Weakness of Vitamin ‘D’ शरीरामध्ये व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता भासल्यास कोरोनाचा धोका 14 पट वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.तुम्हाला जर संक्रमणापासून वाचायचे असेल तर पुढील लेख पूर्ण वाचा. ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्याच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्याचा धोका अधिक वाढतो. याच आरोग्याच्या शरीरावर कसा परिणाम होतो की त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. इस्रायलमधील बार-अलन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे.
संशोधनाचा अहवाल PLOS One या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. शरीरात व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) स्तर योग्य प्रमाणात राखण्याची गरज असल्याचे यावेळी दिसल्याचे या संशोधनाचे नेतृत्व करणारे युनिव्हर्सिटी ऑफ गॅलीली मेडिकल सेंटर आणि इस्रायल फॅकल्टी ऑफ मेडिसिनचे एमिल डॉर यांनी सांगितले.
शेतकरी बातम्यांसाठी येथे क्लिक करा
एका अभ्यासादरम्यान असे स्पष्ट झाले की, गॅलीली मेडिकल सेंटरमध्ये एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान उपचारासाठी दाखल झालेल्या 1,176 रुग्णांच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. या सर्व रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. संसर्ग होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी आणि दोन आठवड्यांनंतर रूग्णांच्या शरीरात (Body) असलेल्या व्हिटॅमिन डीच्या पातळीचा अभ्यास यादरम्यान करण्यात आला. तसेच त्यांचे वय, लिंग, ऋतू, जुने काही आजार अशा घटकांचाही विचार करण्यात आला असता, कोरोना संसर्गापूर्वी शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी कशी होती, हे तथ्य संसर्गाच्या तीव्रतेवर परिणाम करते, असे संशोधनात म्हटले आहे.
मृत्यूचा संबंध व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूशीही संबंध आहे. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्याशी संबंधित आहे. तसेच त्याच्या कमी पातळीमुळे स्वयंप्रतिकार, हृदय व रक्त वाहिन्यासंबंधी आणि संसर्गजन्य रोग होऊ शकतात. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, डॉक्टरांनी लोकांना व्हिटॅमिन डी घेण्यास सांगितले होते. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
मुळव्याध लक्षणे कारणे आणि उपाय | Piles Information in Marathi
ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसली, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 14 पटीने वाढते असे म्हटले आहे. तसेच ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण पुरेसे होते, अशा लोकांचा मृत्यू दर 2.3 टक्के होता. तर ज्यांच्यात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होते, त्यांचा मृत्यू दर 25.6% होता, असे दिसून आले. याबाबात प्रोफेसर मायकेल एडलस्टीन म्हणाले की, काही लोकांना कोरोनाचा गंभीर परिणाम का होतो आणि काहींना का होत नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासाठी अजूनही अभ्यासकर्त्यांचे शोध सुरू आहेत.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हीसुद्धा विटामिन डी शरीरामध्ये वाढवा जेणेकरून कोणत्याही रोगाचा तुमच्यावर प्रभाव होणार नाही.