दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात सरकारी नोकरीची संधी ……….

तुम्ही जर 10 वी पास ( navy recruitment for 10th pass ) झालेले असाल नि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय नौदलात (Indian Navy) 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यात चांगला पगारही मिळणार असल्याने ही मोठी संधी आहे.

दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात सरकारी नोकरीची संधी | navy recruitment for 10th pass

नौदलाच्या ‘नेव्हल शिप रिपेअर शिपयार्ड’मध्ये लवकरच विविध पदांच्या तब्बल 300 जागांसाठी मेगाभरती होत आहे. त्यात मशीनिस्ट, प्लंबर, पेंटर, टेलर, वेल्डर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियनसारख्या पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे मात्र आवश्यक आहे.

नौदलातील या मेगाभरतीबाबत ( navy recruitment for 10th pass ) नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. चला तर मग पदनिहाय किती जागा आहेत, त्यासाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती जाणून घेऊ या..!

एकून पदनिहाय जागा

मशीनिस्ट – 16
प्लंबर / पाइप फिटर – 08
पेंटर- 07

टेलर- 06
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक)- 20
मॅकेनिक एमटीएम- 07

वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) शिप फिटर- 03
शीट मेटल वर्कर- 01
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (रेडियो फिटर, इलेक्ट्रिक फिटर, कंप्यूटर फिटर) – 33
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (गायरो/मशीनरी कंट्रोल फिटर ) -13

इलेक्ट्रिशियन- 29
इंस्ट्रूमेंट मॅकेनिक – 08
फिटर – 37

मॅकेनिक डिझेल – 42
रेफ्रीजेटर आणि एसी मॅकेनिक – 11
शीट मेटल वर्कर – 18

कारपेंटर – 33 पद
मॅसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 07
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक- 01

शैक्षणिक पात्रता

– विविध पदांसाठी उमेदवार 10 वी पास असावा, तसेच ‘नेव्हल पोस्ट यार्ड’मध्ये अप्रेंटिस करणे गरजेचं आहे.
– इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– जर अप्रेंटिस केलेली नसेल, तर भारतीय सैन्याच्या तांत्रिक शाखेत मेकॅनिक वा तशाच इतर पदावर किमान दोन वर्षे सर्व्हिस करणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

– 18 ते 25 वर्षे

अर्ज कसा करणार..?

नौदलातील या मेगाभरतीसाठी उमेदवारांना ‘ऑफलाईन’ पद्धतीने अर्ज करता येईल. स्पीड पोस्टानेच अर्ज पाठवावा.

अर्जासाठीचा पत्ता

THE COMMODORE SUPERINTENDENT
(FOR Oi/C RECRUITMENT CELL),
NAVAL SHIP REPAIR YARD (PBR),
POST BOX NO. 705, HADDO,
PORT BLAIR – 744102″, SOUTH ANDAMAN.

1 thought on “दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात सरकारी नोकरीची संधी ……….”

Leave a Comment