स्टेट बॅंकेत नोकरीची संधी …..लगेच करा अर्ज !

बँकेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ( sbi job recruitment 2021 ) नोकर भरतीसाठी तीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. sbi-job-recruitment-2021 वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस युनिटमध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसह या तीन जाहिराती जारी केल्या आहेत. त्यातून ६०६ जागांवर भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. सविस्तर माहितीसाठी वेबसाईट- sbi.co.in  अर्ज प्रक्रिया – २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु शेवटची तारीख-  १८ ऑक्टोबर २०२१ ५६७ ‘एससीओ’ पदे स्टेट बॅंकेने ‘मॅनेजमेंट बिझनेस युनिट’मध्ये ५६७ ‘एससीओ’ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. त्यात रिलेशनशीप मॅनेजर, रिलेशनशीप मॅनेजर (टीम लीड), कस्टमर रिलेशनशीप एग्जीक्यूटिव, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड), सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) ही पदे आहेत. जाहिरात क्रमांक- CRPD/SCO-WEALTH/2021-22/17. अर्ज करताना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 38 केडर ऑफिसर  एसबीआयने ‘स्पेशालिस्ट केडर ऑफिसर’साठी मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)साठी एकूण ३८ जागांवर भरती आयोजित केली आहे. जाहिरात क्रमांक – CRPD/SCO/2021-22/15 एसबीआयने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी एग्जिक्यूटिव (डॉक्यूमेंट प्रीजर्वेशन-आर्काइव्स) च्या एका पदासाठी तिसरी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात क्रमांक- CRPD/SCO/2021-22/16 इथे करा अर्ज- https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2021-22-16/apply

1 thought on “स्टेट बॅंकेत नोकरीची संधी …..लगेच करा अर्ज !”

Leave a Comment