म्हाडामध्ये बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी….535 पदांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा ( mhada job recruitment 2021 ), मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठीच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून (ता. १७) सुरवात झाली. mhada-job-recruitment-2021 म्हाडामध्ये ( mhada job recruitment 2021 ) तब्बल ५३५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, काेणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे, त्यासाठीच्या महत्वाच्या तारखांबाबत जाणून घेऊ या.. या पदांसाठी होणार भरती कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर)- १३…..  (वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे) उपअभियंता (आर्किटेक्चर)– १३………  (१८ ते ३८ वर्षे) प्रशासकीय अधिकारी – ०२…… (१९ ते ३८ वर्षे) सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर) – ३०……(१८ ते ३८ वर्षे) सहाय्यक कायदेशीर सल्लागार – ०२….(१८ ते ३८ वर्षे) कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) – ११९…. (१८ ते ३८ वर्षे) कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक – ०६……….(१९ ते ३८ वर्षे) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ४४…… (१८ ते ३८ वर्षे) सहाय्यक – १८….. (१८ ते ३८ वर्षे) वरिष्ठ लिपिक – ७३….(१९ ते ३८ वर्षे) कनिष्ठ लिपिक – २०७………(१९ ते ३८ वर्षे) लघुलेखक लेखक – २०…..(१८ ते ३८ वर्षे) सर्वेक्षक – ११…..(१८ ते ३८ वर्षे) ट्रेसर – ०७……. (१८ ते ३८ वर्षे) महत्वाच्या तारखा अर्ज भरण्यास सुरवात – १७ सप्टेंबर २०२१ अर्ज करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२१ (नोव्हेंबर-२०२१ मध्ये त्यासाठी परीक्षा होणार आहे.) अर्ज कुठे करणार..? पात्र व इच्छुक उमेदवारांनी mhada.gov.in वर १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता उमेदवार १२ वी पास, पदवी, बीई/ बीटेक (संबंधित विषय) असणे आवश्यक आहे. वेबसाईटवर दिलेल्या अधिसूचनेत तपशीलवार शैक्षणिक पात्रता तपासू शकता. निवड प्रक्रिया कशी असेल? उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारेच केली जाणार आहे. सविस्तर माहितीसाठी वेबसाईटवर जावे..

One thought on “म्हाडामध्ये बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी….535 पदांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!