कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण जोरात चालू आहे. व्हॉट्सॲपवरून लोकांना कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट मिळवता येते हे आपल्याला माहीतच झाले आहे. आता यापुढेही जाऊन सरकारने लस नोंदणीकरण सहज व सोपे व्हावे यासाठी नागरिकांना WhatsApp वर अजून एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
लस नोंदणी करा व्हॉट्सॲपवरून..! | whatsapp vaccine registration
अनेक भारतीय आता मोबाईलवर WhatsApp चा वापर करत आहेत. तसेच CoWin पोर्टलचाही https://www.cowin.gov.in वापर करुन लोक सध्या लसीकरणासाठी नोंदणी करतात. पण,आता तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी ही व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही करता येणार आहे.
नागरिक MyGov च्या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज पाठवून लसीकरणासाठी नोंदणी करु शकणार आहेत. तसेच व्हॉट्सॲपवरुन लस घेण्यासाठी नोंदणी करणे अधिक सोपं जाणार आहे. याआधी लोकांना MyGov हेल्पडेस्कवर कोविड सर्टिफिकेटची विनंती करावी लागत होती. त्यानंतर काही सेकंदातच लोकांना कोविड सर्टिफिकेट मिळत होते.
WhatsApp वरुन लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? | whatsapp vaccine registration
MyGov Corona Helpdesk चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही तुमच्या पिनकोडच्या आधारावर लसीकरण स्लॉट बुक करू शकता. याचा वापर करून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लस घेण्याची वेळ आणि तारीख निवडता येते. फक्त त्याआधी तुम्हाला CoWIN पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागणार आहे आणि मग व्हॉट्सॲपवरून स्लॉट बुक करता येणार आहे.
▪️ तुमच्या कॉन्टॅक्ट्स लिस्टमध्ये MyGov corona helpdesk नंबर +919013151515 नंबर सेव्ह करा.
▪️ तो क्रमांक सेव्ह केल्यावर त्या नंबरच्या व्हॉट्सॲपवरून ‘Book Slot’ असा मेसेज करा.
▪️ तुम्हाला SMS द्वारे सहा अंकी OTP क्रमांक पाठवला जाईल. हा ओटीपी चॅटबॉटवर सबमिट करा.
▪️ आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने CoWIN वर नोंद असलेल्या सदस्यांची यादी तुम्हाला दिसेल.
▪️ आता तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी कोरोना लस बुक करायची आहे त्याची निवड करा. तुम्ही 1,2,3 पर्यायांपैकी आवश्यकतेनुसार एक पर्याय निवडू शकता.
▪️ मग तुम्हाला लसीचा प्रकार आणि पिनकोड टाकावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲप तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लसीकरण केंद्राची यादी दाखवेल.
▪️ आता तुमच्या सोयीनुसार लसीसाठी अपॉईंटमेंट निश्चित करा (corona vaccination slot booking on whatsapp) आणि दिलेल्या तारखेला लसीकरण केंद्राला भेट द्या.
नव्या फिचरबाबत बोलताना MyGov चे सीईओ अभिषेक सिंह म्हणाले की, ‘MyGov Corona Helpdesk च्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. एक चांगले व्यासपीठ आणि तंत्रज्ञान एकत्र आले तर चांगले निकाल दिसून येतात. कोरोना महामारीच्या काळात WhatsApp ने एक चांगले चॅटबॉट उपलब्ध करुन दिले आहे.