पीएम किसान योजना 14 व्या हप्त्याची तारीख
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग हे चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर आता मित्रांनो प्रतीक्षा संपली आहे.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी नागरिकांना तेरावा हप्ताचा लाभ हा मिळालेला आहे आणि आता 14 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
मित्रांनो काही शेतकरी मित्रांना बारावा आणि तेरावा हप्ता हा मिळाला नाही , त्यामागे मित्रांनो काहीही कारण असू शकते मात्र ज्यांनी ई केवायसी केलेले नाही त्यांना येथून पुढील हप्ते मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर इ केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो आपल्या राज्यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकरी मित्र घेतात आणि आता शासनाकडून एक नवीन योजना चालू करण्यात आलेली आहे जिचे नाव नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आहे. आता या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये आणि दुसऱ्या योजनेतून सहा हजार रुपये असे 12 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.
14 वा हप्ता कधी मिळणार ?
मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता 28 जुलै 2023 रोजी शेतकरी मित्रांना 14 वा हप्ता मिळणार आहे. हा चौदावा होता आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहेत. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्राला चौदाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.