात राहिल्यास,

तुमच्या घशावर प्रदूषणाचा परिणाम न होता खोकला देखील दूर राहातो. आपण घरगुती खोकला औषध वापरू शकतो.हा देखील कोरड्या खोकल्यावरील रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर कोरड्या खोकल्याची उबळ येत असेल तर तुम्ही हळद, सुंठ आणि गूळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवून ठेवा आणि साधारण अर्धा तासाने ही गोळी खा.

फक्त एक लक्षात ठेवा या गोळीचा आकार अत्यंत लहान असणं गरेजचं आहे अन्यथा शरीरावर अन्य परिणाम होण्याची शक्यता असते.हे वाचल्यानंतर थोडंसं तोंड आधीच खराब नक्की होईल. पण डाळिंबाची साल अथवा या सालीचा काढा करून त्यात तूप आणि सैंधव मीठ घाला. हे करून कोरड्या खोकल्यावर प्यायला दिल्यास, कितीही खोकला झाला असेल तरी त्वरीत बरा होतो.

ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता. हा आपण खोकला उपाय ( khokla upay ) करू शकतो.

आयुवेदिक घरगुती उपाय Ayurvedic Gharguti Upay in Marathi

एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. (कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते.

शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात.

तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. सुका खोकला आल्यामुळे श्वसनतंत्रावर सूज येणं किंवा जळजळ होण्याची स्थिती उद्भवते. साधारणपणे गळा, फुफ्फुसांना सुज येते.

व्हायरल इन्फेक्शन शारीरिक ताण तणाव यांमुळे ही स्थिती उद्भवते.ओल्या खोकल्याच्या तुलनेत सुका खोकला हा दीर्घकाळ राहतो. सर्दी, फ्लू झाल्यानंतर अनेक आठवड्यांपर्यंत सुका खोकला तसाच राहत असल्यामुळे नियंत्रणात आणणं कठीण होतं. सुका खोकला कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे प्राथमिक लक्षण आहे. एलर्जी, सायनसइटीस, अस्थमा, टॉन्सिलाइटिस. धुळ किंवा धूरामुळेही सुक्या खोकल्याचा त्रास होतो.

सुका खोकला आल्यास कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. यासोबत ताप, वास न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, उलट्या गॅस्ट्रोइंटेस्टाईन समस्या असतील त्वरित तपासणी करून घ्या. ओला खोकला छातीत जास्त कफ जमा झाल्यानं किंवा जास्त थंड, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे येते. गरम पाण्याचे सेवन नियमित करून खोकला नियंत्रणात आणता येऊ शकतो.

तुळस आणि मधाचा उपयोग करा (कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021) 

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो.

खोकल्याचा त्रास होत असल्यास काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३ ते ४ वेळा गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होईल.

कफ झाला की सतत कोरडा खोकला लागतो. अशावेळी बडिशेप पाण्यात उकळून ते पाणी दिवसभरातून थोडे थोडे घेत रहावे. (कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021) त्याने कफ पातळ होऊन निघून जातो.कोरडा खोकला झाला की त्यातून रक्त पडते. अशावेळी अडुळशाच्या पानांचा रस आणि खडीसाखर एकत्र करुन घेतल्याने समस्या कमी होते.

रात्री झोपण्यापूर्वी ७ ते ८ बदाम पाण्यात भिजत घालावेत. सकाळी बदाम भिजल्यानंतर त्याची पेस्ट करुन त्यात लोणी आणि मध घालून घेतल्याने आराम मिळतो. डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या.

आपण आमचे खालील लेख वाचलेत का?

अनुलोम विलोम प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायामचे फायदे कोणते?

आमचा shetkaree ब्लॉग सुद्धा visit करा 

1 thought on “कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi in 2021”

Leave a Comment