स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc important news) महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि इतर महत्वाच्या अपडेट्स साठी एमपीएससीने मोठं पाऊल उचलले आहे. शुक्रवारी MPSC ने आपलं अधिकृत ट्विटर हँडल सुरु केलं आहे. या द्वारे विद्यार्थांना स्पर्धा परीक्षासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
MPSC करताय ? .. मग वाचा ही महत्वाची बातमी ! | MPSC Important News
शुक्रवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी एमपीएससीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या ट्विटर खात्यावरुन महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, असं एमपीएसीमार्फत सांगण्यात आलं आहे. एमपीएससीने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचे ट्विटर हँडल पहिल्याच ट्विटनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी हा रिप्लायचा पर्याय बंद करण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घाबरताय का?, असाही प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान, आयोगामार्फत दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेत स्थळावरील सूचनांनुसार उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी उपलब्ध करून घ्यावीत. असे एमपीएससीने ट्विट करत सांगितलेय.