सेन्सेक्स ६० हजारी पार ….. कुठे गुंतवणूक करावी ?

शेयर मार्केटमधील ( share market investment tips ) गुंतवणूक फायदेशीर ठरते, विशेषतः जेव्हा मार्केट असे वर गेलेले असते. अनेक लोक गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्टॉक मार्केट वर जाण्याची वाट पाहतात आणि काही गुंतवणूकदार असे असतात,ज्यांच्यात मोठे धोके पत्करण्याची धमक असते, त्यांना थेट इक्विटीत गुंतवणूक करायला आवडते.
 share-market-investment-tips
सध्या भारतीय स्टॉक मार्केट ऑल-टाइम उंच ट्रेडिंग करत आहे. अशावेळी अनुभवी ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार या संधीचा फायदा करून घेत आहेत, तर इतर अनेक लोक या संभ्रमात आहेत की,गुंतवणूक करण्याचे चालू ठेवावे की, मार्केट सोडून जावे. होते काय की, अशा गुंतवणूकदारांचे प्रश्न अनुत्तरित राहतात, जसे की: भविष्यात मार्केट वर जाणार आहे की घसरणार आहे? गुंतवणूक करण्यासाठी मार्केटचे ( share market investment tips )  सेन्टिमेंट बदलण्याची वाट बघावी की, लगेच गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी? वगैरे.
तर मग काय केले पाहिजे?
मार्केटमध्ये करेक्शन येण्याची वाट बघत बसल्यास फायदा करून घेण्याची उत्तम संधी गमावल्यासारखे होईल. अर्थात, मार्केट आणखी उंच उंच जाईल याचीही वाट बघता कामा नये. त्यामुळे उत्तम मार्ग हा आहे की,कंपनीच्या मूलभूत गोष्टी तपासा आणि योग्य वेळी संधीचा लाभ घ्या. या संदर्भात, चला गुंतवणुकीच्या काही रणनीती पाहूया, ज्यांचे पालन तुम्ही मार्केट उंच असताना करू शकाल.
– आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोचे पुनरावलोकन करणे:तुमचा गुंतवणूक पोर्टफोलियो अशा मार्केट परिस्थितीत तयार झालेला असेल, जी परिस्थिती सध्याच्या स्थितीपेक्षा वेगळी असेल. दरम्यानच्या काळात तुमच्या पोर्टफोलियोचे मूल्यनिर्धारण (व्हॅल्युएशन) बदलले असणे अगदी स्वाभाविक आहे. इतकेच काय, गुंतवणूक करण्याची तुमची कारणे देखील बदलली असू शकतात. अशा स्थितीत, तुमच्या पोर्टफोलियोमधील पिछाडीवर असलेल्या स्टॉकशी चिकटून राहणे नुकसानकारक ठरू शकते. आपल्या पोर्टफोलियोचे नियमितपणे पुनरावलोकन करणे आणि आता मूल्य गमावून बसलेले स्टॉक विकून सफाई करणे आणि आपल्या पोर्टफोलियोची किंमत पुन्हा सुधारणे हा उत्तम मार्ग आहे!
पोर्टफोलियोचे पुनर्संतुलन करणे:मार्केटच्या अस्थिरतेचा तुमच्या पोर्टफोलियोमधील मालमत्ता वाटपावर लक्षणीय प्रभाव पडत असतो. सुरूवातीस तुमचा पोर्टफोलियो डेट आणि इक्विटी 50:50 अशा समप्रमाणात असू शकतो. पण अस्थिर मार्केट ही मुळची पोर्टफोलियो वाटपे पार बदलून टाकते. म्हणजे हे गुणोत्तर बदलून आता 60:40 असे होऊ शकते.वाढत जाणारे मार्केट आकर्षक वाटतात, पण गुंतवणूक करताना धोक्याच्या प्राथमिकता लक्षात ठेवणे हे नेहमी फायद्याचे ठरते. मार्केट जेव्हा वर जाते, तेव्हा तुमचा पोर्टफोलियो अधिक जोखमी होऊ लागतो. त्यामुळे, अशावेळी रणनीती अशी ठेवावी की, मूळच्या 50:50 गुणोत्तर सध्या करून पुन्हा पोर्टफोलियो संतुलित करावा आणि पोर्टफोलियोमध्ये निर्माण झालेला धोका दूर करावा.
– पोर्टफोलिओ विविधता: एक अशी म्हण आहे की, सर्व अंडी एकाच पिशवीत ठेवू नयेत. पोर्टफोलियो गुंतवणुकीतील वैविध्याबाबत विचार करताना हीच महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे. तुमचा पोर्टफोलियो म्हणजे स्मॉलकॅप आणि मिडकॅप स्टॉक्सचे विचारपूर्वक केलेले मिश्रण असायला हवे. काही एकसारख्या मालमत्तेत गुंतवणूक करून पोर्टफोलियो एका ठिकाणी एकवटल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे, मार्केट जेव्हा उंच ट्रेडिंग करत असते, तेव्हा तुम्ही आपल्या पोर्टफोलियोत विविधता आणली पाहिजे.विविध क्षेत्राच्या विविध कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलियोमध्ये विविधता आणता येते. अस्थिर मार्केट स्थितीतही स्थिर राहू शकणार्‍या लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता.
-म्युचुअल फंड SIPसुरू करणे:जर इक्विटीतील गुंतवणूक तुम्हाला पसंत नसेल, तर तुम्ही इक्विटी म्यूचुअल फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. SIP सुरू करून इक्विटी म्यूचुअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे हे अगदी कमी धोका पत्करणार्‍या नवीन गुंतवणूकदारांसाठी सुद्धा अनुकूल असते. इक्विटी म्यूचुअल फंड्समध्ये सामान्य इक्विटी गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक विविधता आणि व्यावसायिक फंड मॅनेजमेंट असते पण इक्विटी गुंतवणुकीचा तसाच अनुभव मिळतो.
– सट्टा खेळू नका:सट्टा म्हणजे अधिक पैसे कमावण्याच्या आमिषाने तुम्ही वरचेवर मार्केटमध्ये जाता आणि बाहेर पडता. गुंतवणूक आणि सट्टा यातील मोठा फरक म्हणजे, गुंतवणूक विश्लेषण आणि रिस्क मॅनेजमेंटवर लक्ष केन्द्रित करते, तर सट्ट्यात संशोधनाचा आधार नसतो तर फक्त अधिक लाभ मिळवण्याच्या लोभाने धोका पत्करणे असते. मार्केट उंच असतानाही सखोल अभ्यास करून गुंतवणूक केल्याने धोका कमी होतो आणि नुकसान होण्याच्या शक्यतासुद्धा कमी होतात.
निष्कर्ष
यात काही गुपित नाही की, जेव्हा स्टॉक मार्केट ( share market investment tips ) उंच उंच जात असते, तेव्हा अनेक गुंतवणूकदार ट्रेडिंगचे झटपट निर्णय घेऊन मोकळे होतात आणि मग नुकसान सोसतात. त्यामुळे,नेहमी योग्यप्रकारे आखलेल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करून गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, कारण त्यामुळे तुम्हाला फायदा मिळवण्यास आणि वेल्थ क्रिएशनसाठी देखील मदत होते.

Leave a Comment