मोबाईलवर चॅट करता करता वजन कमी करा ………

प्रत्येकाला फिट राहवसं वाटतं. परंतु, अनेकांना एक्सरसाईज ( weight loss exercises at home ) करण्याचा कंटाळाही येतो. अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर काहींच्या मोटिव्हेशनची कमतरता असते. आज किंवा उद्या करू किंवा नव्या वर्षात वर्कआऊटला सुरुवात करू असं करून करून वर्कआऊट करणं टाळलं जातं.

weight-loss-exercises-at-home

तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असाल तर काही खास सोप्या ट्रिक्स वापरू शकता. अॅक्टिव्ह राहण्यासाठी जीममध्येच ( weight loss exercises at home )गेलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरात झोपता झोपता, चालता चालता शरीराला अॅक्टिव्ह ठेवू शकता.

झोपता झोपता सायकलिंग
फिट राहण्यासाठी चांगल्या खाण्यापिण्याशिवाय अॅक्टिव्ह असणंही तितकच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर संपूर्ण दिवस थकून जात असाल आणि वर्कआऊटही करू शकत नसाल तरीही तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवू शकता. जर तुम्ही झोपता झोपता मोबाईल स्क्रॉल करत असाल तर त्याचवेळी पायाने सायकलिंगही करू शकता. झोपता झोपता करण्यात येणाऱ्या या एक्सरसाईजमुळे तुमच्या शरीराचे इतर बॉडी पार्ट्स अॅक्टिव्ह होतात.

चालता चालता फोनवर बोला
चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर नेहमी चालता चालता बोला. त्यामुळे एकाचवेळी तुमचे दोन्ही कामे होतील. तुम्ही फोनवर बोलता बोलता उठबश्याही घालू शकता. नाही तर पायऱ्यांवरून चढउतारही करू शकता. ही एक चांगली वर्क आऊट आहे.

टीव्ही पाहताना दीर्घ श्वास घ्या
टीव्ही पाहत असताना तुम्ही हाताच्या मुव्हमेंट करू शकता. त्याचबरोबर दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. काही दिवस तुम्हाला हा प्रयत्न करावा लागेल. त्यानंतर हा सवयीचा भाग होईल.

या गोष्टी खाण्यचे टाळा
जास्त साखर किंवा जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाणे टाळा. या प्रकारच्या पदार्थांमुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि इतर अनेक चयापचय विकार होऊ शकतात. तसेच, तळलेले किंवा जास्त मसालेदार खाणे देखील टाळा. याव्यतिरिक्त अल्कोहोल, सिगारेट किंवा जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन टाळा.

पुरेशी झोप आणि पाणी
दररोज किमान 6-8 तासांची पुरेशी झोप घ्या. याशिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. कमी पाणी प्यायल्याने हिवाळ्यात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.

आहार
केवळ आरोग्यदायी गोष्टी खाण्याची सवय लावा. आपल्या आहारात प्रथिने, नैसर्गिक फॅट आणि शरीरास ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट समाविष्ट करा. याशिवाय हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त फळंही नियमित खा.

Leave a Comment