Yoga Marathi – 7 Best Yoga in Marathi – योगासने

योगाची yoga marathi  सुरुवात ही भारतात झालेले आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे की, शरीराच्या स्वास्थ्यासाठी नियमित योगा करणे हा अत्यंत फायदेशीर ठरतो.

योगासने Yoga in Marathi – Yoga Marathi

योगा pdf (yoga in marathai pdf) आपणास वाचायला मिळतात. तसेच आपण योगा पुस्तके (yoga books in marathi} तर आपण अशाच काही योगासनाचे प्रकार आणि ते कसे करायचे याची माहिती पाहणार आहोत. आपण ही माहिती google वर yoga information in marathi wikipedia या शीर्षकाखाली सुद्धा बघू शकता

योगासने Yoga in Marathi - Yoga Marathi

गरुडासन Garudasan (Yoga Marathi)

गरुडासन हे गरुडाच्या आकाराप्रमाणे दिसते, म्हणून त्याला गरुडासन असे म्हणतात हे आसन करण्यासाठी आपल्याला सरळ, ताठ उभं राहावं लागतं. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. उजवा पाय सरळ ठेवा आणि डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावरून घेऊन मागे पायाला विळखा घालावा.

ज्याप्रमाणे वेल झाडाला विळखा घालतो त्याप्रमाणे. हे आसन करत असताना शरीराचा तोल सांभाळावा त्याचप्रमाणे दोन्ही हात चेहऱ्याच्या समोर असून त्यामध्ये देखील वीळखा घालावा. या स्थितीत काही वेळ थांबावे. पुन्हा दुसऱ्या पायावर हेच आसन पुन्हा करावे.

पुन्हा थांबावे व एका पायावर शरीराचा तोल सांभाळायचा प्रयत्न करायचा. गरुडासन करण्याच्या अगोदर दीर्घ श्‍वास घ्यावा व नंतर सोडावा. हे आसन दोन वेळा करावे. गरुडासणाने एकाग्रता मजबूतपणा वाढतो. स्नायू मजबूत होतात.

या आसनामुळे हाता पायांमधील संधिवात कमी होण्यास मदत होते. गरुडासनाने हे असं नियमित केल्यामुळे पाय सशक्त आणि मजबूत बनतात. तसेच शरीराचा संपूर्ण तोल एका पायावर सांभाळण्याचा आपल्याला फायदा होतो. हे आसन नियमित केल्याने पोटाऱ्या दुखणे कायमचे बसून जाते. गुडघेदुखीचा त्रास असल्यास हे आसन करू नये.

कुंभासन Kumbhasan

कुंभासन करण्याअगोदर आपले दोन्ही हात सरळ जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय जमिनीवर मागे घेताना समोर बघा. या स्थितीत काहीवेळ राहून पुढच्या स्थितीत परत या कुंभासनाचे फायदे असे आहेत की, शरीराचा जाडेपणा दूर होऊन पोटावरील व कमरेवर अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपर दुखी मनगट दुखत असेल तर हा योगा करू नये.

नौकासन Naukasan

नौकासनात Yoga Marathi शरीराचा भाग हा नावे प्रमाणे दिसतो. म्हणून त्याला नौकासन असे म्हणतात. ज्या पद्धतीने आपण जमिनीवर शांतपणे झोपतो, त्याच पद्धतीने जमिनीवर झोपावे. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत असावे मान सरळ असावी. दोन्ही हात पाय आणि मानेला सावकाश वरच्या दिशेने उचलावे. हे आसन करत असताना हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा.
अन्यथा मान दुखीचा त्रास होऊ शकतो.

हे करताना संपूर्ण शरीराचे वजन नितंबावर आधारित असावे आणि नजर आकाशाकडे असावी. शरीराला आकाशाच्या दिशेने उचलताना अत्यंत सावकाशपणे हे आसन करावे. हे करत असताना घाई मुळीच करू नये. पाठीचे दुखणे किंवा पायाचा विकार असल्यास हे आसन करू नये.

ताडासन Tadasan

ताडासन Yoga Marathi करताना शरीराची स्थिती ताडाच्या झाडाप्रमाणे ताठ होते. त्यामुळे त्याला ताडासन असे म्हणतात. ताडासन हे नाव पडले असे म्हनायला हरकत नाही.
ताडासन करण्याची कृती, ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे रहावे. त्यानंतर हळूहळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेत असताना, केवळ तळपायावर उभे रहावे.

मग हाताच्या विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा मूळ स्थितीत उभे राहावे. डोके वरच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे आहे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावी या अवस्थेत शरीराचे वजन हे पायांच्या बोटांवर असते जेव्हा त्यांना वरच्या बाजूला नेता त्यावेळेस पोट आपल्या बाजूस असायला पाहिजे.

ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू पंजे बळकट होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्यांच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्य शक्तीमध्ये वाढ होऊन मुळव्याध असलेल्या व्यक्तीला आराम मिळतो. ताडासन हे लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आसन आहे.

भुजंगासन Bhujangasan

भुजंग हे एक सापाचे नाव आहे. या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे दोन्ही पायांना एकत्र करावे. हनुवटी जमिनीवर ठेवावी. आणि कोपरे कमरेला टेकलेले असावेत.

या स्थितीत हळूहळू दोन्ही हाताच्या सहायाने कमरेपासून वरचा भाग जितका शक्य तितका वरती उचलावा वर आकाशाकडे पहावे.

आता त्याच दिशेने त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे म्हणजेच मूळ स्थितीत यावी हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकतात.

सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा खूप फायदा होतो. हे आसन केल्याने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. हा व्यायाम केल्यामुळे पित्ताशयाचे क्रियात्मकता वाढते. सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो.

पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. व पचनशक्ती वाढण्यास मदत होते. Yoga Marathi पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबी हे आसन केल्याने कमी होते. हे आसन करत असताना मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. नाही तर तुमच्या पाठीवर ताण निर्माण होईल. ज्यांना पाठीचे दुखणे आहे, त्यांनी डॉक्टर अथवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यायाम करावा.

उष्ट्रासन Ushtrasan

उष्ट्रासन करताना शरीराची अवस्था उंटाच्या आकाराचे होते म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. उष्ट्रासन करण्याकरिता सर्वप्रथम वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यावर उभे राहा. सहाजिकच तुमचे पाय मागे राहतील. त्यानंतर दोन्ही हात समोर न्या नंतर हे हात कानावरून मागे घ्या.

त्यानंतर शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झूकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातही पूर्णपणे मागे घ्या आणि हाताने पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. मान आणि डोके सुद्धा मागे न्या. तुमचे शरीर आता सध्या मागच्या बाजूला झुकलेले असेल. या असनातून बाहेर येताना तुमचे हात एकाच वेळी पुढे येतील आणि त्यानंतर वज्रासनातून बाहेर या .

हे आसन Yoga Marathi करण्यासाठी शरीराला जास्त ताण देऊ नका. मागे झुकताना मांड्या सरळ ठेवा. अंतिम स्थितीत मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ येणे अपेक्षित आहे. आसन स्थितीतून परतताना सावधगिरी बाळगा. हार्नियाचा त्रास असणार्‍यांनी हे आसन करू नये.

या आसनामुळे गुडघे, ब्लडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. श्वास, पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होण्यास मदत होते.

शवासन Shawasan (Yoga Marathi )

शव म्हणजे मृतदेह. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन होय.  या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाचा आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ ठेवावी व डोळे बंद ठेवावे.

पूर्ण शरीर मोकळ सोडून द्या. त्यानंतर तुमचं लक्ष संपूर्ण श्वासावर केंद्रित करा. श्वास आत येणे व बाहेर जाणे यावर तुमचं लक्ष असणे गरजेचे आहे. श्वासात येत असताना, हळुवार थंडपणा जाणवतो त्याचा अनुभव घ्या. त्याच वेळी श्वास बाहेर जातो त्यावेळेस हलका गरमपणा आपल्याला अनुभव तो त्याचा सुद्धा अनुभव घ्या.

त्यानंतर अनुक्रमे छाती व नाभीवर लक्ष केंद्रित करा. 1 ते 100 पासून उलट्या क्रमाने आकडे मोजा. आकडे मोजण्यात चुका झाल्यास, 100 पासून पुन्हा मोजण्याचा प्रयत्न करा.

या असनात डोळे बंद असायला पाहिजेत. हात शरीरापासून सहा इंच दूर व पायात एक ते दीड फूट अंतर हवे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित असायला हवे. त्यामुळे मन प्रसन्न होईल डोक्यातील विचार थांबतील. श्वास घेताना शरीर हलवू नका.

या Yoga Marathi आसनामुळे आपल्या शरीराला मानसिक ताणतणाव उच्च रक्तदाब हृदयरोग, निद्रानाश यावर फायदा होतो.
या आसनात मन शरीराशी जोडलेले असते. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या विचारांचे शिरकाव डोक्यात होत नाही. मन विश्रांत अवस्थेत असते त्यामुळे शरीराचा थकवा निघून जातो.

आमचे हे लेख वाचले का?

चेहऱ्यावरील काळे डाग वांग मुरूम खड्डे घरगुती उपाय

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय

Leave a Comment