शेवग्याचे झाड Shevga Tree Informatoion in Marathi वाढण्यासाठी त्याला फारशी जागा लागत नाही. त्याला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे शेवग्याचे झाड आपण आपल्या दारी ही लावू शकतो. शेवग्याचे झाड लावने आणि त्याची मशागत करणे अतिशय सोपे आहे. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते.
Table of Contents
Shevga Tree Informatoion in Marathi शेवगा लागवड
भारतामध्ये बहुतेक उष्ण व आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणास्तव शरीरासाठी लाभदायक ठरत असतो. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरा मध्ये उद्भवणार्या अनेक व्याधी नाहीशा करण्यास समर्थ आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्यास चमत्कारी वृक्ष म्हटलेले आहे.
शेवगा जीवनसत्वाने भरपूर Shevga
साधारणता १०० ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाडलेल्या पानांमध्ये तितक्यात वजनाच्या गाजरा इतके क जीवनसत्व संत्रा पेक्षा अधिक मात्रेमध्ये जीवनसत्व दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शिअम केळ्यामध्ये असते त्यापेक्षाहीपोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते.
थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारचीप्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.
शेवग्याचे फायदे Shevga Benefits
शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास मदत होते.
शेवग्याच्या Shevga Tree Informatoion in Marathi पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.
रक्त शुद्धीकरण
शेवगा Shevga रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यासकिंवा ब्रॉन्कायटीस चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शाहिराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते. शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व ‘बी’ हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे ‘तोंड येणे’ या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
शेवग्याच्या पानांची भाजी
Shevga कोवळ्या पानांची भाजी आतड्यांनाउतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.शेवग्याच्या फुलांची भाजी हि संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यामुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.
शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते.
पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलब्ध होतात. काही रानभाज्या असतात. ज्या पावसाळा सुरू झाली की लगेचच उगवायला सुरूवात होते. सहज मिळणाऱ्या भाज्या अत्यंत चविष्ट असतात. सहज मिळणाऱ्या आणि अनेक भाज्यांना पर्याय असलेली भाजी म्हणजे शेवग्याची भाजी. ही भाजी अत्यंत चविष्ट आणि पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत गुणकारी आणि औषधी असते.शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो.
शेवग्याच्या पानात पीट्रिगोस्पेरमिन नावाचे कार्यकारी तत्व म. ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. त्यामुळे आतड्यातील व्रणास कारणीभूत असणाऱ्या एच पायलोरी या जीवाणूवर ते प्रभावी ठरते व आंतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस आदी लक्षणे दिसू लागल्यानंतर शेवग्याची भाजी खावी. ही सर्व लक्षणे कमी होतात. शारिरीक आणि मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो. शेवग्याच्या झाडाच्या पानातील पौष्टीक घटक शरीरातील रक्त शुद्ध करतात.
शेवग्याच्या पानांची भाजी किंवा इतर पदार्थ कसे बनवायचे हे तुम्हाला माहीत आहे का? शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन निथळून घ्यावा. नंतर पाने चिरून घ्यावीत. मूग डाळ एक तास आधी भिजत ठेवावी. नंतर निथळून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यावा. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व परतावी. परतल्यानंतर त्यात भाजी घालावी, मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी.
गुणकारी शेवगा पाला
शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो. शेवग्याच्या पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात.
शेवग्याचे झाड Shevga Tree Informatoion in Marathi वाढण्यासाठी त्याला फारशी जागा लागत नाही किंवा त्याला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे शेवग्याचे झाड आपण आपल्या दारी ही लावू शकतो. शेवगा औषधी वनस्पती आहे. त्यामुळे औद्योगिक दृष्ट्या देखील योगेश शेंगांना मागणी वाढत आहे. म्हणून वापरतात. व्यापारी दृष्टीनेदेखील शेवगा उत्पादन केल्यास भरपूर प्रमाणात नफा मिळवता येतो.
शेवग्याच्या फुलांची भाजी तसेच शेवग्याच्या फुलांचा कोशिंबीर देखील करतात. शेवग्याच्या पानात व शेंगांमध्ये अ व क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक असते. तसेच लोह व प्रथिने देखील मुबलक प्रमाणात असतात. शेवग्याच्या वाढलेल्या शेंगांच्या बियापासून विशिष्ट प्रकारचे तेल काढले जाते. शेवग्याच्या शेंगांची पावडर देखील केली जातील शेवग्याच्या शेंगा पासून निघालेली तेल सांधेदुखीवर तसेच पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याकरता होते. शेवगा हा उष्ण धारक असल्यामुळे तो कफजन्य आजारावर गुणकारी ठरतो.
औषधी गुणधर्म
पोटामध्ये जंत किंवा कृमी यांसारखे आजार झाले असल्यास, शेवग्याच्या पानांचा रस दिल्यास हे बरे होते शेवग्याच्या पानांचा रस पोटातील जंत किंवा कृमी मारण्यासाठी अत्यंत पोषक आहे. व्यवस्थित जेवण जात नसल्यास किंवा भूक मंदावली असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी करून खाली तर त्याने भूक वाढेल.
तापीमुळे Fever किंवा इतर कारणांनी तोंडाची चव गेली असेल, तर शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे त्यातील शार जीभि वर असलेला दूषित कप काढून तोंडाला रुची आणते शेवगा उष्ण प्रकारात येत असल्यामुळे पित्त धारक व्यक्तींनी शेवग्याचा आहारात व्यवस्थित वापर करावा. संधिवात व आमवात यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे बियांपासून तयार केलेल्या तेलाची मालिश केल्यास हे वाद कमी प्रमाणात त्रास देतील.
ताप खोकला सर्दी व कप यामुळे तयार होणाऱ्या डोकेदुखी शेवग्याच्या बियांची चूर्ण दिल्यास बरं वाटेल. त्यामुळे सर्वांनी शेवग्याचा आहारात समावेश करावा. शेवगा हा चरबी कमी करणारा असल्यामुळे त्याचा उपयोग ज्यांना चरबी ची समस्या आहे, त्यांनी नियमित करावा. ज्यांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी शेवग्याच्या पानांचा रस किंवा शेवग्याच्या पानांची भाजी करून खावी कारण त्यामध्ये विटामीन मोठ्या प्रमाणात असते.
नारु रोगावर शेवग्याच्या पाण्याचा रस किंवा सालीचा रस त्याचा लेप लावल्यास नारू बाहेर पडतो. मुतखड्याचा रोग झाला असल्यास त्यावर शेवग्याच्या मुळांचा काढा करून दिल्यास उपयोगी आहे कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू लोहाच्या कमतरतेमुळे लहान मुले किंवा गर्भिनी असताना महिलांतील आजार कमी होऊ शकतात. हाडांची समस्या, रक्तक्षय, अशक्तपणा यावर शेवगा उत्पन्न योग्य आहे.
सूचना :
शेवग्याची Shevga Tree Informatoion in Marathi पाने, फुले तसेच शेंगा, साली मुळे सर्वच घटक सर्व गुणांनी उपयुक्त आहेत. म्हणून त्यांचा समावेश आहारामध्ये अवश्य करावा. डॉक्टटरांचा सल्ला जरुर घ्या.