शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 348 कोटींची कर्जमाफी मिळणार..

महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी ( kishan karj mafi ) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी 348 कोटींची कर्जमाफी | kishan karj mafi

भूविकास बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना आता दिलासा मिळाला मिळाल्याचं आपण पाहत आहे. 2016 मध्ये भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

भूविकास बँकेमधून कर्ज घेणाऱ्या राज्यामधील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्देश दिले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. हे दीर्घ मुदतीचं असल्याने या कर्जाची परतफेड करण्यासाठीही जास्त वर्षांचा कालावधी मिळतो.

भूविकास बँकेची स्थापना 1935 झाली असली, तरी 1997 पासून या बँकेला प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागत आहे. बँकेचे कर्जवाटप थांबल्याने ‘नाबार्ड’ने (NABARD) बँकेचा अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या.

मग काय तर 86 वर्षं सुरू असलेला हा बँकेचा प्रवास थांबला. पण कर्ज घेतलेल्या लोकांचं म्हणजेच कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार हा प्रश्न प्रलंबित होता. आता भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.

काही वर्षांपासून अवेळी बदलनारे ऋतुमान, निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात मोठं संकट म्हणजे कोरोनाचं आणि लॉकडाऊनचं देखील आहे. या कारणाने ग्रामीण भागाचं अर्थचक्र ढासळत आहे. याबाबत काल भू-विकास बँकेतील अधिकारी, कर्मचारी व थकबाकीदार शेतकरी यांचे कर्ज माफ करण्याबाबत अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. अशा परिस्थितीत भूविकास बँकेसंबंधी कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!